जुन्नर /आनंद कांबळे:
भारतातील १३१किल्ल्यावर उद्या रविवारी दुर्गपूजा करण्यात येणार आहे अशी माहिती शिवाजी ट्रेल व हिस्ट्री क्लबचे संघटक प्रा.विनायक खोत यांनी दिली.
दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी किल्ल्यावर दुर्गपूजा केली जाते. यावेळी किल्ल्यावरील जमीन व गवत सुकते व ते काढण्यास सोपे जाते.तसेच बोर्डाच्या परीक्षा चालू होतात.याचवेळी नववी पर्यतचे विद्यार्थी ,हिस्ट्री क्लबचे विद्यार्थी यांना सकाळची शाळाअसते.त्यामुळे हे विद्यार्थी किल्ल्यावर वेळ देतात .ही वेळ किल्ले संवर्धन कामासाठी योग्य असते म्हणून फेब्रुवारी महिन्यात दुर्गपूजा आयोजित करण्यात येत आहे.
गेली २२वर्ष शिवाजी ट्रेल च्या माध्यमातून दर वर्षी एका किल्ल्यांचे पूजन केले जात आहे. पूजन म्हणजे किल्ल्याची साफ सफाई करणे , वास्तुची स्वच्छता करणे व प्रार्थना करणे ,
.........हे किल्ला स्वरुपी देवतांनो
त्याकाळी तुम्ही आमचे रक्षण केले
आता वेळ आली आहे की
आम्ही तुझे संरक्षण करण्याची,
ते आम्ही केले पाहिजे जेथे जेथे संवर्धन कार्य चालू आहे तेथे अशी कोणतेही दुर्घटना धडू देऊ नकोस कि ज्यामुळे हे संवर्धन कार्य खंडित होईल, संवर्धन कार्य करणाऱ्यांना सुख , शांती , समृध्दी दे व त्याच्या आरोग्याची काळजी घे.हिच तुझ्या चरणी माझी प्रार्थना.
२०१४ ला घनगड किल्ल्यावर वार केलेल्या पूजेस महाराष्ट्रातून जवळ पास ३००० दुर्ग प्रेमी किल्ल्यावर आले होते , एवढी संख्या पाहून संस्थापक श्री मिलिंद क्षीरसागर यांनी २०१५ ची पूजा राज्यातील अनेक किल्ल्यावर करण्याचा मानस ग्रुप मेम्बर्स ला बोलून दाखवला व २०१५ ला ७०/८० किल्ल्यावर दुर्ग पूजा पार पडली , २०१६ ला शतक नक्की होईल व आश्या मुहूर्तावर , सरदार घराण्यातील श्री सत्यशील राजे दाभाडे यांनी किल्ल्यावर उपस्थित रहावे म्हणून विचारणा केल्यावर त्यांनी आजुन काही घराणी सोबत आणण्याची इच्छा व्यक्त केली , व २०१६ ला १२१ किल्ल्यांवर पूजा पर पडली विशेष म्हणजे २१किल्ल्यांवर सरदार घराण्याच्या वंशजांनी उपस्थिती लावली होती , ह्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली. मागील दोन दशके संवर्धन कार्यात आग्रेसार असणाऱ्या संस्थेने किल्ले तिकोना , किल्ले घनगड , किल्ले चावांड व किल्ले नारायणगड वर संवर्धन कार्य केले आहे, किल्ल्यांवर ध्वजस्तंभ उभारणे, किल्ल्यावरील वनस्पती, फुले यांचे अभ्यास पूर्व नोंदी करणे, किल्ल्यांचे सर्वेक्षण करणे, दुर्ग संवर्धक कार्यशाळा घेणे, किल्ल्यांवर हिस्ट्री क्लब च्या विद्यार्थ्यांना संवर्धन कार्यात गोडी लावणे, किल्ल्याच्या घेऱ्यातील गावात समाज उपयोगी कामे करणे, लायब्ररी चालू करणे, विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटणे , वैद्यकिय सेवा पुरवणे अश्या अनेक कामात पुढाकार घेऊन समाजाला एक नवीन दिशा देण्याचे काम चालू आहे, सरदार घरण्यांच्या मदतीने वीर सेनानींच्या नावाचे पुरस्कार चालू केले आहेत,
श्रीमंत साबूसिन्हा पवार दुर्ग संवर्धक पुरस्कार, हिरोजी इंदुलकर दुर्ग संवर्धन पुरस्कार, सरसेनापती खंडेराव दाभाडे रमंना पुरस्कार असे काही पुरस्कार कायमस्वरूपी चालू केले आहेत. दुर्ग संवर्धन कार्यात सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून सरदार घराण्याच्या वंशजांना एकत्र करून किल्ल्यांवर घेऊन जाण्याचे काम चालू झाले. खरे वीर पुरुष समाजा समोर आदर्श म्हणून आणले तर आजचा युवक परत उमेदीने , ताठ मानेने समाजाचे नेतृत्व करेल व त्याचा आदर्श छत्रपती व त्यांचे सरदार असतील.
२०१९ मधील हि दुर्ग पूजा भारतातील १३१ किल्ल्यांवर ( ऐतीहासीक वास्तू) होणार असून ५० किल्ल्यांवर एकूण ८० पेक्षा जास्त सरदार घराणी किल्ल्यांवर उपस्थित राहणार आहेत ही एक ऐतिहासिक घटना असणार आहेत.महाराष्ट्र सह पंजाब , दिल्ली , मध्यप्रदेश राजस्थान , गुजराथ , दमण, गोवा , केरळ ,कर्नाटक , आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यात पूजा होणार आहेत.