Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर २८, २०२०

मुलीचा कोरोना रिपोर्ट मुलाच्या नावाने




आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार..
अधिकाऱ्यांनी हात वर केले..


राजुरा/ प्रतिनिधी
शहरातील एका वार्डातील कुटुंबातील पत्नीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर इतर सदस्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यात पती,मुलगा व मुलीचा rt-pcr चाचणीसाठी स्वाब टेस्ट ग्रामीण रुग्णालय राजुरा या केंद्रावरून घेण्यात आले. चोवीस तासानंतर मुलाचा आणि पतीचा रिपोर्ट निगेटिव असल्याचा मोबाईलवर प्राप्त झाला. मात्र मुलीचा रिपोर्ट प्राप्त झाला नाही. याबाबत पालकांनी ग्रामीण रुग्णालय येथे चौकशी केली असता मुलीच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांच्या यादीतही नव्हता. मात्र सायंकाळच्या सुमारास मुलगी पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल सांगण्यात आला. त्यातही मुलीच्या ऐवजी मुलाच्या नावाने अहवाल आल्याने पालक गोंधळले.

मुलीचे नाव बदलून चक्क दुसऱ्या अनोळखी मुलाच्या नावाने रिपोर्ट प्राप्त झाला शिवाय फिमेल च्या ऐवजी मेल असा उल्लेख केला गेल्याने पालकांचा गोंधळ उडाला. नेमका रिपोर्ट कुणाचा आहे त्यांना कळेनासे झाले.या प्रकरणातून आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणा मुळे अखे कुटुंब मानसिक ताणाखाली वावरत आहेत.

अतिशय गंभीर स्थितीत आरोग्य विभागाकडून झालेल्या चुकांमुळे पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत कुठलाही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाही. चक्क मुलीच्या नावाचा रिपोर्ट मुलाच्या नावाने प्रकाशित केल्यामुळे आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.
काही दिवसापासून शहरांमध्ये, टायफाईड, मलेरिया, डेंगू तापाची साथ सुरू असल्यामुळे खाजगी दवाखाने हाऊसफुल आहेत. अशा स्थितीत काही दिवसांपासून ताप असल्यामुळे एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. अचानक रुग्णांचा कोरोणा तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फोन आल्यामुळे दिनांक 22 सप्टेंबरला कोरोणा तपासणी करण्यात आली. कोरोणा तपासणीत केल्यानंतर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव आल्याने कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी करण्यात आली. rt-pcr तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे दिनांक 24 सप्टेंबरला कुटुंबातील सदस्यांचे स्वब नमुने घेण्यात आले. याचा अहवाल वैव्यक्तिक मोबाईलवर दिल्या जातो. स्वॅब दिल्यानंतर मुलाचा आणि वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा मेसेज दिनांक 25 सप्टेंबरला दुपारी दीड वाजता मोबाईलवर प्राप्त झाला मात्र मुलीचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे पालकांनी चौकशी केली. त्यात मुलीचे नाव कोणत्याही यादीमध्ये नसल्यामुळे त्यांना काही कळले नाही. मुलीचा रिपोर्ट दिनांक 26 सप्टेंबरला दुपारी कळविण्यात आला.त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव असल्याची माहिती देण्यात आली. त्यातही मुलाच्या नावाने रिपोर्ट प्रकाशित झाल्यामुळे पालक गोंधळले. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चाही केली मात्र ही चूक कोणाची हे सांगण्यात अधिकाऱ्याने सारवासारव केली. सदर विद्यार्थिनी ही अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिकत असून ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे अभ्यासाच्या तयारीत आहे. त्यात कोरोना चाचणीमुळे झालेला गोंधळ यामुळे कुटुंब मानसिक तणावाखाली आहेत. संकट काळात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने रुग्णांच्या आयुष्य सोबत खेळ करू नये अशी विनंती पालकांनी केली आहे. रुग्णांच्या आरोग्यशी हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित पालकांनी केलेली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.