Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०७, २०२०

युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण : विद्यावेतनात 2 हजारावरुन 4 हजार रुपये वाढ



अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढविण्यासाठी योजना

कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती


मुंबई, दि. 7 : अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रती महिना 2 हजार रुपयांवरुन 4 हजार रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला.

अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ज्यू समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी अल्पसंख्याक समाजातील निवडक, होतकरु विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. राज्य प्रशासकीय संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रति केंद्र 10 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. या विद्यार्थ्यांना सध्या प्रती महिना 2 हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येते. तथापि, उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या नागरी सेवा पूर्व परिक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रती महिना 2 हजार रुपयांवरुन 4 हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले. विद्यावेतनातील ही वाढ 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येत आहे.

मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था तसेच नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना युपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते. अल्पसंख्याक समाजातील होतकरु विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.