Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०७, २०२०

जिल्ह्यात 24 तासात 166 बाधित; दोन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 7 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 166 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 472 झाली आहे. यापैकी 8 हजार 99 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 194 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.





आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासामध्ये दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्येछोटा नागपूरचंद्रपुर येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 6 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरदुसरा मृत्यू सिंधी कॉलनी परिसर रामनगरचंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तरदुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. दोनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 179 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 170, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 65, पोंभुर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील 13, मुल तालुक्यातील 14, जिवती तालुक्यातील पाचकोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच,  नागभीड तालुक्‍यातील सहा, वरोरा तालुक्यातील आठ ,भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील पाच,  सिंदेवाही तालुक्यातील चारराजुरा तालुक्यातील 10 तर नागपूर येथील एक असे एकूण 166 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील दुर्गापुरघुटकाळा वार्डविठ्ठल मंदिर वार्डहॉस्पिटल वार्डप्रगती नगरविद्यानगरतुकूमगिरणार चौक परिसरभिवापूर वार्डइंदिरानगरजल नगर वार्डबाबूपेठसरकार नगरपठाणपुरा वार्डघुग्घुसद्वारका नगरीओमकार नगरहनुमान नगर,भाना पेठ वार्डघंटाचौकीबोर्डाबापट नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील रेल्वे वार्डविद्या नगर वार्डगौरक्षण वार्डसाईबाबा वार्डबामणी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील पंचशील वार्डबामणवाडासोमनाथपूर वार्डमानोलीकढोलीम्हाडा कॉलनी परिसरजवाहर नगरसास्ती,धोपटाळा भागातून बाधीत पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील यात्रा वार्डआंबेडकर वार्डसलीम नगरटेमुर्डागांधी वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील कहालीचौगानमालडोंगरीविद्यानगरपरिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.भद्रावती तालुक्यातील विस्लोनजुना सुमठाणाझिंगोजी वार्डसुरक्षा नगरएकता नगर,किल्ला वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील अंतरगाव,व्याहाड भागातून बाधित ठरले आहे.सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही,भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील डोंगरगावपेंढरीमोहाडीवसुंधरा कॉलनी परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील मोटेंगावनेताजी वार्डटिचर कॉलनी परिसरराजीव गांधी नगरनेहरू वार्डगुरुदेव नगर  भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर एकहेकाडीराजोलीताडाळा परिसरातून बाधित ठरले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.