Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर ०१, २०२०

50 लाखाच्या विमा संदर्भात तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

शिक्षण आयुक्तांकडून विमा प्रकरणाची दखल

कोरोना सर्वेत मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांचे प्रकरण

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या लढ्याला यश




नागपूर - कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात असणाऱ्या शिक्षकांचे करोनामुळे मोठ्या प्रमाणात बळी गेले आहे. यापाश्वभूमीवर नागपुरातील पहिला बळी ठरलेल्या रामदास काकडे कुटुंबियांना ५० लाखाची कोविड योध्दा अंतर्गत लाभ द्यावा अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेत मदतीचे प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाने सादर करावे असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहे. यामुळे मदतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

या विषयासंदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या फोन काॅल वरुन बुधवारी (ता 30) विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सेलोकर यांची शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, महिला संघटक सौ रिना टाले यांनी भेट घेऊन चर्चा केली. आयुक्तांनी 21 सप्टेंबर रोजी मदत प्रस्तावाचा मेल जिल्हा प्रशासनास पाठविला आहे. याची खातरजमा करून चर्चेत डॉ मोटे (जिल्हा आयुष अधिकारी) यांनी भाग घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आश्वासन संघटनेला दिले. 

कोविड 19 सर्वेक्षणाच्या कामात मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांना 50 लाखाचा कोरोना योध्दा विमा संरक्षण लाभ द्यावा तसेच कार्यरत सर्वेक्षक शिक्षकांना ५० लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांना विभागीय आयुक्तांमार्फत बुधवारी १६ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती. १८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी निवेदनाची दखल घेतली व प्रकरण अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व आरोग्य विभागाकडे पुढिल कार्यवाहीसाठी पाठविले होते. या संदर्भातील मेल संघटनेला प्राप्त झाला होता. 

निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, राज्यातील शिक्षकांना कोविड १९ च्या कामात सहभागी करुन घेतले. मात्र या शिक्षकांना कुठलेही संरक्षण कवच दिले नाही. आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग प्रतिबंधक कायद्याचा धाक दाखवून स्थानिक प्रशासन त्यांच्याकडून कोविड १९ चे काम करुन घेत आहे. यातूनच संसर्ग होऊन नागपूर जिल्ह्य़ात श्री रामदास काकडे यांचे बुधवारी १६ सप्टेंबर रोजी पहाटे दवाखान्यात निधन झाले होते. 

कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात असलेले अनेक शिक्षक हे अंशदाय पेन्शन योजने अंतर्गत आहे. त्यामुळे निधन झाल्यास संपूर्ण परिवार उघड्यावर येण्याची भीती शिक्षकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

कोरोना योध्दा म्हणूनही शिक्षकांचा समावेश नाही तसेच ५० लाखाच्या विम्या संदर्भातही शासनाकडून स्पष्टता करण्यात आली नाही. अशा बिकट परिस्थितीत नागपूर विभागात व संपूर्ण महाराष्ट्रात कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात मोठ्या प्रमाणात शिक्षक व्यस्त आहे. 

 तातडीने १६ सप्टेंबर रोजी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग यांना निवेदन देऊन शिक्षक कोविड योध्दा अंतर्गत ५० लाखाची मदत करावी, कार्यरत सर्वेक्षक शिक्षकांचा ५० लाखाचा विमा जाहीर करावा, कोविड योध्दांना तातडीने वैद्यकीय औषधोपचार मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. या संदर्भात मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी पाठविलेल्या निवेदनावर तत्काळ कारवाई करत सदर मागणी पूर्ण करण्यासाठी हे प्रकरण अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व अप्पर मुख्य सचिव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले होते. या प्रकरणात शिक्षण आयुक्त यांनी लक्ष घातले असून जिल्हा प्रशासनाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे. तसा मेल त्यांनी संघटनेला सुध्दा दिला आहे. 

या विषयासंदर्भात बुधवारी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सेलोकर यांची शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, महिला संघटक सौ रिना टाले (कावडे) यांनी भेट घेऊन चर्चा केली. चर्चेत डॉ मोटे (जिल्हा आयुष अधिकारी) यांनी भाग घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आश्वासन संघटनेला दिले. 

शिक्षकांना विमा योजना मिळवून देण्यासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वात नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक शेषराव खार्डे, ग्रामीण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे, अपंग विभाग संघटक दिनेश गेटमे, महिला जिल्हा संघटक सौ प्रणाली रंगारी, हिंगणा तालुका संघटक कुंदन भारसागडे, गोंदिया जिल्हा संघटक बालकृष्ण बालपांडे, चंद्रपूर जिल्हा संघटक अविनाश मस्के, रंगराव पाटील, रामटेक तालुका संघटक अशोक खंडाईत, सिमा बदकी, कामठी तालुका संघटक अरविंद घोडमारे, कळमेश्वर तालुका संघटक गणेश उघडे, नगर परिषद संघटक रुपाली मालोदे, भंडारा जिल्हा संघटक रामकृष्ण वाडीभस्मे यांनी सहकार्य केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.