👉🏻राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे कुलगुरूंना निवेदन
👉🏻बॅकलॉग चा फॉर्म भरण्यापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार फॉर्म भरण्याची संधी
नागपूर/ प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जगदीश पंचबुधे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश माजी सरचिटणीस राहुल कामळे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांच्या घेराव करण्यात आला व विध्यार्थ्यांच्या अनेक विषयाला घेऊन चर्चा करण्यात आली
ज्यात प्रामुख्याने समर 2020 च्या बॅकलॉग परीक्षा फॉर्म भरण्यापासून वंचित असलेल्या विध्यार्थ्यांना संधी देण्यात यावी कारण आपल्या विद्यापीठाशी संलगीत जास्तीत जास्त विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून जगभर कोरोना महामारीचे संकट असून आपल्या देशात लोकडाऊन करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थी बॅकलॉग परीक्षेचा फॉर्म भरू शकले नाही आणि जेव्हा सर्व सुरळीत झाले तेव्हा फॉर्म भरण्याची तारीख निघून गेली होती तर आता परीक्षा होण्या आधी राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्याची संधी देण्यात यावी यावर कुलगुरू यांनी मागणी मंजूर करत सांगितले की नोव्हेंबर महिन्यात परीक्षा होण्या आधी सर्व विद्यार्थ्यांना बॅकलॉग परीक्षा फॉर्म भरण्याची संधी देण्यात येईल
अशे आश्वासन संघटनेला देण्यात आले त्यावर संघटनेचे राहुल कामळे यांनी सांगितले की जर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळाली नाही व विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर संघटना विद्यापीठ परिसरात तीव्र आंदोलन करेल व याची सर्व जबाबदारी ही विद्यापीठ प्रशासनाची राही
या प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी पदवीधर संघाचे माजी जिल्हाध्यक्ष *गौतम वैद्य,* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूर जिल्हा उपाध्यक्ष *निशांत घोडे,* सरचिटणीस *दर्शन बोढारे,* नागपूर शहर उपाध्यक्ष *मनीषा शाहू, रजत अतकरे,* नागपूर शहर सरचिटणीस *श्रुतम डोंगरे, ऋतुजा अंबादे,* उत्तर नागपूर सचिव *प्रशिक डोंगरे, शुभम शहारे, नुपूर काकडे, प्रितम घ्यार, विश्वजित मोटघरे, चिन्मय पडोळे, कुशल पेठे, राजू भुईकर, मंगेश दाणी, दिपक मरस्कोल्हे, प्रणाली बानते, मानसी पात्रीकर, जय पटेल, राहुल किंहेकर, प्रणय शहारे, इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते