Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

नाट्य दिंडीने होणार नाट्यसंमेलनाला प्रारंभ

  •  ९९ व्या अ. भा. नाट्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी 
  • नाटकांच्या सादरीकरणासह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
  
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बहुप्रतिक्षीत ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता कवीवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे करण्यात येणार आहे. तत्पुर्वी नागपूर आणि विदर्भाचे वैशिष्ट्य प्रदर्शित करणाºया नाट्य दिंडीने या संमेलनाला प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर - विदर्भातील रंगकर्मींमध्ये कमालीचा उत्साह असून साºयांनीच कंबर कसली आहे. हे नाट्य संमेलन २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६. ३० वाजता सुरेश भट सभागृहात होणार असून उद्घाटक ज्येष्ठ नाट्यलेखक प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते नाट्य संमेलनाचे उद्घाटना करण्यात येईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसर्ण, महापौर नंदाताई जिचकार प्रामुख्याने उपस्थित राहतील. हा उद्घाटन सोहळा ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या नाट्यसंमेलनासाठी पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून रंगकर्मी येणार आहेत. महाराष्ट्रातील गाजलेल्या नाटकांचे, एकांकिकांचे प्रयोग, नाट्य विषयक परिसंवाद, चर्चासत्र आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन या नाट्यसंमेलनात करण्यात आले आहे. यासाठी मुख्य रंगमंचाला कै. पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती रंगमंच असे नाव देण्यात आले आहे तर संपूर्ण परिसराला नाटककार राम गणेश गडकरी परिसर असे नाव देण्यात आले आहे. नागपूरच्या रंगभूमीच्या समृद्धतेसाठी आजपर्यंत अनेक ज्येष्ठ - श्रेष्ठ रंगकर्मींनी त्यांचे महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा रंगकर्मींची आठवण म्हणून विविध प्रवेशद्वाराला ज्येष्ठ रंगकर्मीचे नाव देण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.