Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २९, २०१७

"समाजकारण,राजकारण आणि मानव"

या पृथ्वी तलावर अनेक सजीवांपैकी बुद्धिवान प्राणी म्हणून या मानव जातीस ओळखतात,अनेक वर्षांपासून हा मानव स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे,जीवन एक संघर्ष म्हणून सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत धावपळीत जीवन जगत आहे,हा मानव सध्यस्थीतीला मी आणि माझं या दोनच गोष्टींसाठी अतूट प्रयत्न करतांना दिसत आहे.
    समाजासाठी लढणारे,स्वतःच्या अस्तित्वासाठी नाहीतर या समाजासाठी वेळ देणारे लाखतले एक असतात,समाजावर संकट उभारलं तर धाव अनेक घेतील पण त्या धाव घेण्यात वर्चस्व साधणारे,स्वार्थ साधणारे समाजसेवक आज घडीला निमार्ण झाले आहेत,अश्या समाजसेवकांना कोणत्या अंगाने समाजकार्य करतो म्हणावं,एखाद संघटना,संस्था उभारली की त्या संस्थानाच्या छताखाली आपले अनुयायी लादून घेणारं अन आपल्या परीने आपलं बळ निर्माण करणार,वर्चस्व निर्माण करणार,आणि पुढील भविष्यासाठी (स्वतःच्या) लढा देणार हे निर्माण झालेली समाजातील व्यथा,खरतर ही व्यथा "नवऱ्याने मारल अन पावसाने झोडपले, दाद कुणाकडे मागायचं.?"अशीच आहे.

    गावपातळीवर एकदा कार्यकर्ता उभारतो,आपल्या गावासाठी झगडतो, अन वरील पुढारीच्या दावणीला बांधलं जात याला काय अर्थ ?,एक छोटंसं उधाहरण,एका गावात गणपत पाटील आमदार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता,साहेबांसाठी तळमळीने कार्य करतो,गावात एकही मत दुसरी कडे जाता कामा नेये यासाठी तुटून कार्य करतो,मग आमदार साहेब अश्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांकडून आपलं मोठं स्वप्न उभारत,पाच वर्षांनंतर गणपत पाटील पंचायत समितीची निवडणूक लढवाव या साठी आमदाराला भेटतो, आमदार म्हणतो तुझं जागा फिक्स,फॉर्म च्या शेवटच्या दिवशी गणपत पाटलाला वाड्यावर बोलावून डाव खेळतो अन गणपत पाटलांचा अर्ज भरणे थांबतो,स्वतःच्या नातेवाईकांतील एकाला उमेदवारी  देऊन पुन्हा गणपत पटलांसारख्या कार्यकर्त्यांना उभारून तेही निवडणूक जिंकतो, असेच क्रम चालू असते, गणपत पाटील पुन्हा पुढच्या पाच वर्षांनी तिकिट विचारतो पुन्हा नातेवाईक येतो पून्हा पक्षासाठी काम करतो,अस चालत चालत गणपत पाटील शेवटी संपला मात्र त्याला न कुठली निवणूक लढवता आलं नाही ना कुशल अस्तित्व,ही परिस्थिती अजचीच आहे, प्रत्येक नेता प्रत्येक पुढारी आमचा वापर करत आहे हे आजचे तरुण वर्ग विसरून चालणार नाही,साहेब साहेब म्हणून आपण आजही या पांढऱ्या पुढाऱ्यांच्या चपला सांभाळत गुलामीत जीवन जगत आहोत,एखाद्या भाकरीच्या तुकड्याची आश्या बाळगून कुत्रा सारख मागे फिरत आहोत,साहेब बी चालाक कुत्रांना कधी उपाशी ठेवत नाही,उपाशी ठेवलं तर दुसरा काही बदल पडणार नाही केवळ झेंडा बदलतो,माणसे तीच विचारसरणी तीच,आश्या तीच.ही मानसिकता कुठून निर्माण झाली या मानव जातीला, का असा स्वार्थपणाला कवटाळून बसलाय हा समाज,कोणी वाली नसेल का याला,मग अस म्हणावं लागेल या देशात माणुसकी नावाचा शब्द कोलमडून गेला,नामशेष झाला,असे म्हणायला काही वावग ठरणार नाही.

    या बुरसटलेल्या विचारसरणीतुन हा माझा समाज(मानव जात) किती दिवस प्रवास करणार अन यात त्यांचं काय साध्य होणार,खायचे आणि दाखवायचे दात वेगळे का असतात,अश्वासनांनी लोकांचे बुद्धी भ्रूष्ट करणारे हे लोक कोण? हा सर्वसामान्य नगरिकांचा प्रश्न आहेत,निःस्वार्थ जीवनाचा स्वास कधी कोणाला मिळाला नाही,ना कधी कोणाला देऊ इच्छितात,हा माझा समाज,हा आपला समाज म्हणत केवळ मिरवून चालत नाही तर त्यास आपलेपणाची उब देणे त्या नेत्यांच, त्या पुढार्यांचं काम नव्हे का..?,खरतर या मानव जातीला पैश्याच वेड ग्रासले आहे,या नोटा साठी आज हा असा जीवन जगत सुटलाय,त्या तुपड्या रुपया साठी हा मानव स्वतःच्या भावाला देखील गजाआड करतोय,मायेचं ममतेच हात म्हणून कधी कुणाच्या खांद्यावर ठेवत नाही,याला कसे म्हणावं माणूस..? बहिणाबाई चौधरी म्हणतात, "माणूस रे माणूस तुझी नियत बेकर,तुझ्या विना बरा गोठ्यातला जनावर",बहिणाबाईंने या माणसांच्या हावेला गोट्यातल्या जनावरांपेक्षा पलीकडची उपमा दिली,जनावरांना दिलेल्या चाऱ्यात गुरे समाधान तर व्यक्त करतात,मात्र हा माणूस कितीही मिळालं तरी आपली झोळी मात्र अजूनही समोरच असते,हीच मानसिकतेतून या देश्यात राजकीय पुढाऱ्यांचा जन्म होत आहेत.

   मग अश्या अवस्थेत या तरुण वर्गाचं कार्य काय, तर तरुणांनी अश्या भ्रष्ट राजकीय व सामाजिक कार्यांच्या नावावर लुबाडणाऱ्या दृष्ट राजकारणी माणसापासून दुरच राहिलेलं बर, दूर म्हणण्यापेक्षा अश्या नेत्यांना वेळीच ठेचून काढणे काळाची गरज आहे,ठेचून म्हणजे वैचारिक दृष्टीने,समाज संघर्षाने आणि युवा शक्तीने,आपल्याला मिळालेल्या अधिकाराणे,आपला लढा केवळ सत्याच्या दिशेने,अहिंसेचा मार्गाने व सामाजिक दृष्टीने एक पाऊल स्वतःपासून सुरवात करु आणि अश्या दृष्ट नेत्यांकडून होणाऱ्या संविधानाचा,अभिव्यक्तीचा ऱ्यास थांबवण्यासाठी लढा देऊ,हेच लढा शाहिद भगतसिंग यांनी दिल होता ,हाच लढा भगवान बिरसा मुंडानी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभारला होता,याच मार्गाने आपलाही लढा असला पाहिजे,समाज कार्य म्हणजे,महापुरुषांच्या झीजलेल्या आयुष्यातून दिसते, स्वतः अस्तित्व मिटवून हा प्रख्यात समाज स्थापने म्हणजे समाजकार्य होय,याच पार्श्वभूमीवर महात्मा फुलेंनी आपल्या पत्नी सावित्रीमाईंना एक सांख्यिक उधाहरण देऊन समाज कार्याची ओळख पटवून दिले,सावित्रीमाई कडून एका ज्वारीचे दाण मातीत रुजवण्यास लावले व त्यास खतपाणी घालून तब्बल सहा महिन्यांनी त्या बियाणाचे रोपट्यात व रोपटीचे झाडात निर्माण होऊन,त्यास एक कनस उगवले ,सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबांनी ते कणस आणण्यास सांगून त्या कनसात सुरवातीचा पेरलेला बियाणे शोधण्यास लावले,यावरून ज्योतिबा म्हणतात सावित्रीमाईंना की जो माणूस या बियांना सारख स्वतः झीजतो आणि कनसरुपी समाजाला उभा करतो न तोच खरा समाजसेवक आणि तोच कार्य मला अपेक्षित आहे,यावरून त्यांनी केलेल्या कार्याची,व उभारलेल्या चळवळीची शोभित चित्र दिसते...
 
लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
              मदनूर जि. कामारेड्डी
              मो.८००७८७००२६

 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.