नागपूर - "मृत्यू अटळ आहे. माणसे येतात आणि जातात; परंतु काही माणसे आपल्या कर्तृत्वाने अमर होतात. कीर्ती आणि कर्तृत्व ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. कर्तृत्ववान पुरुषाला कीर्ती प्राप्त होतेच असे नाही. तसेच कीर्तीप्राप्त पुरुष कर्तृत्ववान असतातच असे नाही. परंतु आपल्या कर्तृत्वाने अमर झालेल्या आणि कर्तृत्वानेच कीर्ती प्राप्त केलेल्या भाग्यवान मंडळींमध्ये स्व. यशवंतराव चव्हाणांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल" असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी केले. ते नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या१०७ जयंती दिनाप्रीत्यर्थ अजनी चौक, वर्धा रोड, नागपूर येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी "स्व. यशवंतराव चव्हाण हे तळागाळातील कार्यकर्त्यांचे कैवारी होते. त्याचप्रमाणे दुर्बल घटकांवर लक्ष ठेवणारे, शेतीबाबत, पुरोगामी धोरणाबाबत दूरदृष्टी ठेवणारे नेते होते." असे विचार आपल्या अतिथेय चिंतनातून त्यांनी मांडले.
या भावपूर्ण कार्यक्रमात विभागीय अध्यक्ष देविदास घोडे, चरणजितसिंह चौधरी, तात्यासाहेब मते, मधुकर भावसार पापा यादव प्रामुख्याने उपस्थित होते .
याप्रसंगी वसंत घटाटे विजय मसराम, सोपानराव शिरसाट, भाईजी मोहोड, बबलू चौहान, प्रमोद जोंधळे, राजेश तिवारी, मच्छिंद्र आवळे, राजेश टभूर्ने प्रशांत भोसले प्रल्हाद वरोवकर बबलू चौहान अड सुदर्शन पनकुले l आदि मंडळींची उपस्थिती होती.