Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

corona लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
corona लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, डिसेंबर २०, २०२२

कोरोना पुन्हा शिरला; केंद्राच्या गाईडलाईन जारी  | Covid-19 update: India Guidelines

कोरोना पुन्हा शिरला; केंद्राच्या गाईडलाईन जारी | Covid-19 update: India Guidelines


कोरोना पुन्हा शिरला; केंद्राच्या गाईडलाईन जारी
Covid-19 update: India Guidelines PDF


जपान, यूएसए, कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये अचानक वाढलेली कोरोना प्रकरणे पाहता, नेटवर्कद्वारे व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी सकारात्मक केस नमुन्यांचा संपूर्ण अनुक्रम तयार करणे आवश्यक आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय आरोग्य सेक्रेटरी सर्व राज्यांना विनंती करण्यात आली आहे की, शक्य तितक्या सर्व पॉझिटिव्ह केसेसचे नमुने दररोज, नियुक्त केलेल्या INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीज (IGSLs) कडे पाठवले जातील. चीन आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोरोना वाढला असून, याच्या काही धक्कदायक बाबीही माध्यमातून समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारतातही केंद्र सरकारनं राज्यांसाठी पत्राद्वारे मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड-19 महामारीच्या संदर्भात ‘आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली आहेत आणि वेळोवेळी ती अद्यतनित केली आहेत.


 सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराबाबत उड्डाणातील घोषणा उड्डाणांमध्ये/प्रवासात आणि प्रवेशाच्या सर्व ठिकाणी करण्यात येणार आहे.


  • प्रवासादरम्यान कोविड-19 ची लक्षणे असलेल्या कोणत्याही प्रवाशाला मानक प्रोटोकॉलनुसार वेगळे केले जावे

  • उक्‍त प्रवाशाने मास्क घातलेला असावा, फ्लाइट/प्रवासात इतर प्रवाशांपासून वेगळे केले जावे आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला आयसोलेशन सुविधेत हलवले जावे.

शारीरिक अंतर सुनिश्चित करून De-boarding डी-बोर्डिंग केले पाहिजे.

v. प्रवेशाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आरोग्य अधिकार्‍यांनी सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले पाहिजे.

vi स्क्रीनिंग दरम्यान लक्षणे आढळलेल्या प्रवाशांना ताबडतोब वेगळे केले जावे, आरोग्य प्रोटोकॉल (वरीलप्रमाणे) नुसार नियुक्त वैद्यकीय सुविधेत नेले जाईल.

vii सर्व प्रवाश्यांनी त्यांच्या आरोग्यावर आल्यानंतर त्यांच्या जवळच्या आरोग्य सुविधेवर स्वत:चे निरीक्षण करावे किंवा त्यांना कोणतीही सूचक लक्षणे आढळल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक (१०७५)/ राज्य हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा.


ln view of sudden spurt of cases being witnessed in Japan,USA,Korea,Brazil & China, it's essential to gear up whole genome sequencing of positive case samples to track variants through Indian SARS-CoV-2 Genomics Consortium(INSACOG)network, writes Union Health Secy to States & UTs All states are requested to ensure that as far as possible samples of all positive cases, on a daily basis, are sent to the designated INSACOG Genome Sequencing Laboratories (IGSLs) that are mapped to the States and UTs: Union Health Secretary 

Guidelines PDF >

(Central govt big decision regarding Coronavirus new Guidelines published for states)

 




 Dated the 21st November 2022 
Government of India Ministry of Health and Family Welfare

Guidelines for International Arrivals (in supersession of guidelines issued on the subject on 2nd September 2022) Introduction Ministry of Health & Family Welfare has issued ‘Guidelines for International Arrivals’ in context of COVID-19 pandemic and updated the same from time to time. 


The present guidelines are being revised in light of sustained declining COVID-19 trajectory and significant advances being made in COVID-19 vaccination coverage both globally as well as in India. Scope This document provides protocols to be complied by international travellers as well as points of entry (airports, seaports and land border) and shall be valid w.e.f. 22nd November 2022 (00.01 Hrs IST) till further orders. 


A.1. Planning for Travel 
i. All travellers should preferably be fully vaccinated as per the approved primary schedule of vaccination against COVID-19 in their Country. 

A.2. During Travel ii. In-flight announcement about the ongoing COVID-19 pandemic including precautionary measures to be followed (preferable use of masks and following physical distancing) shall be made in flights/travel and at all points of entry. iii. Any passenger having symptoms of COVId-19 during travel shall be isolated as per standard protocol 

i.e. the said passenger should be wearing mask, isolated and segregated from other passengers in flight/travel and shifted to an isolation facility subsequently for follow up treatment. 

A.3. On arrival
 iv. De-boarding should be done ensuring physical distancing. 
v. Thermal screening should be done in respect of all the passengers by the health officials present at the point of entry. vi. The passengers found to be symptomatic during screening shall be immediately isolated, taken to a designated medical facility as per health protocol (as above). 

vii. All travellers should self-monitor their health post arrival also shall report to their nearest health facility or call National helpline number (1075)/ State Helpline Number in case they have any symptoms suggestive.

मंगळवार, जून २२, २०२१

#Delta #Plus #Variant चे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली; काय आहे ही नवी बिमारी !

#Delta #Plus #Variant चे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली; काय आहे ही नवी बिमारी !

21 cases of Delta Plus virus were detected in state 

जगभरासह भारतात कोरोनच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अलीकडे देशातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. हा व्हायरस वेगाने पसरत गेल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशी भीती तज्त्रांनी व्यक्त केली आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ लस ही डेल्टा व्हेरिएंटवर कमी प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे त्यामुळे लसीकरणानंतरही लोकांना कोरोनाची भीती सतावत आहे.

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळले राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत असं त्यांनी सांगितले.


Delta Plus Variant Of Coronavirus Has Been Detected In 21

संपूर्ण जगातच कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतालाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका बसला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर आता कोरोनाच्या डेल्टा+ व्हेरिएंटची चर्चा सुरू आहे. यातच देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 22 रुग्ण समोर आले आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना पत्रही लिहिले आहे. सध्या डेल्टा व्हेरिएंट जगातील 80 देशांत पसरला आहे. तर डेल्टा प्लस व्हेरिएंट नऊ देशांत आढळून आला आहे. यात भारतासह अमेरिका, इंग्लंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, चीन, नेपाळ, रशिया आणि जपानचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चे 22 रुग्ण आढळे असून, यातील 16 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळून आले आहेत. तर उरलेले सहा रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशात सापडले आहेत.




शुक्रवार, जानेवारी ०१, २०२१

मेट्रोत चुंबन करून नोंदवला कोरोनाच्या नियमांचा निषेध

मेट्रोत चुंबन करून नोंदवला कोरोनाच्या नियमांचा निषेध

कोरोना वायरस के चलते दुनिया के कई हिस्सों में लॉकडाउन जैसे हालात और पब्लिक स्पेस में कई तरह की पाबंदियां देखने को मिली हैं. कई शहरों में लोगों का लॉकडाउन को लेकर सब्र का बांध भी टूटता नजर आ रहा है. ऐसा ही कुछ रूस में देखने को मिला जब कोरोना के चलते लगी पाबंदियों के खिलाफ लोग मेट्रो में किस करने लगे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या जगभरात नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्कचे नियम न पाळल्यास शिक्षा होऊ शकते. मात्र गेले कित्येक महिन्यांपासून नियमांचं पालन करून आता नागरिकही कंटाळले आहेत. अजून किती महिने नियम पाळायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना कंटाळलेल्या रशियातील तरुणांनी अनोख्या प्रकारे निषेध केला आहे.


रशियाच्या Yekaterinburg शहरातील मेट्रोमध्ये तरुण-तरुणींनी चुंबन घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा निषेध केला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला धोका पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न नव्हता, असं नियमांचा निषेध करणाऱ्या काहींनी लाईफ नावाच्या संकेतस्थळाशी संवाद साधताना सांगितलं. रशियाच्या संगीत विश्वातले बरेचजण कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना विरोध करत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं तरुण-तरुणींनी म्हटलं.

प्रियकर/प्रेयसीचं चुंबन घेऊन निषेध करणाऱ्या तरुण-तरुणींनी सरकारच्या विसंगत धोरणांकडे लक्ष वेधलं. 'कॉन्सर्ट्स, रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा धोका जास्त असल्याचं सरकारला वाटतं. नाईट क्लब्ज आणि इव्हिनिंग शोज बंद ठेवण्यात आले आहेत. पण मेट्रोमध्ये गर्दी आहे. त्या गर्दीतून नागरिक प्रवास करत आहेत. मात्र त्याबद्दल सरकारला काहीच वाटत नाही. मेट्रोतील गर्दीमुळे कोरोना पसरण्याची सर्वाधिक शक्यता आहे,' असं मत अनेकांनी व्यक्त केलं.



कोरोना संकटाचा मोठा फटका संगीत क्षेत्राला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगितिक कार्यक्रम करण्यासाठी बंदी आहे. त्यामुळे जगातील संगीत क्षेत्राचं कंबरडं मोडलं आहे. संगीत विश्वातून अनेक जण कोरोना नियमांचा निषेध करत आहेत. त्याला तरुणाईचाही पाठिंबा मिळत आहे.

सोमवार, नोव्हेंबर ०२, २०२०

काटोलात तीन आठवड्यानंतरचा उच्चांक; आणखी 14 Positive

काटोलात तीन आठवड्यानंतरचा उच्चांक; आणखी 14 Positive



कोविड रुग्ण वाढतीवर, दुर्लक्ष करू नये सूत्राचा सल्ला

आता पर्यंत एकूण 1277 रुग्ण , मृत 35

काटोल : तालुक्यात सोमवारला कोविड- 19 चे एकूण चौदा (14 ) पोसिटीव्ह केस मिळाले.काटोल शहरात आयुडीपी 2, धंतोली, चांडक नगर आदी भागातून सहा केस तर गरॅमिन भागात 8 केस मिळाल्याने तीन आठवडयातील उच्चांक गाठला आहे.रिधोरा येथे आठवड्यात सलग 3 दिवसात पोसिटीव्ह केस मिळाल्या आहे. याशिवाय मोहखेडी 2, कोंढाळी, हरदोली पेपर मिल,मूर्ती,वंडली (सावरकर), गोंडीदिग्रस आदी ठिकाणी प्रत्येकी एक पोसिटीव्ह केस मिळाल्याने तालुक्यात एकूण 14 नवीन पोसिटीव्ह केसची नोंद करण्यात आल्याचे वैधकीय सूत्रांनी माहिती दिली. कोविड चा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समजून नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. परंतु याकडे दुर्लक्ष नकरता खबरदारी घेण्याचा सल्ला तहसील कोविड नियंत्रण कक्षातुन देण्यात आला आहे. .तालुक्यात एकूण 1277, पोसिटीव्ह , उपचार करीत असलेले 75, दुरुस्त 1167 तर मृतक 35 यात शहरी 25 व ग्रामीण 10 मृतकाचा समावेश असल्याचे ग्रेसमीन रुग्णालय काटोलचे वैधकीय अधिकारी डॉ सुधीर वाघमारे यांनी दिलीआहे.

शुक्रवार, ऑक्टोबर ०९, २०२०

50 खाटांचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू

50 खाटांचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू





आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन...

राजुरा.. जिल्हा. चंद्रपूर...
राजुरा तालुक्यातील कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे . आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज दिनांक नऊ ऑक्टोबर ला रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लहू कुडमेथे ,डॉक्टर बांबोळे, डॉक्टर अशोक जाधव, डॉक्टर अमित चिद्धमवार, डॉक्टर डाखोळे, डॉक्टर अनिता आरके, डॉक्टर शेख ,डॉक्टर स्नेहल डाहूले, डेडिकेट कोवीड हेल्थ केअर सेंटर प्रमुख डॉक्टर विवेक लांजेकर, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
राजुरा तालुक्यातील रुग्णांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासकीय यंत्रणेवर तान वाढलेला आहे. कोविड उपचारासाठी प्रत्येक रुग्णांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात येते.त्यामुळे राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत पूर्ण झाल्यानंतर येथे सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केलेले होते. त्यामुळे अनुषंगाने आमदार सुभाष धोटे यांनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून याबाबत मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आजपासून पन्नास खाटांचे रुग्णालय कोविड रुग्णांच्या सेवेत रुजू झाले. कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजन पल्स रेट 90 पर्यंत आलेल्या रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहे.

बुधवार, ऑक्टोबर ०७, २०२०

 जिल्ह्यात 24 तासात 166 बाधित; दोन बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 24 तासात 166 बाधित; दोन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 7 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 166 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 472 झाली आहे. यापैकी 8 हजार 99 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 194 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.





आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासामध्ये दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्येछोटा नागपूरचंद्रपुर येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 6 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरदुसरा मृत्यू सिंधी कॉलनी परिसर रामनगरचंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तरदुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. दोनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 179 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 170, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 65, पोंभुर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील 13, मुल तालुक्यातील 14, जिवती तालुक्यातील पाचकोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच,  नागभीड तालुक्‍यातील सहा, वरोरा तालुक्यातील आठ ,भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील पाच,  सिंदेवाही तालुक्यातील चारराजुरा तालुक्यातील 10 तर नागपूर येथील एक असे एकूण 166 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील दुर्गापुरघुटकाळा वार्डविठ्ठल मंदिर वार्डहॉस्पिटल वार्डप्रगती नगरविद्यानगरतुकूमगिरणार चौक परिसरभिवापूर वार्डइंदिरानगरजल नगर वार्डबाबूपेठसरकार नगरपठाणपुरा वार्डघुग्घुसद्वारका नगरीओमकार नगरहनुमान नगर,भाना पेठ वार्डघंटाचौकीबोर्डाबापट नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील रेल्वे वार्डविद्या नगर वार्डगौरक्षण वार्डसाईबाबा वार्डबामणी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील पंचशील वार्डबामणवाडासोमनाथपूर वार्डमानोलीकढोलीम्हाडा कॉलनी परिसरजवाहर नगरसास्ती,धोपटाळा भागातून बाधीत पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील यात्रा वार्डआंबेडकर वार्डसलीम नगरटेमुर्डागांधी वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील कहालीचौगानमालडोंगरीविद्यानगरपरिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.भद्रावती तालुक्यातील विस्लोनजुना सुमठाणाझिंगोजी वार्डसुरक्षा नगरएकता नगर,किल्ला वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील अंतरगाव,व्याहाड भागातून बाधित ठरले आहे.सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही,भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील डोंगरगावपेंढरीमोहाडीवसुंधरा कॉलनी परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील मोटेंगावनेताजी वार्डटिचर कॉलनी परिसरराजीव गांधी नगरनेहरू वार्डगुरुदेव नगर  भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर एकहेकाडीराजोलीताडाळा परिसरातून बाधित ठरले आहे.

काटोल तालुक्यात शहरापेक्षा ग्रामीण रुग्ण जास्त

काटोल तालुक्यात शहरापेक्षा ग्रामीण रुग्ण जास्त




आज बुधवारला तालुक्यात 11 Positive

अकराशे आकडा उद्या पार होणार...

#एकूण पोसिटीव्ह 1098, उपचार 174, बरे झाले905, मृत 19


काटोल : तालुक्यात कोविड -19 पोसिटीव्ह केसेस अकराशे पर्यत पोहचल्या त्यामुळे नगर व तालुका प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन उपाय योजना आखल्या यात जनतेनी सहकार्य केल्याने काही अंशी यश आल्याचे दिसून येते. प्राप्त माहितीनुसार शहरात कमी व तालुक्यात ग्रामीण भागात गलेय दिवसात व आज पण केसेस वाढ दिसून येते. ग्रामीण रुग्णालय व 3 पीएचसी सेंटर मधून करोना संबंधित रॅपिड अँटीजन टेस्ट दररोज घेण्यात येते .यात बुधवारला 63 टेस्ट घेण्यात आल्या.काटोल शहरात 4 तर ग्रामीण भागात 7 असे एकूण 11 पोसिटीव्ह रुग्ण आढळले. शहरात जनता कर्फु मुळे जागरूकता आले. जनता सलग चार दिवस घराबाहेर पडली नाही . उपचार व पुरेसा आराम केल्याने पोसिटीव्ह केसेस कमी निघत असल्याचे वर्तविले जात आहे.आरोग्य प्रशासनाचे मते काही सकारात्मक बदल झाला असे गृहीत धरता पुफहिल आठवड्यात खरा अंदाज येईल. याकरिता सर्वानी शासनाचे दिशा निर्देशाचे पालन करण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालय काटोल नव्याने रुजू झाले वैधकीय अधीक्षक डॉ सुनील डवरे यांनी दिला., काटोल शहरात बुधवारला जानकी नगर परिसर 2, शनी चौक, व शिंदे ले आऊट प्रत्येकी 1 असे चार पोसिटीव्ह आढळल्याचे डॉ सुधीर वाघमारे यांनी सांगितले.तसेच ग्रामिण भागात कंलभा 3,तर सोनोली, मोहखेडी, पारडसिंगा, पठार आदी ठिकाणी प्रत्येकी 1 असे सात पोसिटीव्ह मिळाल्याचे नायब तहसीलदार शैलेश टिपरे यांनी माहिती दिली. तालुक्याचा पोसिटीव्ह रुग्ण आकडा 11 वाढून 1098 पोहचला असून उद्या अकराशे आकडा ओलाडणार हे नक्की...

सन्मित्र सैनिकीच्या मुख्याध्यापकांचे कोरोनाने निधन

सन्मित्र सैनिकीच्या मुख्याध्यापकांचे कोरोनाने निधन



चंद्रपूर जिल्ह्यातील नामांकित सन्मित्र सैनिकीच्या मुख्याध्यापकाचे कोरोनाने निधन झाले. सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज अलोणी हे कोरोनाने आजारी होते.

Military education is very essential for everyone. So military school is important असे ब्रिद घेऊन त्यांनी सैनिकीचे धङे देत होते. B.Sc. B.Ed. M.S.W असे त्यांचे शिक्षण झाले होते.

या मागासलेल्या भागातील लोकांच्या गरजा भागविणारी चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित सामाजिक-सांस्कृतिक संस्था म्हणून ‘सन्मित्र मंडळ’ ओळखले जाते. त्याच संस्थेची शैक्षणिक धुरा ते मुख्याध्यापक म्हणून पार पाङत होते. मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाल्याची बातमी पुढे आली.

गुरुवार, ऑक्टोबर ०१, २०२०

कोरोना रुग्णाचा मृतदेह घरीच ठेवला; कारवाईचे संकेत

कोरोना रुग्णाचा मृतदेह घरीच ठेवला; कारवाईचे संकेत

प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यावर कारवाई करू... उपविभागीय अधिकारी -शिंदे

▪️कोरोणा रुग्णाचे अंत्यविधी प्रकरण






शिरीष उगे(भद्रावती): कोराणा रुग्णाचा वाटेत मृत्यू झाल्याने त्याबाबतची माहिती प्रशासनाला दिली नाही व परस्पर तो मृतदेह रात्रभर घरी ठेवल्याने शेकडो लोकांनी त्यांची भेट घेतली या प्रकाराने संतप्त झालेल्या वॉर्डातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्याचे वर कारवाई करू असे उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी सांगितले.


शहरातील भोजवार्ड येथील कुटुंबातील नातलग हा कोरोना पॉझेटिव्ह निघाल्याने जैन मंदिर येथील कोव्हीड सेंटर मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते व त्याला होम क्वारन टाईन साठी घरी आणले असता त्याची प्रकृती बिघडली हा प्रकार बघता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी या रुग्णाला कोविड सेंटर येथे उपचारासाठी रेफर केले असता त्याचा मृत्यू झाला.

मात्र हा घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या कुटुंबांनी शेजाऱ्यांना सांगितला नाही व अकस्मात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नातलग तसेच शेजारी अशा शेकडोनी त्याच्या घरी भेट घेतली.


वैद्यकीय पथक घरी दाखल होताच नागरिकांना हा प्रकार लक्षात आला व आपल्याला माहिती लपवून अंधारात ठेवले असल्याचे चर्चा चांगलीच रंगली. प्रशासनाची दिशाभूल करून असा प्रकार करणाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी नगर परिषद येथे चालू असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या बैठकीत भोज वार्ड येथील नागरिकांनी या प्रकाराबाबत माहिती दिली.

प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर योग्य कारवाई करू असे उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी सांगितले यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, उपविभागीय अधिकारी शिंदे तहसीलदार महेश शितोळे, आरोग्य अधिकारी आनंद किनाके नगराध्यक्ष अनिल धानोरकर इतर अधिकारी उपस्थित होते.

मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०

 चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 10009

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 10009



 आतापर्यत 5876 बाधितांना डिस्चार्ज

उपचार सुरु असणारे बाधित 3984
जिल्ह्यात 24 तासात 197 बाधितएका बाधिताचा मृत्यू
चंद्रपूरदि. 29 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 197 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 हजार 9 झाली आहे. यापैकी 5 हजार 876 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 984 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासामध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये तुकुमचंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा  समावेश आहे. या बाधिताला 28 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 149 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 140, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन तर भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 99 , पोंभूर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील 12, चिमूर तालुक्यातील पाचमुल तालुक्यातील पाचगोंडपिपरी तालुक्यातील तीनब्रह्मपुरी तालुक्यातील आठ,  नागभीड तालुक्‍यातील सहावरोरा तालुक्यातील 22, भद्रावती तालुक्यातील पाचसावली तालुक्यातील दोन,  सिंदेवाही तालुक्यातील चारराजुरा तालुक्यातील 21, गडचिरोली येथील तीन असे एकूण 197  बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहर व परिसरातील बाबूपेठबालाजी वार्डमहेश नगरचोर खिडकी परिसरसमता चौक परिसरदुर्गापुरजगन्नाथ बाबा नगरशास्त्रीनगरनगीना बागआंबेडकर नगरसिस्टर कॉलनी परिसरदाताळाजटपुरा वॉर्डभानापेठ वॉर्डविश्वकर्मा नगरमहाकाली वार्डकोतवाली वार्डबापट नगरआकाशवाणी रोड परिसरओम नगर भिवापुर वॉर्ड या भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील भगतसिंग वार्डरेल्वे वार्डफुलसिंग नाईक वार्डशिवाजी वार्डगणपती वार्डराणी लक्ष्मी वार्डकन्नमवार वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.
राजुरा तालुक्यातील नेहरू चौक परिसरश्रीनिवास कॉलनी परिसरआंबेडकर वार्डदेशपांडे वाडीजवाहर नगररामपूरस्वप्नपूर्ती नगररामनगर कॉलनी परिसरसोनिया नगरगौरी कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
वरोरा तालुक्यातील ज्योतिबा फुले वार्डदत्त मंदिर वार्डचरुर खटीकमला नेहरू वार्डविनायक लेआउट परिसरटिळक वार्डहनुमान वार्डआझाद वार्डकॉलरी वार्डबावणे लेआउट परिसरजिजामाता वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्डकुर्झा वार्डसंत रवीदास चौक परिसरशिवाजीनगरनागेश्वर नगरशेष नगरतोरगाव बुजपरिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील गणपती वार्डगुरु नगर,परिसरातून बाधित पुढे आले आहे.
सावली तालुक्यातील चक पिरंजी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा,भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवखेडाआदर्श कॉलनी परिसरसावरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेरीमाणिक नगरनेताजी वार्डवडाळा पैकुभागातून बाधित पुढे आले आहे.
धक्कादायक:अरे बापरे; जेवण - नाश्त्याचा 60 लाखांचा बिल:चंद्रपूर शहर महानगरपालिकेला 100 दिवसात 60 लाखांचा फटका

धक्कादायक:अरे बापरे; जेवण - नाश्त्याचा 60 लाखांचा बिल:चंद्रपूर शहर महानगरपालिकेला 100 दिवसात 60 लाखांचा फटका

११५रु.चे जेवन - १२४ रु.
३० रु. नास्ता - ३६  रू.
 ५ रू.कट चा चहा - १० रू.
 २  रु .चे बिस्किट - ४  रु.
५ रू.चे बिस्किट  - ६.५० रू.
 १० रु.ची पाण्याची बाटली - १४ रू.
६.५० रु. पाण्याची बाटली - ८.३० रू.
चंद्रपूर (खबरबात)-

जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांना किंवा संशयास्पद कोविड रुग्णांना मागील अनेक महिन्यांपासून क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या लोकांना जेवन-नाश्ता, चहा-पाणी,बिस्किट पुरविण्याची जबाबदारी चंद्रपूर महानगरपालिकेकडे आहे. मर्जीतील कंत्राटदाराला साठी या कामात भ्रष्टाचार केल्याने मनपाला चा 100 दिवसात 60 लक्ष रुपयाच्या वर फटका बसल्याचा गौप्यस्फोट जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.

मे- जून महिन्यामध्ये स्थानिक कंत्राटदारांनी जेवण-नाश्ता-चहा पुरविण्याचे काम केले. ११५ रुपये दराने जेवण,त्यामध्ये एक गोड पदार्थ तसेच ३० रुपयांमध्ये दररोज वेगवेगळा नास्ता, चहा-बिस्किट आणि पाण्याची लहान-मोठी बाटली पुरविण्याचे काम स्थानिक कंत्राटदार यांनी केले. यामध्ये नास्ता व जेवण पुरविण्याचे काम सहज कॅटरर्स तसेच चहा- -बिस्किट-पाणी पुरवण्याचे काम इतर कंत्राटदारांनी केले. कंत्राटदारांनी सेवा सेंटरवर पोहोचविण्याचा खर्च सुद्धा वेगळा लावलेला नव्हता.
या दरांमध्ये सेवा जागेवर पोहोचण्यात येत होती. सर्व काही सुरळीत असताना अचानक जून महिन्यात सहज कॅटरर्स व इतर लहान पुरवठा करणाऱ्यांचे काम चंद्रपूर महानगरपालिकेने बंद केले. नंतर या कामासाठी लिफाफा बंद निविदा मागविण्यात आली. नियमित काम करणाऱ्या कंत्राटदारांना निविदा टाकू नये म्हणून दबाव टाकण्यात आला.
त्यानंतर नागपूरच्या रॉयल ऑर्किड हॉटेल लिमिटेड या एजन्सीने निविदा सादर केली.सोबतच नेहमीप्रमाणे दोन निविदा आपल्या सोयीच्या सुद्धा टाकण्यात आल्या.


यामध्ये चढ्या दराने रॉयल ऑर्किड हॉटेल लिमिटेडने निविदा सादर केली. त्यांच्यासोबत तथाकथित 'निगोशियशन'चा सोपस्कार पार पाडून आयुक्तांनी दर निश्चित केले.परंतु निश्चित केलेले दर हे यापूर्वी जेवण- नाश्ता-चहा-पाणी आणि बिस्कीट जागेवर पुरविणाऱ्या कंत्राटदार यांचेपेक्षा खूप अधिक दर होते.

त्यामुळे शंभर दिवसात चंद्रपूर शहर महानगरपालिकेला ६० लक्ष रुपयाच्या वर आर्थिक फटका बसला. केवळ आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला.शंभर दिवसांमध्ये एकूण ४ कोटी २८ लक्ष ६४ हजार ३०२ रू.चे देयके कंत्राटदारांना देण्यात आले.नागपूरच्या कंत्राटदाराचे महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी ऋणानुबंध असल्यामुळे त्यांना हे काम देण्यात आले.यासाठी सेटिंग करण्यात आली.

कोरोनाच्या आपत्तीमध्ये महानगरपालिकेची स्थिती बिकट असताना अशाप्रकारे भ्रष्टाचार करून पैशाचा अपव्यय करणे अतिशय निंदास्पद आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी तसेच दोषी अधिकारी यांना निलंबित करून मनपाचे सत्ताधारी पदाधिकारी व कंत्राटदार यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेली आहे.
 पाॅझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरताना सापडला;गुन्हा दाखल

पाॅझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरताना सापडला;गुन्हा दाखल


होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
चंद्रपूर (खबरबात) :
कोव्हीड १९ अंतर्गत होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून माहिती लपविणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहितेचे 1860 चे कलम 188, 269,270, २७१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे 51(बी), साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडस्ट्रीयल प्रभागात राहणारी व्यक्ती २३ सप्टेंबर रोजी कोरोना पॉझीटीव्ह आली होती. या व्यक्तीला मनपा आरोग्य विभागामार्फत होम आयसोलेशन करण्यात आले होते. तसेच राहत्या घरी याबाबतचे स्टिकर लावण्यात आले होते. मात्र सदर व्यक्ती होम आयसोलेशनचे नियम न पाळता बाहेर फिरत असल्याबाबतची तक्रार व फोटो प्रशासनाला प्राप्त झाले. मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे सदर व्यक्तीकडे भेट दिली असता तो गृह अलगीकरणात आढळुन आला नाही तसेच घरी लावण्यात आलेले होम आयसोलेशनचे स्टीकर देखील सदर व्यक्तीने काढून टाकल्याचे आढळले.
त्यामुळे मनपा प्राथमीक आरोग्य केंद्र क्र. ७ च्या वैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे ही संपुर्ण माहिती रामनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून यानंतर पोलीस स्टेशन मध्ये प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करून सार्वजनीक धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचे कृत्य जाणीवपुर्वक केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तसेच सदर व्यक्तीला कोव्हीड केअर सेंटर, वन अकादमी येथे पाठविण्यात आले आहे. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची समज वारंवार मनपा प्रशासनाद्वारे देण्यात येत असुन पालन न करण्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत.

सोमवार, सप्टेंबर २८, २०२०

मुलीचा कोरोना रिपोर्ट मुलाच्या नावाने

मुलीचा कोरोना रिपोर्ट मुलाच्या नावाने




आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार..
अधिकाऱ्यांनी हात वर केले..


राजुरा/ प्रतिनिधी
शहरातील एका वार्डातील कुटुंबातील पत्नीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर इतर सदस्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यात पती,मुलगा व मुलीचा rt-pcr चाचणीसाठी स्वाब टेस्ट ग्रामीण रुग्णालय राजुरा या केंद्रावरून घेण्यात आले. चोवीस तासानंतर मुलाचा आणि पतीचा रिपोर्ट निगेटिव असल्याचा मोबाईलवर प्राप्त झाला. मात्र मुलीचा रिपोर्ट प्राप्त झाला नाही. याबाबत पालकांनी ग्रामीण रुग्णालय येथे चौकशी केली असता मुलीच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांच्या यादीतही नव्हता. मात्र सायंकाळच्या सुमारास मुलगी पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल सांगण्यात आला. त्यातही मुलीच्या ऐवजी मुलाच्या नावाने अहवाल आल्याने पालक गोंधळले.

मुलीचे नाव बदलून चक्क दुसऱ्या अनोळखी मुलाच्या नावाने रिपोर्ट प्राप्त झाला शिवाय फिमेल च्या ऐवजी मेल असा उल्लेख केला गेल्याने पालकांचा गोंधळ उडाला. नेमका रिपोर्ट कुणाचा आहे त्यांना कळेनासे झाले.या प्रकरणातून आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणा मुळे अखे कुटुंब मानसिक ताणाखाली वावरत आहेत.

अतिशय गंभीर स्थितीत आरोग्य विभागाकडून झालेल्या चुकांमुळे पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत कुठलाही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाही. चक्क मुलीच्या नावाचा रिपोर्ट मुलाच्या नावाने प्रकाशित केल्यामुळे आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.
काही दिवसापासून शहरांमध्ये, टायफाईड, मलेरिया, डेंगू तापाची साथ सुरू असल्यामुळे खाजगी दवाखाने हाऊसफुल आहेत. अशा स्थितीत काही दिवसांपासून ताप असल्यामुळे एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. अचानक रुग्णांचा कोरोणा तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फोन आल्यामुळे दिनांक 22 सप्टेंबरला कोरोणा तपासणी करण्यात आली. कोरोणा तपासणीत केल्यानंतर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव आल्याने कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी करण्यात आली. rt-pcr तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे दिनांक 24 सप्टेंबरला कुटुंबातील सदस्यांचे स्वब नमुने घेण्यात आले. याचा अहवाल वैव्यक्तिक मोबाईलवर दिल्या जातो. स्वॅब दिल्यानंतर मुलाचा आणि वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा मेसेज दिनांक 25 सप्टेंबरला दुपारी दीड वाजता मोबाईलवर प्राप्त झाला मात्र मुलीचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे पालकांनी चौकशी केली. त्यात मुलीचे नाव कोणत्याही यादीमध्ये नसल्यामुळे त्यांना काही कळले नाही. मुलीचा रिपोर्ट दिनांक 26 सप्टेंबरला दुपारी कळविण्यात आला.त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव असल्याची माहिती देण्यात आली. त्यातही मुलाच्या नावाने रिपोर्ट प्रकाशित झाल्यामुळे पालक गोंधळले. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चाही केली मात्र ही चूक कोणाची हे सांगण्यात अधिकाऱ्याने सारवासारव केली. सदर विद्यार्थिनी ही अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिकत असून ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे अभ्यासाच्या तयारीत आहे. त्यात कोरोना चाचणीमुळे झालेला गोंधळ यामुळे कुटुंब मानसिक तणावाखाली आहेत. संकट काळात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने रुग्णांच्या आयुष्य सोबत खेळ करू नये अशी विनंती पालकांनी केली आहे. रुग्णांच्या आरोग्यशी हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित पालकांनी केलेली आहे.

गुरुवार, सप्टेंबर १७, २०२०

जिल्ह्यात 24 तासात 294 बाधित ; सहा बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 24 तासात 294 बाधित ; सहा बाधितांचा मृत्यू

 चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3836 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 6976

उपचार सुरु असणारे बाधित 3045



चंद्रपूरदि. 17 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 294  बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या हजार 976 झाली आहे. यापैकी 3 हजार 836 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 45 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारगेल्या 24 तासात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्येरयतवारी कॉलरीचंद्रपूर येथील 40 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू क्राईस्ट हॉस्पिटल परिसरचंद्रपुर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तिसरा मृत्यू टीचर कॉलनी परिसरचिमुर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यु बाबुपेठचंद्रपूर येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनिया असल्याने  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

पाचवा मृत्यू अंबादेवी वार्डवरोरा येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनियाचा आजार असल्याने  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

सहावा मृत्यू शेषनगर ब्रह्मपुरी येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनियाचा आजार असल्याने  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 95 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 88, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 162 बाधितकोरपना तालुक्यातील 5, चिमूर तालुक्यातील 3, नागभीड तालुक्यातील 5, बल्लारपूर तालुक्यातील 38,  ब्रह्मपुरी तालुक्यातील 21, भद्रावती तालुक्यातील 18, मूल तालुक्यातील 3, राजुरा तालुक्यातील 8, वरोरा तालुक्‍यातील 8, सावली तालुक्यातील 8, सिंदेवाही तालुक्यातील 10, वडसा- गडचिरोलीगोंदिया येथील प्रत्येकी एक व नागपूर येथील 3 असे एकूण 294 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील महाकाली वार्डएसटी वर्कशॉप परिसरबाबुपेठमहाकाली कॉलनी परिसरमाता नगर चौकनिर्माण नगररयतवारी कॉलनी परिसरसुभाष नगर घुगुसनगीना बागसमाधी वार्डछत्रपती नगरशांतीनगरदादमहल वार्डरामनगरवडगावएकोरी वार्डचिंचाळामोरवाबंगाली कॅम्पतुळसी नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील गांधी वार्डसाई बाबा वार्डकन्नमवार वार्डविवेकानंद वार्डसरकार नगरसमता चौकजुनी दहेलीभागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरीशांतीनगरगांधी वार्डवडसाविद्यानगरगाडगे नगरटिळक नगरबालाजी वार्ड,  परिसरातून बाधित पुढे आले आहे.

भद्रावती तालुक्यातील अहील्यादेवी नगरगणेश मंदिर रोड परिसरगौतम नगर माजरीगणपती वार्ड गौराळाचैतन्य कॉलनी परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील जामसाळारत्नापूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

सोमवार, सप्टेंबर १४, २०२०

आणखी एका पत्रकाराचा आज कोरोनानं बळी घेतला

आणखी एका पत्रकाराचा आज कोरोनानं बळी घेतला







औरंगाबाद येथील सामनाचे वरिष्ठ पत्रकार राहूल डोलारे यांचे आज निधन झाले.. मागील दहा दिवस त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. अखेर आज ते कोरोना विरोधातली लढाई हरले.
सात बधितांचा मृत्यू, नवीन 200 रुग्ण

सात बधितांचा मृत्यू, नवीन 200 रुग्ण

सात बधितांचा मृत्यू, नवीन 200 रुग्ण




चंद्रपूर : चंद्रपुरातील बालाजी मंदिर येथील (वय 60, पुरुष), शंकरपूर (वय 55, पुरुष), बाबूपेठ (वय 65, पुरुष), बल्लारपूर (वय 32, पुरुष), वाघोली सावली (वय 55, पुरुष), बल्लारपूर (वय 65, पुरुष), चंद्रपुरातील भिवापूर (वय 68, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 200 कोरोनाबाधित आढळले.


कोरोना पॉझिटिव्ह : 6058

बरे झालेले : 3405
ऍक्टिव्ह रुग्ण : 2575
मृत्यू : 78 (चंद्रपूर 71)

शुक्रवार, सप्टेंबर ११, २०२०

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत विक्रमी वाढ

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत विक्रमी वाढ






पाच बधितांचा मृत्यू; नवीन 401 रुग्ण


चंद्रपूर : बालाजी वॉर्ड चंद्रपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, सिस्टर कालनी चंद्रपूर येथील ४२ वर्षीय महिला, माजरी येथील 55 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील ५६ वर्षीय पुरुष व ब्रम्हपुरी येथील ७८ वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात ४०१ कोरोनाबाधित आढळले.

कोरोना पॉझिटिव्ह : ५२५३
बरे झालेले : २८२७
ऍक्टिव्ह रुग्ण : २३६५
मृत्यू : ६१ (चंद्रपूर ५७)

गुरुवार, सप्टेंबर १०, २०२०

24 तासात नवीन 190 बाधित; तीन बाधितांचा मृत्यू

24 तासात नवीन 190 बाधित; तीन बाधितांचा मृत्यू

 चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4852

24 तासात नवीन 190 बाधिततीन बाधितांचा मृत्यू

आतापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या 2557

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2239





चंद्रपूरदि. 10 सप्टेंबर: जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 190 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 852 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 239 असून आतापर्यंत 2 हजार 557 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 24 तासांमध्ये तीन बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्येअंचलेश्वर वॉर्ड चंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू तुकुम चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 6 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 9 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तरतिसरा मृत्यु नगीना बाग चंद्रपुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 56 बाधितांचा मृत्यू झालेला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 52, तेलंगाणा एकबुलडाणा एक व गडचिरोली दोन बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 120, सावली तालुक्यातील 2, बल्लारपूर तालुक्यातील 11,  ब्रह्मपुरी तालुक्यातील 5, मूल तालुक्यातील 17, राजुरा तालुक्यातील 7, वरोरा तालुक्यातील 2, कोरपना तालुक्यातील 1, भद्रावती तालुक्यातील 5, पोंभूर्णा तालुक्यातील 10, नागभीड तालुक्यातील 2,सिंदेवाही तालुक्यातील 5, चिमूर तालुक्यातील 2, वणी- यवतमाळ येथून आलेला 1 असे एकूण 190 बाधित पुढे आले आहे.


या ठिकाणी आढळले चंद्रपूर शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ वार्डसुमित्रा नगर तुकुममहाकाली काॅलरी परिसरगुरुद्वारा परिसरअष्टभुजा वार्डदवा बाजार नगीना बाग परिसरसराई वार्डदाताळासिस्टर कॉलनी परिसरघुटकाळा वार्डहरी ओम नगरबाबुपेठ वार्डरामनगर भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:

मूल तालुक्यातील चितेगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्दपारडी भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती कॉलनी परिसरबामनवाडा परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील कळमनाकोठारी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणाशिवाजी वार्डजुना सुमठाणापरिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील नेहरू वार्डखडसंगी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

रविवार, सप्टेंबर ०६, २०२०

'या' पोलीस ठाण्यातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

'या' पोलीस ठाण्यातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह



▪️पोलीस ठाणे तात्काळ केले निर्जंतुकीकरण

शिरीष उगे(वरोरा)
वरोरा पोलिसांनी चोरीच्या आरोपात नागरी येथील एका व्यक्तीला शुक्रवारी अटक केली. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता, शनिवारला ती सकारात्मक आल्याने एकच खळबळ उडाली.
नागरी येथील एका चोरीच्या आरोपात वरोरा पोलिसांनी काही व्यक्तींना शुक्रवारला ताब्यात घेतले आणि त्यांना रात्रभर पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.
शनिवारला त्या आरोपींना न्यायालयात न्यायचे असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल मागविण्यात आला असता, त्यातील एक आरोपी कोरोना बाधित आला, तर त्याच्यासोबत आलेले इतर सहकारी आरोपी मात्र नकारात्मक आलेत.
त्या आरोपीला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून, संपूर्ण पोलिस ठाण्याचे तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले
++++++++++++++++++++++++
पोलिस ठाण्यात अत्यंत आवश्यक काम असेल तरच यावे.....ठाणेदार उमेश पाटील

शुक्रवार, सप्टेंबर ०४, २०२०

   नागपूर : 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू

नागपूर : 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू


जिल्ह्यात आज 1228 रुग्णांना डिस्चार्ज,1966 पॉझिटिव्ह तर 39 मृत्यू
नागपूर, दि. 4: जिल्ह्यात आज 1228 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले. 1966 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (36398) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी  गेलेल्या रुग्णांची संख्या 24110झाली आहे.
            एकूण क्रियाशील रुग्णापैकी 6317 गृह विलगिकरणात आहेत. आज 39 मृत्यु झाले असून त्यापैकी जिल्ह्याबाहेरील मृत्यू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.26 टक्के आहे.