आता दर १५ मिनिटांनी अँक्वा लाईन मार्गिकेवर प्रवासी सेवा उपलब्ध
• ऑरेंज आणि अँक्वा लाईन दोन्ही मिळून २०० प्रवासी फेऱ्या
नागपूर : अँक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर) मार्गिकेवर २८ जानेवारी २०२० पासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरु करण्यात आली होती या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत आता दिनांक १४ मार्च २०२० पासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो ट्रेन नागरिकांन करीता उपलब्ध असणार आहे. त्यामळे प्रवाश्यांच्या वेळेत बचत होणार आहे. या आधी फक्त ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु होती परंतु आता अँक्वा लाईन वर देखील सिताबर्डी स्टेशन येथून सकाळी ८ वाजता पासून ते सायंकाळी ८.३० वाजता लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून मेट्रो सेवा प्रवाश्यांन करीता उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व नियोजन महा मेट्रोतर्फे करण्यात आले आहे. अँक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि अँक्वा लाईन दोन्ही मिळून दर रोज २०० मेट्रोच्या प्रवासी फेऱ्या कार्यरत राहणार आहे.
६ स्टेशन कार्यरत: अँक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) ११.५ किमी लांबीच्या या मार्गिकेवर ६ मेट्रो स्टेशन लोकमान्य नगर,वासुदेव नगर, सुभाष नगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स, झाशी राणी आणि सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या मार्गीकेवरील मोठ्या प्रमाणात असलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे विद्यार्थी वर्गाकरता येथील मेट्रो सेवा अतिशय फायद्याची ठरत आहे. शिवाय या भागातील औद्योगिक वसाहती अंतर्गत असलेल्या अनेक छोट्या आणी मोठ्या कारखान्यात काम करणारा कामगार वर्गाकरता देखील ही सोय अतिशय महत्वाची आहे.
प्रवासी दर : सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर किवा वासुदेव नगर पर्यंत प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना केवळ २० रुपये मोजावे लागतात.तसेच सिताबर्डी इंटरचेंज ते सुभाष नगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स किंवा झांशी राणी चौक मेट्रो स्टेशन पर्यंतच्या प्रवासासाठी केवळ १० रुपये मोजावे लागतात. या प्रमाणे सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर आणि वासुदेव नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी दर २० रुपये आहे. तसेच लोकमान्य नगर ते खापरी, न्यू एयरपोर्ट, एयरपोर्ट साउथ, एयरपोर्ट आणि जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी दर ३० रुपये आहे. तसेच महा कार्डने मेट्रोचे तिकीट खरेदी केल्यास सर्वच प्रवासी दरांवर १० टक्क्याने सवलत देखील प्रवाश्यांना मिळते.
शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरु झाल्याने नागरिकांना मोठा फायदा होत असून हिंगणा मार्गावर लोकमान्य नगर व आजूबाजूचा संपूर्ण परिसर औद्योगिक व खाजगी कंपन्या, शाळा-महाविद्यालाय तसेच रहिवासी क्षेत्राने व्यापलेला आहे. तेव्हा अधिकारी/कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मार्गाहून सतत प्रवास करतात.