प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यावर कारवाई करू... उपविभागीय अधिकारी -शिंदे
▪️कोरोणा रुग्णाचे अंत्यविधी प्रकरण
शिरीष उगे(भद्रावती): कोराणा रुग्णाचा वाटेत मृत्यू झाल्याने त्याबाबतची माहिती प्रशासनाला दिली नाही व परस्पर तो मृतदेह रात्रभर घरी ठेवल्याने शेकडो लोकांनी त्यांची भेट घेतली या प्रकाराने संतप्त झालेल्या वॉर्डातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्याचे वर कारवाई करू असे उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी सांगितले.
शहरातील भोजवार्ड येथील कुटुंबातील नातलग हा कोरोना पॉझेटिव्ह निघाल्याने जैन मंदिर येथील कोव्हीड सेंटर मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते व त्याला होम क्वारन टाईन साठी घरी आणले असता त्याची प्रकृती बिघडली हा प्रकार बघता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी या रुग्णाला कोविड सेंटर येथे उपचारासाठी रेफर केले असता त्याचा मृत्यू झाला.
मात्र हा घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या कुटुंबांनी शेजाऱ्यांना सांगितला नाही व अकस्मात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नातलग तसेच शेजारी अशा शेकडोनी त्याच्या घरी भेट घेतली.
वैद्यकीय पथक घरी दाखल होताच नागरिकांना हा प्रकार लक्षात आला व आपल्याला माहिती लपवून अंधारात ठेवले असल्याचे चर्चा चांगलीच रंगली. प्रशासनाची दिशाभूल करून असा प्रकार करणाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी नगर परिषद येथे चालू असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या बैठकीत भोज वार्ड येथील नागरिकांनी या प्रकाराबाबत माहिती दिली.
प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर योग्य कारवाई करू असे उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी सांगितले यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, उपविभागीय अधिकारी शिंदे तहसीलदार महेश शितोळे, आरोग्य अधिकारी आनंद किनाके नगराध्यक्ष अनिल धानोरकर इतर अधिकारी उपस्थित होते.