21 cases of Delta Plus virus were detected in state
जगभरासह भारतात कोरोनच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अलीकडे देशातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. हा व्हायरस वेगाने पसरत गेल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशी भीती तज्त्रांनी व्यक्त केली आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ लस ही डेल्टा व्हेरिएंटवर कमी प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे त्यामुळे लसीकरणानंतरही लोकांना कोरोनाची भीती सतावत आहे.
महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळले राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत असं त्यांनी सांगितले.
Delta Plus Variant Of Coronavirus Has Been Detected In 21
संपूर्ण जगातच कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतालाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका बसला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर आता कोरोनाच्या डेल्टा+ व्हेरिएंटची चर्चा सुरू आहे. यातच देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 22 रुग्ण समोर आले आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना पत्रही लिहिले आहे. सध्या डेल्टा व्हेरिएंट जगातील 80 देशांत पसरला आहे. तर डेल्टा प्लस व्हेरिएंट नऊ देशांत आढळून आला आहे. यात भारतासह अमेरिका, इंग्लंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, चीन, नेपाळ, रशिया आणि जपानचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चे 22 रुग्ण आढळे असून, यातील 16 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळून आले आहेत. तर उरलेले सहा रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशात सापडले आहेत.