Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०

धक्कादायक:अरे बापरे; जेवण - नाश्त्याचा 60 लाखांचा बिल:चंद्रपूर शहर महानगरपालिकेला 100 दिवसात 60 लाखांचा फटका

११५रु.चे जेवन - १२४ रु.
३० रु. नास्ता - ३६  रू.
 ५ रू.कट चा चहा - १० रू.
 २  रु .चे बिस्किट - ४  रु.
५ रू.चे बिस्किट  - ६.५० रू.
 १० रु.ची पाण्याची बाटली - १४ रू.
६.५० रु. पाण्याची बाटली - ८.३० रू.
चंद्रपूर (खबरबात)-

जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांना किंवा संशयास्पद कोविड रुग्णांना मागील अनेक महिन्यांपासून क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या लोकांना जेवन-नाश्ता, चहा-पाणी,बिस्किट पुरविण्याची जबाबदारी चंद्रपूर महानगरपालिकेकडे आहे. मर्जीतील कंत्राटदाराला साठी या कामात भ्रष्टाचार केल्याने मनपाला चा 100 दिवसात 60 लक्ष रुपयाच्या वर फटका बसल्याचा गौप्यस्फोट जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.

मे- जून महिन्यामध्ये स्थानिक कंत्राटदारांनी जेवण-नाश्ता-चहा पुरविण्याचे काम केले. ११५ रुपये दराने जेवण,त्यामध्ये एक गोड पदार्थ तसेच ३० रुपयांमध्ये दररोज वेगवेगळा नास्ता, चहा-बिस्किट आणि पाण्याची लहान-मोठी बाटली पुरविण्याचे काम स्थानिक कंत्राटदार यांनी केले. यामध्ये नास्ता व जेवण पुरविण्याचे काम सहज कॅटरर्स तसेच चहा- -बिस्किट-पाणी पुरवण्याचे काम इतर कंत्राटदारांनी केले. कंत्राटदारांनी सेवा सेंटरवर पोहोचविण्याचा खर्च सुद्धा वेगळा लावलेला नव्हता.
या दरांमध्ये सेवा जागेवर पोहोचण्यात येत होती. सर्व काही सुरळीत असताना अचानक जून महिन्यात सहज कॅटरर्स व इतर लहान पुरवठा करणाऱ्यांचे काम चंद्रपूर महानगरपालिकेने बंद केले. नंतर या कामासाठी लिफाफा बंद निविदा मागविण्यात आली. नियमित काम करणाऱ्या कंत्राटदारांना निविदा टाकू नये म्हणून दबाव टाकण्यात आला.
त्यानंतर नागपूरच्या रॉयल ऑर्किड हॉटेल लिमिटेड या एजन्सीने निविदा सादर केली.सोबतच नेहमीप्रमाणे दोन निविदा आपल्या सोयीच्या सुद्धा टाकण्यात आल्या.


यामध्ये चढ्या दराने रॉयल ऑर्किड हॉटेल लिमिटेडने निविदा सादर केली. त्यांच्यासोबत तथाकथित 'निगोशियशन'चा सोपस्कार पार पाडून आयुक्तांनी दर निश्चित केले.परंतु निश्चित केलेले दर हे यापूर्वी जेवण- नाश्ता-चहा-पाणी आणि बिस्कीट जागेवर पुरविणाऱ्या कंत्राटदार यांचेपेक्षा खूप अधिक दर होते.

त्यामुळे शंभर दिवसात चंद्रपूर शहर महानगरपालिकेला ६० लक्ष रुपयाच्या वर आर्थिक फटका बसला. केवळ आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला.शंभर दिवसांमध्ये एकूण ४ कोटी २८ लक्ष ६४ हजार ३०२ रू.चे देयके कंत्राटदारांना देण्यात आले.नागपूरच्या कंत्राटदाराचे महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी ऋणानुबंध असल्यामुळे त्यांना हे काम देण्यात आले.यासाठी सेटिंग करण्यात आली.

कोरोनाच्या आपत्तीमध्ये महानगरपालिकेची स्थिती बिकट असताना अशाप्रकारे भ्रष्टाचार करून पैशाचा अपव्यय करणे अतिशय निंदास्पद आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी तसेच दोषी अधिकारी यांना निलंबित करून मनपाचे सत्ताधारी पदाधिकारी व कंत्राटदार यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.