Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०

पाॅझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरताना सापडला;गुन्हा दाखल


होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
चंद्रपूर (खबरबात) :
कोव्हीड १९ अंतर्गत होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून माहिती लपविणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहितेचे 1860 चे कलम 188, 269,270, २७१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे 51(बी), साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडस्ट्रीयल प्रभागात राहणारी व्यक्ती २३ सप्टेंबर रोजी कोरोना पॉझीटीव्ह आली होती. या व्यक्तीला मनपा आरोग्य विभागामार्फत होम आयसोलेशन करण्यात आले होते. तसेच राहत्या घरी याबाबतचे स्टिकर लावण्यात आले होते. मात्र सदर व्यक्ती होम आयसोलेशनचे नियम न पाळता बाहेर फिरत असल्याबाबतची तक्रार व फोटो प्रशासनाला प्राप्त झाले. मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे सदर व्यक्तीकडे भेट दिली असता तो गृह अलगीकरणात आढळुन आला नाही तसेच घरी लावण्यात आलेले होम आयसोलेशनचे स्टीकर देखील सदर व्यक्तीने काढून टाकल्याचे आढळले.
त्यामुळे मनपा प्राथमीक आरोग्य केंद्र क्र. ७ च्या वैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे ही संपुर्ण माहिती रामनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून यानंतर पोलीस स्टेशन मध्ये प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करून सार्वजनीक धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचे कृत्य जाणीवपुर्वक केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तसेच सदर व्यक्तीला कोव्हीड केअर सेंटर, वन अकादमी येथे पाठविण्यात आले आहे. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची समज वारंवार मनपा प्रशासनाद्वारे देण्यात येत असुन पालन न करण्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.