जुन्नर /आनंद कांबळे
शिवराय देशाचे दैवत आहेत त्यांनी देशाला प्रेरना दिली असे प्रतिपादन इतिहास प्रेमी मंडळ पुणे अध्यक्ष मोहन शेटे यांनी केले.किल्ले शिवनेरीवर वतीने तिथीप्रमाणे साजरा असलेल्या शिवजयंती सोहळ्यात
प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
शिवनेरी स्मारक समितीच्या किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येते. रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाहक सुधीर थोरात, शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत मावळे,कार्याध्यक्ष मधुकर काजळे,माजी आमदार शरद सोनवणे,समितीचे उपाध्यक्ष गणेश टोकेकर,चिटणीस रमेश कर्पे,सहचिटणीस चंद्रहास श्रोत्री, गौरीताई शेटेशिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे,बाजार समिती उपसभापती दिलीप डुंबरे , गोविंदराव हिंगे , ऍड प्रेरणा काजळे ,शुभम काजळे,भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी,सुरेश परदेशी तसेच मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिवनेरीची गडदेवता शिवाई मातेस अभिषेक करण्यात आला. बालशिवबांच्या शिल्पाची पालखीतून शिवाई मिरवणूक काढण्यात आली.शिवजन्मस्थळात मुख्य शिवजन्म सोहळा संप्पन झाला.शिवकुंज स्मारकात झालेल्या धर्मसभेत शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष शाहिर हेमंत मावळे ,सुधीर थोरात यानी मनोगत व्यक्त केले.होनराज मावळे यांचा पोवाडे गायनाचा कार्यक्रम संप्पन झाला.गोविंदराव हिंगे ,तसेच मोठ्या संख्येने 'व्रतधारी 'शिवप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येनारा राजमाता जिजाऊ पुरस्कार मनीषा कवडे यांना मोहन शेटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नारायणगाव ग्रामसथांकडून शिवजन्म सोहळ्यासाठी प्रतिवर्षी बाळंतविडा पाठविण्यात आला होता.या प्रथेचे हे 30वे वर्ष आहे. सज्जनगडावरून आलेले विद्याधर स्वामी,देहू येथून आलेले संत तुकाराम महाराजांचे वंशज अमोल मोरे यांनी महाराजांच्या शिल्पास महावस्त्र अर्पण केले.
फोटो ओळी(१)
किल्ले शिवनेरी शिवजन्म सोहळा साजरा करताना मोहन शेटे,सुधीर थोरात व महिला वर्ग (२)बालशिवबा व जिजामातेला अभिवादन करताना मोहन शेटे,सुधीर थोरात ,शाहीर हेमंत मावळे,मधुकर काजळे,मनीषा कवडे
--