जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
चंद्रपूर/प्रतीनिधी :-
काश्मिरातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 सीआरपीएफ जवान शहीद झाले. देशभर या घटनेप्रती आक्रोश आहे. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने देशवासीयांच्या घटनेप्रती निषेधस्वरात आपला स्वर मिसळला आहे. श्रमिक पत्रकार संघात झालेल्या एका श्रद्धांजली कार्यक्रमात अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांनी आपल्या भावना व्यक्त करत हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.
श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार सदस्यांनी 2 मिनिटे मौन पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला मोहन रायपुरे, प्रमोद काकडे, आशिष अंबाडे, महेंद्र ठेमस्कर, जितेंद्र मशारकर, साईनाथ सोनटक्के, रमेश कलेपेल्ली,रवी बल्की, अभिषेक भटपल्लीवार, अन्वर शेख, सुनील रेड्डी, नाहिद सिद्दीकी, आदींची उपस्थिती होती. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिका-यांमार्फत एक निवेदन पाठविण्यात आले. यात पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत सरकारने दोषी राष्ट्र व व्यक्ती यांना तातडीने दंडीत करावे अशी मागणी करण्यात आली आहे.