Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २९, २०१७

पीक विम्याचा लाभ कधी


  • संतप्त शेतकऱ्यांच्या तहसीलदारांना प्रश्न ;
  • पीक विमा योजनेचा लवकरच तालुक्यात होणार सर्व्हे : अक्षय पोयाम


पारशिवणी ::
शेतकऱ्याच्या हितार्थ केंद्र शाषणाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधान मंत्री पीक विमा योजनेचे तीन तेरा वाजल्याचे दाखले तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात देत आहेत.या योजने अंतर्गत तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी धान पिकाला विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी १,९०० रुपयांचा प्रीमियम चा भरणा केलेला होता.पिकावर संकट आल्याने पिकाची मोठ्या प्रमानात हानी झाली ज्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांनि विमा योजनेकडे डोळे रोखून धरले होते पण ना हाती पीक आल ना पीक विमा योजनेचा लाभ ज्यामुळे तालुक्यातील बोर्डा येथी संतप्त शेतकऱ्यांनी पारशिवणी तहसीलदार अक्षय पोयाम यांची भेट घेतली.


तालुक्यात धान पिकाचे ९ हजार १७६ हेक्तर चे क्षेत्र आहे.त्यानुसार वर्ष २०१७-१८ मध्ये खरीप हंगामात ९ हजार ३१७ हेक्तर क्षेत्रावर धान पिकाची रोवणी शेतकऱ्यांच्या मते अपेक्षित होती.परंतु ४ हजार ३३७ हेक्तर क्षेत्रावर धान पिकाची लागवट करण्यात आली.पाण्याच्या अभावाने क्षेत्रातील ५३% टक्के,४ हजार ९८० हेक्तर क्षेत्र हे धान पिका पासून नापेर राहिलेले आहे.बोर्डा येथील माजी उपसरपंच मंगेश बालगोटे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने तहसीलदार अक्षय पोयाम यांची भेट घेत तालुक्यातील पिकांचे सर्व्हे करण्यात दिरंगाई करत असलेल्या संबधित अधिकाऱ्यांची तक्रार केली सोबतच पीक विमा योजनेचा लाभ मिळण्याबाबद सहकार्य करण्याची दाद मागितली ज्यावर पोयाम यांनी खंड विकास अधिकारी पारशिवणी,भारतीय कृषी विमा कंपनी कडून लवकरच संयुक्त पिकांचा सर्व्हे करण्यासाठी प्रतिनिधी मंडळ पाठविण्याची हमी दिली.


#पेंच प्रकल्पाने दगा दिधला.
शेतकऱ्यांनी पीक विमा योजने कडे धाव घेत प्रति हेक्तर १,९०० रुपयांचा भरणा करत विमा काढला ज्यातून प्रति हेक्तर नुकसान भरपाई ३९,००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडणार होते.ज्यातून पिकाचे नुकसान भरपाई झाल्याचे समाधान शेतकऱ्यांना झाले असते परंतु विम्याचा लाभ न मिळाल्याने योजनेचे तीन तेरा वाजल्याचे स्वर शेतकरी वर्गात निघत आहेत. दुसरी कडे पेंच प्रकल्पातून वेळेवर पिकाला पाण्याची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांच्या हाती येणार पीक माती मोल झालं.अश्यात ना धरणाला पाणी न विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या हातात न आल्याने त्यांच्या समक्ष गँभीर प्रश्न उभे झालेले आहेत.निवेदनाच्या प्रति पारशिवणी कृषी अधिकारी,एसडीओ रामटेक,खंड विकास अधिकारी यांना मंगेश बालगोटे,युवराज बालगोटे,ज्ञानेशवर मोहंने,गणेश नसुरे,संजय इंगोले,टेकचंद सुरकर,रणवीर वाडीभस्मे यांनी निवेदन दिले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.