Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 10009



 आतापर्यत 5876 बाधितांना डिस्चार्ज

उपचार सुरु असणारे बाधित 3984
जिल्ह्यात 24 तासात 197 बाधितएका बाधिताचा मृत्यू
चंद्रपूरदि. 29 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 197 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 हजार 9 झाली आहे. यापैकी 5 हजार 876 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 984 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासामध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये तुकुमचंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा  समावेश आहे. या बाधिताला 28 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 149 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 140, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन तर भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 99 , पोंभूर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील 12, चिमूर तालुक्यातील पाचमुल तालुक्यातील पाचगोंडपिपरी तालुक्यातील तीनब्रह्मपुरी तालुक्यातील आठ,  नागभीड तालुक्‍यातील सहावरोरा तालुक्यातील 22, भद्रावती तालुक्यातील पाचसावली तालुक्यातील दोन,  सिंदेवाही तालुक्यातील चारराजुरा तालुक्यातील 21, गडचिरोली येथील तीन असे एकूण 197  बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहर व परिसरातील बाबूपेठबालाजी वार्डमहेश नगरचोर खिडकी परिसरसमता चौक परिसरदुर्गापुरजगन्नाथ बाबा नगरशास्त्रीनगरनगीना बागआंबेडकर नगरसिस्टर कॉलनी परिसरदाताळाजटपुरा वॉर्डभानापेठ वॉर्डविश्वकर्मा नगरमहाकाली वार्डकोतवाली वार्डबापट नगरआकाशवाणी रोड परिसरओम नगर भिवापुर वॉर्ड या भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील भगतसिंग वार्डरेल्वे वार्डफुलसिंग नाईक वार्डशिवाजी वार्डगणपती वार्डराणी लक्ष्मी वार्डकन्नमवार वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.
राजुरा तालुक्यातील नेहरू चौक परिसरश्रीनिवास कॉलनी परिसरआंबेडकर वार्डदेशपांडे वाडीजवाहर नगररामपूरस्वप्नपूर्ती नगररामनगर कॉलनी परिसरसोनिया नगरगौरी कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
वरोरा तालुक्यातील ज्योतिबा फुले वार्डदत्त मंदिर वार्डचरुर खटीकमला नेहरू वार्डविनायक लेआउट परिसरटिळक वार्डहनुमान वार्डआझाद वार्डकॉलरी वार्डबावणे लेआउट परिसरजिजामाता वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्डकुर्झा वार्डसंत रवीदास चौक परिसरशिवाजीनगरनागेश्वर नगरशेष नगरतोरगाव बुजपरिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील गणपती वार्डगुरु नगर,परिसरातून बाधित पुढे आले आहे.
सावली तालुक्यातील चक पिरंजी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा,भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवखेडाआदर्श कॉलनी परिसरसावरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेरीमाणिक नगरनेताजी वार्डवडाळा पैकुभागातून बाधित पुढे आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.