महाराष्ट्र शासनाच्या लघुवृत्तपत्रांवर अन्यायाच्या विरूध्द
चंद्रपूर जिल्हा वृत्तपत्र बचाओ संघर्ष समितीचे आंदोलन
चंद्रपूर/प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पुस्तके व प्रकाशने विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे
अन्यायपूर्ण धोरण अंगीकारण्यात आलेले आहे. या धोरणामुळे लघु वृत्तपत्रांचे अस्तित्व संपुष्टात येऊन अनेक
मालक,संपादक आणि त्यांचे कर्मचारी बेरोजगार होतील. म्हणून चंद्रपूर जिल्हा वृत्तपत्र बचाओ संघर्ष समितीने
आंदोलनाची भूमिका अंगीकारली आहे. या संदर्भात जिल्हा वृत्तपत्र बचाओ संघर्ष समितीची बैठक २१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंजी ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निवास स्थाना समोरील कस्तुरबा चौक येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठीय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर जिल्हा वृत्तपत्र बचाओ संघर्ष समिती ने आपल्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री ,महासंचालक आदि सर्व संबंधितांना पाठविलेले आहे. चंद्रपूर जिल्हयातील सर्व वृत्तपत्र मालक प्रकाशक संपादकांनी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलनात उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा वृत्तपत्र बचाओ संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.