Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०७, २०२०

काटोल तालुक्यात शहरापेक्षा ग्रामीण रुग्ण जास्त




आज बुधवारला तालुक्यात 11 Positive

अकराशे आकडा उद्या पार होणार...

#एकूण पोसिटीव्ह 1098, उपचार 174, बरे झाले905, मृत 19


काटोल : तालुक्यात कोविड -19 पोसिटीव्ह केसेस अकराशे पर्यत पोहचल्या त्यामुळे नगर व तालुका प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन उपाय योजना आखल्या यात जनतेनी सहकार्य केल्याने काही अंशी यश आल्याचे दिसून येते. प्राप्त माहितीनुसार शहरात कमी व तालुक्यात ग्रामीण भागात गलेय दिवसात व आज पण केसेस वाढ दिसून येते. ग्रामीण रुग्णालय व 3 पीएचसी सेंटर मधून करोना संबंधित रॅपिड अँटीजन टेस्ट दररोज घेण्यात येते .यात बुधवारला 63 टेस्ट घेण्यात आल्या.काटोल शहरात 4 तर ग्रामीण भागात 7 असे एकूण 11 पोसिटीव्ह रुग्ण आढळले. शहरात जनता कर्फु मुळे जागरूकता आले. जनता सलग चार दिवस घराबाहेर पडली नाही . उपचार व पुरेसा आराम केल्याने पोसिटीव्ह केसेस कमी निघत असल्याचे वर्तविले जात आहे.आरोग्य प्रशासनाचे मते काही सकारात्मक बदल झाला असे गृहीत धरता पुफहिल आठवड्यात खरा अंदाज येईल. याकरिता सर्वानी शासनाचे दिशा निर्देशाचे पालन करण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालय काटोल नव्याने रुजू झाले वैधकीय अधीक्षक डॉ सुनील डवरे यांनी दिला., काटोल शहरात बुधवारला जानकी नगर परिसर 2, शनी चौक, व शिंदे ले आऊट प्रत्येकी 1 असे चार पोसिटीव्ह आढळल्याचे डॉ सुधीर वाघमारे यांनी सांगितले.तसेच ग्रामिण भागात कंलभा 3,तर सोनोली, मोहखेडी, पारडसिंगा, पठार आदी ठिकाणी प्रत्येकी 1 असे सात पोसिटीव्ह मिळाल्याचे नायब तहसीलदार शैलेश टिपरे यांनी माहिती दिली. तालुक्याचा पोसिटीव्ह रुग्ण आकडा 11 वाढून 1098 पोहचला असून उद्या अकराशे आकडा ओलाडणार हे नक्की...


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.