Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १०, २०१९

या ठिकाणी होणार चंद्रपूर लोकसभेची मतमोजणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
संबंधित इमेज
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. 
आज दिनांक 9 एप्रिलला सायंकाळी 6.00 वाजता प्रचाराच्या तोफा थंडवणार असून चंद्रपूर मतदारसंघांमध्ये रोज गुरुवारला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये 13 उमेदवारांमध्ये लढत होणार असून होणाऱ्या मतदानाची मतमोजणी 23 मे 2019 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोडाऊन, एमआयडीसी प्लॉट नं. बी-35 एमआयडीसी परिसर, चंद्रपूर येथे होणार आहे. मतमोजणी सकाळी 8.00 वाजेपासून सुरू होणार असल्याने सर्व उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.