Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

कट्टा

सकाळची कामाची घाई, मुलीचा डबा यामुळे मॉर्नींग वॉकला वेळ मिळत नव्हता तेव्हा सायंकाळी रोज फिरायला जायचे ठरविले. कारण, आता दार, खिडक्‍या बंद असलेल्या घराला ऑक्‍सीजन मिळणेही कठीण झाले आहे. शिवाय दिवसभरात वाचलेल्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी सांयकाळचा गार वारा खूप साथ देतो. विचारांच ओरलिंग केलं जात, शंकाच रिपेरींग केलं जात. ऐकू येणारे आवाज, डोळषानी दिसणाद्यया घटना, गर्दीतून स्वतःला सावरत-सावरत पुढे जातांना एका घरासमोरचा रोज भेटणारा प्राजक्ताचा सडा, अगदी पाऊस येण्याआधी जसं सुखद वाटतं... तशी सायंकाळची छटा. पण चांगल्या सवयीची लगेच लत लागते तसचं सायंकाळचे साडेपाच वाजले की पाय आपोआपच घराबाहेर पडू लागते. त्या रस्त्यावर रोज वेगवेगळया लोकांचे चेहरे दिसत होते. घराशेजारीच एक विष्ठलाचे मंदीर होते. सहाच्या ठोक्‍याला बरोबर आरती व्हायची. कॉलनीतल्या सर्व वयस्कर मंडळींना जसा घंटानाद आवर्जून बोलावतो आणि ते लगबगीने हातातली काम टाकून मंदिरात धावत येतात. काठी सांभाळत... चष्मा लावत... धोतराचा टोक मोठया तावातावात हलवत मंदीराची पायरी चढायचे.

थोडा वेळ तरी परमेश्वराला दषावा म्हणून आरतीत मी ही सामील व्हायचे. प्रसाद घेवून बाहेर पडले की पुन्हा माझा फेरफटका प्लॉट नं.15 पासून प्लॉट नं.32 पर्यंत पूर्ण व्हायचा. खूप हलकं वाटायचं, अगदी तरल हवेच्या झोतात उडणाद्यया फुलपाखरांसारखं. फेरफटका त्याच रस्त्यातल्या मंदीरात येवून पोहचायचा. मंदीराबाहेर एक जुना बाक होता. त्या बाकावर रोज वेगवेगळी वयस्कर मंडळी बसलेली असायची. मंदीराच्या ओटयावर खूप लोकं बसायची... जवळपास 60-62 च्या वयातली. काही जण तर अजूनही तरुण दिसत होते. अगदी जून महिन्यातल्या मृगाच्या पहिला पावसासारखे.
पायांना थकवा आला होता. कट्टषाशेजारीच मंदीराच्या पायरीजवळ बसले. एक-एक चेहरा न्याहाळत बसले. खूप वेगवेगळषा चेहद्ययांचा अभ्यास करायला मिळाला. कुणाच्या डोळषात उंबरठा होता.... वाट पाहणारा. कुणाच्या डोळषात ओढ होती... खूप वर्षानंतरच्या भेटीची. काही चेहद्ययावर हुरहूर होती... आपूलकी होती पण स्वाभिमानाने भरलेली. कुणाच्या चेहद्ययावर आनंद दिसत होता.... खळखळून हसणाद्यया मुलासारखा. या वयातही आभाळभर शुभेच्छांनी बहरलेलं मन तरुण दिसतं होतं.... वाढदिवस होता कदाचित त्यांचा. काही चेहद्ययात इतिहासाच्या मशाली होत्या, काही चेहद्ययात भविष्याच्या वाती होत्या. प्रत्येकाने नात्याची फुलवात तेवत ठेवण्याचा जणू प्रण घेतला होता.
हळुहळू काहीच दिवसात बद्ययाच जणांचा परिचयही संवादातून माहीत होत गेला. दिनकरराव... रिटायर्ड बॅंक अधिकारी. मुलगा, सुन विदेशात राहतात. त्यांना मात्र वडिलोपार्जित घरीच राहायचे होते. ""मुलगा आग्रह करतो हो मला न्यायचा, पण मी काय करु हो तिथे... हे दोघे आपले बाहेर.... मी काय गोद्यया मुलींना बघू कां तिथे एकटाच''. असं म्हणत खूप खळखळून हसायचे. त्यांच्या सर्वांच्या हास्याच्या खळखळाटात मला मात्र त्यांचा एकटेपणा स्वतःलाच कवटाळून रडतांना दिसला. कमलाकर सोमलवार शिक्षक होते पण निवृत्तीनंतरही घरी वेळ जात नाही म्हणून पत संस्थेत नोकरी करीत होते. दिवसभर घडलेल्या घडामोडी खूप रंगवून सगळषांना सांगायचे. पण या वयात नोकरी करुन कसला विरंगूळा होतो यांचा.... हा प्रश्न मला पडला होता. एक 65 वर्षे वयाचे गृहस्थ होते दत्ताजी, कदाचित अस्थमा होता त्यांना. पण त्यांच्याच बोलण्यातून एक सत्य आणखी कळले ते म्हणजे एकूण चैदा आजार होते त्यांना. तरीही इतकं खंबीर काटक व्यक्तिमत्त्‌व, आवाजही कणखर पाहून थक्क झाले मी. कधी-कधी इच्छाशक्तीचं बळ आयुष्य बिनधास्त होऊन जगायचं शिकवते. मी दिड किलोमिटर चालून पाय थकले माझे आणि दत्ताजी...!!! रोज एक नवा किस्सा सांगायचे. कधी कधी धापही लागायची त्यांना. पण पिशवीतली पाण्याची बाटली काढून तोंडाला लावायचे आणि परत नवचैतन्याचा बार उडवायचे. मग गोपालसेठ ..... नावाचे मारवाडी गृहस्थ, पांढद्यया शुभ्र पोषाखात ""नमस्ते जी! नमस्ते'' करत कट्टषावर बसायचे. खिशातलं संर्त्याच्या गोळीचं पाकीट काढून एक-एक गोळी प्रत्येकाच्या हातावर टेकवत हसतमुखाने ""जय श्रीकृष्ण'' म्हणायचे. एका कार दुर्घटनेत त्यांचा पस्तीस वर्षाचा मुलगा व पत्नीचं निधन झालं होतं, अगदी वर्षभरापूर्वी. तिथे येवूनही ते कधी मंदीरात जातांना नाही दिसले. म्हणायचे, ""ज्यांच्यासाठी जगलो त्यांना हिरावून घेतलं परमेश्वरांनी.... आता जगावसं वाटत नाही आहे मग जाऊन करावं काय याच्या पायाशी''
या कट्टषावर येणारी सर्व माणसं खरं तर खूप दुःखी होती. पण त्यांचे चेहरे फार सुखी होते. औषधांच्या बाटल्याही पुष्पगुच्छासारख्या माननारी ही सर्व मंडळी होती. एका निवांत दुपारनंतर या संध्याकाळचीच जणू ते वाट पहात राहायचे. बाजूलाच एक भाजीवाली अगदी मोजक्‍याच भाज्यांसोबत रोजच बसायची.. दिलखूलास संवाद करायची साद्ययांशी. तिलाही काहीतरी दुःख असेलच की, तरीच तर उदरनिर्वाहासाठी भाजी विकत बसली होती. पण खूप आनंदी दिसायची. मंदीराच्या बाहेरचे फुलवाले दादा... पंडीतजी म्हणायचे त्यांना सगळे. कारण मंदीराच्या आतला विठोबा आणि कट्टषावरचे तरुण आजोबा साद्ययांना नमस्कार करुनच कामाला सुरवात करायचा. सारखा अभंग गात राहायचा. पण एका गंभीर आजाराने त्याला ग्रासले होते. ब्लड कॅन्सर होता त्याला. दर महिन्याला मुंबईला जावे लागायचे त्याला उपचारासाठी. गावातली शेतजमीन विकूनही हाती निराशाच आली होती त्याच्या. एकीकडे आयुष्याच्या उतारवयातही मनभरुन जगणारे कट्टषावरचे लोक आणि दुसरीकडे मरणाची शेवटची घटका मोजत इवल्या-इवल्या क्षणातही पूर्ण आयुष्य अभंगासारखं रसाळपणे जगणारा दादा. मला तर सुखाची परिभाषाच करता येत नव्हती.
भाजीवाली कडची ताजी टवटवीत मेथीची जुडी घेतली न्‌ घिराकडे परतली. भाजी निवडताना विचाराचा लोंढा अंगभर संचारला. केवळ थोड्‌या वेळेच्या सहवासासाठी ही सर्व मंडळी या कट्टषावर रोज एकत्र यायची. प्रत्येकाची वेगळी कहाणी. प्रत्येकाची वेगळी समस्या. पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन अगदी सारखा... सकारात्मक. त्यांच्या शब्दांमध्ये एकमेकांबद्दल प्रोत्साहन होते.. जिद्द होती. नवनिर्मित आयुष्य जगण्याची प्रयोगशाळा होती. पण घरी परतल्यावर पुन्हा त्याच दुःखाच्या काळोखाची झालर पांघरुण... उद्याची वाट पाहत... एक पहाट व्हायची. पण सुर्यास्त आवडायचा साद्ययांना कारण तो मैत्रीचा सुगंध घेवून यायचा. मंदीरातला घंटानाद, तो कट्टा परत त्यांना बोलवायचा. हसण्याचा-गप्पांचा-टाळषांचा प्राजक्त बरसण्याकरता. कट्टा नव्हे तो तर विसावा होता. जीर्ण, थकलेल्या शरीरात उरलेल्या श्वासांचा विसावा! आयुष्यभर खूप चालून, झिजून कंटाळलेल्या मनाचा विसावा!
वयाची साठी-सत्तरी फेकुन
""मै जिंदगी का साथ निभाता चला गया...
हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया...''
या देवआनंदच्या गाण्याची आठवण करुन देणारा सदाबहार विसावा!

तृप्ती नवारे
नागपूर
मोबाईल क्र.9096106894



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.