Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पुणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, मार्च १५, २०२३

राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाच्या वतीने महिला दिन WomenDay

राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाच्या वतीने महिला दिन WomenDay




जुन्नर /आनंद कांबळे
जागतिक महिला दिनानिमित्ताने जुन्नर मधील राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. International WomenDay 

यामध्ये तेजस्विनी पुरस्कार वितरण ,विविध गुणदर्शन,फँन्सी ड्रेस स्पर्धा ,नृत्य स्पर्धा ,मराठी लावण्याचा कार्यक्रम यांचा समावेश होता.

मिसेस जुन्नर सौंदर्य स्पर्धेत पहिला क्रमांक सरिता खोत , पूजा फुलपगार , रत्ना खोत यांना जाहिर करण्यात आला.
सोलो डान्स स्पर्धेमध्ये किमया जोशी , सेजल दुबे , सानिका बोऱ्हाडे तर सोलो डान्स वयोगट 31 ते 80 यामध्ये श्वेता पवार , अर्चना धोत्रे , अलका वाकचौरे , ग्रुप डान्स स्पर्धेत किमया व हिमानी तितर तर ग्रुप डान्स वयोगट 31 ते 80 यामध्ये दाभाडे ग्रुप , श्वेता व स्वाती ग्रुप , शिवाई भजनी मंडळ या सर्वांना पहिले तीन क्रमांक जाहीर करण्यात आले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी 11 पैठण्यांचा लकी ड्रा काढण्यात आला.

या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सीमा शरद सोनवणे , राजश्री वल्लभ बेनके , सुमित्रा सोपान शेरकर , पूजा बुट्टे पाटील , राजश्री बोरकर , अभिनेत्री ऋतुजा जुन्नरकर आदींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाच्या अध्यक्षा अलकाताई फुलपगार , ज्योती चोरडिया , राखी शहा , वैशाली भालेकर , राजश्री कांबळे , श्वेता पवार ,स्वाती पवार,सुरेखा जढर,नेना राजगुरव,सुजाता लुंकड, सरिता डोके ,मंगल शिंदे ,गीतांजली डोके ,रत्ना घोडेकर ,संगीता बेळे,अनुराधा गरीबे, केतकी देठे,पूनम नरोटे , गीता खोत,रत्नमाला खोत भूमिषा खत्री आदींनी विशेष परिश्रम घेतले.

WomenDay 


शनिवार, फेब्रुवारी १८, २०२३

जुन्नर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा, बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार Anganwadi workers

जुन्नर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा, बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार Anganwadi workers



जुन्नर :आनंद कांबळे
सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मेळावा आज (दि.१७) तळेरान (ता.जुन्नर) येथे जिल्हा सल्लागार कॉम्रेड लक्ष्मण जोशी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने २० फेब्रुवारी २०२३ पासून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, वेतनवाढ मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये सक्रिय सहभागी होऊन संप यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी जिल्हा सल्लागार लक्ष्मण जोशी म्हणाले, अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि मानधन वाढ, नवीन चांगला मोबाईल, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत सेवासमाप्ती लाभ द्यावेत, निवृत्तिवेतन सुरु करावे, नवीन मोबाईल, पदोन्नती बाबतचे निकष निश्चित करावेत, आहार, इंधन, प्रवास व बैठक भत्ता मिळावा, मोबाईल रिचार्जची थकीत देयके देण्यात यावीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळाव्यात, वाढलेल्या लोकसंख्येसाठी नवीन अंगणवाडी सुरु करावी, मानधनामध्ये सेवेच्या अवधीनुसार वाढ द्यावी, जादा पदभाराचा अतिरिक्त मेहनताना, साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, विविध विमा योजनांचा लाभ, इंधन व आहार दरात वाढ करावी, आदी मागण्यांना घेऊन हा संपन्न होणार आहे‌. हा संप सर्व अंगणवाडी महिलांनी मोठ्या ताकतीने सहभागी व्हावे.

यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शुभांगी शेटे, सचिव मनीषा भोर, सुप्रिया खरात, सुशील तांबे, मीना मस्करे, आदींसह पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

मंगळवार, फेब्रुवारी ०७, २०२३

भाजप मध्ये महापुरुषांचा अवमान करण्याची स्पर्धाच; सुषमा अंधारे

भाजप मध्ये महापुरुषांचा अवमान करण्याची स्पर्धाच; सुषमा अंधारे


जुन्नर येथे महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे.


जुन्नर /आनंद कांबळे
देशात व राज्यात भाजप जातीपातींचे द्वेषमूलक राजकारण करत आहे. भाजप मध्ये महापुरुषांचा अवमान करण्याची स्पर्धाच लागलेली आहे. याबाबत भाजप चे राज्यातील नेते अवाक्षरही काढत नाहीत तर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नावाने कोश्यारी तर बोलण्याने विषारी आहेत अशी जळजळीत टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जाहीर सभेत अंधारे बोलत होत्या.
यावेळी आमदार सचिन अहिर, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जयश्री पलांडे, जिल्हा प्रमुख सुरेश भोर,अनिष गाढवे, गुलाब पारखे, ऑड अविनाश रहाणे, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष विकी पारखे यांसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अंधारे म्हणाल्या की, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे भागीदार असलेले अजय अशर यांना नीती आयोगावर पाठवले असून किरीट सोमय्या यांनी अजय अशर यांचे बँक अकाउंट तपासावे अशी मागणी केली. राज्यात महिला, विद्यार्थी, शेतकरी व कामगार यांच्या प्रश्नांवर गेली पाच सहा महिने सत्ताधारी काहीच बोलत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश देऊनही विमा कंपन्या ऐकत नसल्याने नक्की विमा कंपन्या कुणाच्या आशीर्वादाने चालतात असा प्रश्न देखील अंधारे यांनी यावेळी विचारला. बागेश्वर बाबा, संभाजी भिडे यांच्याकडून होणाऱ्या अवमानजनक वक्तव्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही शब्द काढत नाहीत.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा घसरलेला असून सर्वसामान्याच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांची फी परवडत नाही. शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पैसा खर्च करायला नकार देत असल्याचे सांगत अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजपर्यंतच्या जाहिरातीच्या खर्चाचा हिशोबच भर सभेत वाचून दाखविला. 
       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी भाजप सोबत गेले असे म्हणतात तर वेळोवेळी महाराष्ट्राचा होणारा अपमान, राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत तर कर्नाटक सरकार राज्यातील गावे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं होत असताना मुख्यमंत्री शिंदे काहीच का बोलत नाहीत असा सवाल यावेळी अंधारे यांनी विचारला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी नाशिक मध्ये खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच नागपुरात मतदारांनी त्यांच्यासाठी खड्डा खोदला असल्याची टीका भाजपवर केली. 
       यावेळी अंधारे यांनी शैक्षणिक संस्था व पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर तर माजी आमदार शरद सोनवणे यांच्यावर सोनवणे हे एकटे उभे राहिले तर कधीच निवडून येऊ शकत नाही अशी टीका केली.    
        यावेळी सचिन अहिर यांनी सांगितले की, भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची संधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आली असती, हे ओळखून अडीच वर्षांपासून त्यांच्याविरोधात षडयंत्र रचण्याचे काम विरोधकांनी केले. लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सगळे अधिकार देऊन देखील पक्ष वाढवता आला नाही, कार्यकर्त्याना थांबवता आलं नाही, अडचणीच्या काळात साथ सोडली अशी टीका आढळराव पाटील यांच्यावर केली तर कुठे गेला बिबट्याचा पार्क असा प्रश्न विचारत आमचाच बिबट्या तिकडे पळायला लागला असल्याचे सांगत माजी आमदार शरद सोनवणे यांच्यावर टीका केली. तर पक्षाचा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकडाऊन आता उठलेला आहे असे देखील अहिर म्हणाले. 


     - 
     नरेंद्र मोदी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शक असल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी  गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील मकरंद अनासपुरे यांची नारायण वाघ ही भूमिका असलेला दाखला देत आधुनिक राजकारणातला नारायण वाघ म्हणजे एकनाथ शिंदे असल्याचे सांगत समाचार घेतला. यावेळी
उपस्थितांमध्ये हशा पिकला. 



     

गुरुवार, डिसेंबर २९, २०२२

दीड महिन्यात १०६ बालकांना भेटले आई बाबा | Mother and father

दीड महिन्यात १०६ बालकांना भेटले आई बाबा | Mother and father

जिल्ह्यातील १०६ बालकांना मिळाले हक्काचे कायदेशीर पालक

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने दत्तक विधानांसाठी गतीने प्रक्रिया


पुणे, दि. २९: नविन दत्तक नियमावली अंमलात आल्यापासून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या दीड महिन्यात १०६ बालकांचे दत्तक विधान आदेश केले आहेत. त्यामुळे या अनाथ, सोडून दिलेल्या अथवा जैविक पालकांनी समर्पण केलेल्या बालकांना कायदेशीर पालक मिळाले असून त्यांची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.

यापूर्वीची दत्तक विधान आदेश प्रक्रिया ही ४ जानेवारी १९९७ नुसारची दत्तक विधान नियमावली व केंद्रीय दत्तक स्रोत प्राधिकरण (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी- कारा) यांच्या दत्तक नियमावली २०१७ नुसार चालत होती. यामध्ये बाल कल्याण समितीने बालकाला दत्तकासाठी मुक्त केल्यावर आणि दत्तक समितीने मान्यता दिल्यानंतर संस्था दत्तकसाठीचे अर्ज वकिलामार्फत न्यायालयामध्ये दाखल करत होते व न्यायाधीश दत्तकाचे आदेश देत होते. परंतु, केंद्रीय दत्तक स्त्रोत प्राधिकरणद्वारा २३ सप्टेंबर २०२२ च्या अधिनसूचनेनुसार नविन दत्तक नियमावली बनवण्यात आली आहे. या नवीन नियमावलीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून बालकांचे दत्तक आदेश देण्यात येत आहेत.

नवीन दत्तक नियमावली अंमलात आल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालयाकडील वर्ग झालेली प्रकरणे व नवीन दत्तक प्रकरणांमध्ये नियमानुसार कार्यवाही करुन १०६ बालकांचे दत्तकविधान आदेश देण्यात आले आहेत. या दत्तक विधानाची सुरुवात १४ नोव्हेंबर २०२२ या बालदिनाचे औचित्य साधून करण्यात आली.

१०६ दत्तक आदेश झालेल्या बालकांपैकी यामध्ये ९० बालके देशांतर्गत दत्तक देण्यात आली आहेत तर १६ बालके परदेशामध्ये (आंतरदेशीय) दत्तक देण्यात आली आहेत. या दत्तक आदेशामुळे या मुलांना त्यांच्या हक्काचे कायदेशीर पालक व हक्काचे कुटुंब मिळाले आहे. मुलाला जन्माने जे अधिकार मिळतात ते सर्व अधिकार व विशेषाधिकार दत्तक विधान आदेशामुळे प्राप्त होतील.

दत्तक नियमावलीमध्ये सुधारणा झाल्यानंतर न्यायालयाकडील वर्ग झालेली एकूण १०० प्रकरणे व कारा पोर्टल नुसार नवीन मान्य झालेली प्रकरणे यांची संख्या जास्त असल्याने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी या सर्व प्रकरणात गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद व कार्यालयातील कर्मचारी व तसेच जिल्ह्यातील मान्यता प्राप्त दत्तक संस्था सोफोश, भारतीय समाज सेवा केंद्र, रेणुका महाजन ट्रस्ट, अरुणाश्रय, महिला सेवा मंडळ, आधार दत्तक संस्था आणि पंडिता रमाबाई मुक्ती मिशन यांच्या एकत्रित प्रयत्नाने व सर्वांनी आपआपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे सर्वाधिक १०६ दत्तक विधान आदेश दीड महिन्यात पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ज्या पालकांना मुल दत्तक घ्यावयाचे आहे त्यांनी दत्तक प्रक्रिया अंतर्गत बाळ दत्तक घेण्यासाठी https://cara.nic.in या संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अनिवासी भारतीय, भारतात राहणारे परदेशी पालक, नाते संबंधातील दत्तक इच्छुक पालक आणि सावत्र पालकांची दत्तक प्रक्रिया करण्यासाठी दत्तक नियमावली २०२२ नुसार प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

नोंदणी केल्यानंतर दत्तक इच्छुक पालकांची गृह भेट, सामाजिक तपासणी, आवश्यक दस्त ऐवजांची पूर्तता झाल्यानंतर ‘कारा’ संकेतस्थळावरून दत्तक नियमावली २०२२ नुसार सर्व दत्तक विधान प्रक्रिया केली जाते. त्यानंतर सदर प्रकरण विशेष दत्तक संस्थामार्फत संस्थेत दाखल बालकांचे दत्तक प्रकरण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत छाननी करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जाते. तसेच नाते संबंधातील व सावत्र पालकाचे दत्तक प्रक्रियेची अर्ज ‘कारा’ पोर्टलवर मान्य झाल्यावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडून छाननी झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केली जाते.

तिन्ही प्रकारचे दत्तक प्रकरण अर्जावर दत्तक नियमावली २३ सप्टेंबर २०२२ नुसार केंद्रीय दत्तक स्त्रोत प्राधिकरण द्वारा नवीन दत्तक नियमावलीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मान्येतेने व स्वाक्षरीने बालकांचे दत्तक आदेश देण्यात येत आहेत.
0000

शनिवार, डिसेंबर २४, २०२२

शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम जल्लोषात Gundarshan program in Jholosh

शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम जल्लोषात Gundarshan program in Jholosh

शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, जुन्नर विविध गुणदर्शन कार्यक्रम जल्लोषात



जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ अंतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. धनेश संचेती यांच्या शुभहस्ते नृत्य देवता नटराज मूर्तीचे पूजन व श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेश आहेर म्हणाले की संस्थेने यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयाला स्वतंत्र वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यास परवानगी दिली त्याबद्दल मी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच या वार्षिक स्नेहसंमेलनात माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला प्रत्येक विद्यार्थी हा यशाच्या नवीन क्षितिजावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करेल हे देखील प्राचार्य या नात्याने मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो.
या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती यांनी विद्यार्थी व पालकांचे संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत केले. संस्थेमध्ये एकूण नऊ विभाग कार्यरत असून या सर्व विभागांचे काम अतिशय उत्तमरीत्या चालू आहे. आज संस्थेमध्ये चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयास स्वतंत्र वार्षिक स्नेहसंमेलन घेण्याची परवानगी दिली आहे व यापुढे देखील कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन स्वतंत्र होईल असा शब्द दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर एखादा छंद देखील जोपासणे आवश्यक आहे कारण या छंदासोबत व्यक्ती आपले जीवन व्यतीत करत असतो म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आवडीचा छंद देखील जोपासावा.

या प्रसंगी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष धनेश संचेती, तसेच विद्यमान कार्यकारी मंडळ सदस्य राहुल जोशी, सुनील गुरव, आनंद सासवडे, प्राचार्य प्रा. गणेश आहेर, शिक्षक प्रतिनिधी प्रा. विद्या कर्पे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अर्चना सानप, परीक्षक तेजल गुजराथी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघमारे यांनी केले. तसेच प्रा. डॉ. राजू थोरवे यांनी आभार मानले.
आदिवासी विकासमंत्र्यांच्या घरावर जवाब दो मोर्चा

आदिवासी विकासमंत्र्यांच्या घरावर जवाब दो मोर्चा

आदिवासी विकासमंत्र्यांच्या घरावर जवाब दो मोर्चा

आदिवासी पदभरती सामाजिक न्याय परिषदेत घोषणा




जुन्नर /आनंद कांबळे
आरक्षण ही कोणाची भिक नाही, तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. अधिसंख्य पदांवरील 12500 बोगस आदिवासींना संरक्षण देत असताना आदिवासी मंत्री काय शेण खात होते का? असा सवाल करत बोगस आदिवासी जात चोरांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी येत्या ३० जानेवारी २०२३ या महात्मा गांधी यांच्या शहादत दिनादिवशी सर्व आदिवासी संघटनांना सोबत घेऊन आदिवासी विकास मंत्र्यांच्या घरावर जवाब दो मोर्चा तर मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मोर्चा काढणार आहोत, अशी घोषणा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. उदय नारकर यांनी केली.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने आयोजित आदिवासी पदभरती सामाजिक न्याय परिषदेत नवीन कांदा मार्केट येथे ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे होते.

यावेळी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, DYFI चे राज्यअध्यक्ष व पंचायत समिती तलासरी चे सभापती नंदू हडळ, SFI राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, माकप पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे, किसान सभा पुणे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, डॉ. महारुद्र डाके, प्रा. संजय साबळे, प्रा. संजय मेमाणे, डॉ. मंगेश मांडवे, SFI राज्यउपाध्यक्ष भास्कर म्हसे आदींसह उपस्थित होते.

यावेळी डॉ.अजित नवले म्हणाले, राजकारणात दररोज नवनवीन मालिका सुरू आहेत. मात्र, विधीमंडळात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. आदिवासी समाज आता कुठं समाजाच्या मुख्य प्रवाहात येण असताना आदिवासी समाजाला संविधानाने दिलेले हक्क पायदळी तुडविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आता काळ सोकावतोय, आता लढा तीव्र करण्याची गरज आहे. हा मुद्दा फक्त आदिवासींचा नसून हा संविधान टिकविण्याचा आहे. त्यासाठी आदिवासी मंत्री, आमदार, खासदारांबरोबरच बिगर आदिवासी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजे. तसेच त्यांनीही न्याय हक्कांसाठी एकत्र आले पाहिजे.

आदिवासींच्या एकूण भरलेल्या जागांवर ५७ टक्के. जागांवर घुसखोरी झाल्याची खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विधानसभेत जाहीर केल्यानंतर २००१ चा जातपडताळणी कायदा केला गेला. परंतु आजपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही, असे अध्यक्षीय भाषणात ॲड. नाथा शिंगाडे म्हणाले.

Jawa Do Morcha at the house of Tribal Development Minister

बुधवार, डिसेंबर २१, २०२२

श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिर सेवा मंडळ पारुंडेच्या नूतन संचालक मंडळाची 2022 ते 2027 साठी बिनविरोध निवड

श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिर सेवा मंडळ पारुंडेच्या नूतन संचालक मंडळाची 2022 ते 2027 साठी बिनविरोध निवड





जुन्नर /आनंद कांबळे

जुन्नर तालुक्यातील नावाजलेली शिक्षण संस्था म्हणून श्री ब्रम्हनाथ सेवा मंडळ पारुंडे चा उल्लेख केला जातो. या संस्थेच्या नूतन संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. 

सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी अविनाश किसन पुंडे यांची तर उपाध्यक्षपदी वसंत तुकाराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 तसेच दिगंबर सिताराम पुंडे यांना सचिव पदी नेमण्यात आलेले आहे. पुढील प्रमाणे संचालक मंडळ निवडण्यात आली आहे.


तुकाराम नारायण जाधव, किसन बबन गायकवाड, विवेक विठ्ठल पवार, उमेश ज्ञानेश्वर पुंडे, अमित ज्ञानेश्वर आंद्रे, विश्वनाथ भगवान जाधव, भगवान रघुनाथ पवार, राहुल बबन दुरगुडे.
सेवा मंडळाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तयार असल्याचे नूतन अध्यक्ष अविनाश पुंडे यांनी यावेळी सांगितले.

मंगळवार, डिसेंबर १३, २०२२

 शतक महोत्सवी कट्ट्यात शिवरायांचा इतिहास

शतक महोत्सवी कट्ट्यात शिवरायांचा इतिहास

*जुन्नरी कट्टाचा १०० वा शतक महोत्सवी कट्टा संपन्न*


*जेष्ठ इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी मांडला शिवरायांचा इतिहास.




जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर व परिसरातील ऐतिहासिक माहिती होणेकरिता बघा जुन्नर..जगा जुन्नर या संकल्पनेवर आधारित कार्यरत असलेली व १६ जानेवारी २०२१ रोजी सुरू झालेली जुन्नरी कट्टा या संस्थेच्या प्रवासाचा १०० वा शतक महोत्सवी कट्टा समारंभ शनिवार (दि. १० डिसेंबर) रोजी महालक्ष्मी लॉन्स, जुन्नर येथे संपन्न झाला.


या कार्यक्रमास शिवरायांचे दुर्गकारण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी जेष्ठ इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर हे प्रमुख व्याख्याते लाभले होते.वनविभागाच्या माध्यमातून पात्र गाईड यांना त्यांनी इतिहासाचे मार्गदर्शन केले. यावेळी जुन्नरी कट्टाच्या लघुपुस्तिकेचे प्रकाशन प्र. के. घाणेकर यांचे हस्ते झाले. स्वराज्यातील गडकोट, किल्ले आदींची स्थापत्य, बांधकाम शैली त्याचे असणारे महत्व त्याचप्रमाणे शिवरायांनी दिलेली प्रेरणा यावर त्यांनी विस्तृतपणे असलेला इतिहास सर्वांसमोर मांडला.


या कार्यक्रमास जुन्नरी कट्टा, शिवाजी ट्रेल,स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था पदाधिकारी यामध्ये मिलिंद क्षिरसागर, मुकुंद उत्पात,विनायक खोत, विजय कोल्हे,राजेंद्र जुंदरे,किरण कबाडी, मारुती जाधव, प्रशांत केदारी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे व इतिहासप्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा केदारी यांनी केले व विनायक खोत यांनी आभार मानले.

सोमवार, डिसेंबर १२, २०२२

शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा जल्लोषात

शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा जल्लोषात




जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ अंतर्गत विविध स्पर्धांचा उद्घाटन सोहळा जल्लोषात

जुन्नर /आनंद कांबळे

संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करून शिव संस्कृती रॅली ची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील ७५ मुलींचे लेझीम पथक, ४५ मुले व मुलींचे ढोल ताशा पथक, ३० मुलींचे झेंडा पथक व लाठीकाठी पथक सहभागी झाले होते.

तसेच इतर सर्व विद्यार्थी देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

शिव संस्कृती रॅली ही श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा ते नवीन बस स्थानक ते बाजार समिती मार्गे कनिष्ठ महाविद्यालय पर्यंत काढण्यात आली होती. सदर रॅलीमध्ये लेझीम पथक, ढोल ताशा पथक, झेंडा पथक व लाठीकाठी पथक यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेश आहेर यांनी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे त्याचबरोबर उज्वल निकालाची परंपरा अखंडित ठेवणं तसेच कलागुण विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे हाच कनिष्ठ महाविद्यालयाचा हेतू आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा विषयक थोडक्यात आढावा दिला.


तसेच प्राध्यापकांच्या कामाचे व विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य नितीन मेहता यांनी विद्यार्थ्यांना चारित्र्य संपन्न राहणे व संस्कारक्षम शिक्षण ही काळाची गरज आहे व जुन्नर एज्युकेशन सोसायटी ती जोपासत असल्याचे सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती यांनी या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन झाल्याचे घोषित करून जुन्नर एज्युकेशन सोसायटी ही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे म्हणूनच संस्थेमध्ये आज चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयाचे स्वतंत्र वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले आहे.  सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचा आनंद द्वीगुणीत करावा असे प्रतिपादन केले.


जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सुधीर ढोबळे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाची प्रगती समाधानकारक असून कनिष्ठ महाविद्यालय हे स्पर्धेच्या प्रत्येक क्षितिजावर योग्य पद्धतीने काम करत आहे असे सांगितले. या प्रसंगी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष, ॲड. सुधीर ढोबळे, मा. उपाध्यक्ष श्री. संजय बुट्टे पाटील, मा. कार्याध्यक्ष श्री.धनेश संचेती, तसेच विद्यमान कार्यकारी मंडळ सदस्य मा. श्री. नितीन मेहता, मा. श्री. राहुल जोशी, मा.श्री. सुनील गुरव, मा. डॉ. नीलीमा जुन्नरकर, मा.श्री. जितेंद्र देशमुख, मा. श्री. आनंद  सासवडे, प्राचार्य प्रा. गणेश आहेर तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघमारे यांनी केले. तसेच प्रा. डॉ. राजू थोरवे यांनी आभार मानले.

गुरुवार, डिसेंबर ०८, २०२२

गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद




जुन्नर : आनंद कांबळे

जुन्नरच्या शहरातील भरवस्तीत गेल्या महिन्यात जमावाने गोरक्षकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जुन्नर शहरात गुरुवार (दि.०८) रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच वैद्यकीय सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगळता छोटे-मोठे व्यापारी, दैनंदिन भाजी विक्रेते यांनी आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवत आपला पाठींबा दर्शविला.
 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर येथे शहर व परिसरातील गोरक्षक, शिवभक्त मोठ्या संख्येने सामील होत सुरुवात झालेल्या निषेध मोर्चाची तहसील कार्यालयाच्या आवारात सांगता करण्यात आली.
     याप्रसंगी अखिल भारत कृषी गो सेवा संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद एकबोटे,मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, भाजपा नेत्या आशा बुचके,सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व दुर्ग संवर्धक शैलेश गोजमगुंडे, मधुकर काजळे, सुनिल काळे, शिवराज संगनाळे, मयुर दिवेकर आदी उपस्थित होते.
     दरम्यान, मोर्चात मनोगत व्यक्त करताना मिलिंद एकबोटे यांनी गोहत्या करून शिवजन्मभूमी जर कोणी अपवित्र करणार असेल त्याचप्रमाणे हिंदू स्त्रियांची जर छेडछाड केली गेली तर कठोरातील कठोर भूमिका घेऊन योग्य तो धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. तसेच हल्ल्यातील आरोपींविरुध्द प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावीत व अटक करावी अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असेही ते म्हणाले.
      जुन्नर शहरात संपूर्ण गोवंश बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी, लव्ह जिहाद निर्बंध कायदा लागू करावा,धर्मांतर बंदी,शेतकऱ्यांच्या गाई,बैल चोरी करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई, संवेदनशील शहर म्हणून अधिकची पोलीस चौकी उभारावी तसेच जुन्नर शहरातील सर्व सामान्य नागरिकांना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सहकार्याचा अभाव अशा मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, तहसिलदार यांना दिले.Strict shutdown in protest against attack on cow guards

सोमवार, नोव्हेंबर ०७, २०२२

विहीरवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र बसवा, ..अन्यथा बेमुदत आंदोलन

विहीरवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र बसवा, ..अन्यथा बेमुदत आंदोलन

जुन्नर : गोद्रे येथे विहीरवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र बसवा, ..अन्यथा बेमुदत आंदोलन



जुन्नर /आनंद कांबळे
: गोद्रे गावातील उतळेवाडी येथील सार्वजनिक विहीरवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र (फिल्टर) तसेच जाळी बसवण्यात यावे, अशी मागणी आज (दि.७) किसान सभा महिला गाव समितीच्या वतीने ग्रामपंचायत गोद्रे चे ग्रामसेवक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे

निवेदनात म्हटले आहे की, गोद्रे येथील उतळे वाडी या ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. त्या विहिरीतील पाणी वारंवार दूषित होते. हवेने आजूबाजूच्या परिसरातील कचरा जातो, त्यामुळे अनेक नागरिक, लहान मुले, महिला यांना वारंवार साथीच्या आजाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक विहीरवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र (फिल्टर) तसेच जाळी बसवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, १५ डिसेंबर २०२२ पर्यंत सार्वजनिक विहीरीवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र बसवले नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

किसान सभा महिला गाव समितीच्या अध्यक्ष प्रियांका महेंद्र उतळे, सचिव सोनाली दत्तात्रय सुरकुले, उपाध्यक्ष कमल विलास उतळे, सदस्य सुनीता नामदेव उतळे, लता डिंगबर उतळे, तसेच ग्रामपंचायत गोद्रे च्या सदस्य दीपाली भरत उतळे हे उपस्थित होते.

बुधवार, ऑक्टोबर १९, २०२२

सेवा पंधरवडा निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध सेवांचे वितरण

सेवा पंधरवडा निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध सेवांचे वितरण



पुणे दि.१८- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत भोर तालुक्यातील इंगवली येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते विविध सेवांचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील, गट विकास अधिकारी स्नेहा देव, विविध विभागाचे अधिकारी, इंगवली ग्रामस्थ उपस्थित होते.

उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, कोविड कालावधी नंतर महसूल विभागात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत आयोजित केल्याने त्यातून प्रलंबित फेरफार निर्गमित करण्यात येऊन नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्यात येत आहे. सेवा हमी कामकाजामध्ये आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात दिलेल्या एकूण सेवांपैकी ९६ टक्के सेवा या वेळेत दिलेल्या आहेत. सेवा पंधरवड्यात देखील प्रशासनाकडून जास्तीत जास्त सेवा व प्रलंबित प्रकरणे निर्गमित करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या २ ऑक्टोबरपर्यंत भोर उपविभागातील विविध गावात अशा शिबिराचे आयोजन करून नागरिकांच्या अर्जावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच त्यांना विविध सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. कचरे यांनी यावेळी दिली.

शिबिरात महसूल विभागाच्यावतीने लागवडीखाली आणलेल्या पोटखराब अ वर्ग क्षेत्राचे आदेश व सुधारीत ७/१२ , नवीन शिधापत्रिका व सुधारित मालमत्ता पत्रक आदी सेवांचे वितरण करण्यात आले.

#राष्ट्रनेता‌_ते_राष्ट्रपिता
अरे व्वा! काव्यसंग्रहाची गिनीज बुकमध्ये नोंद

अरे व्वा! काव्यसंग्रहाची गिनीज बुकमध्ये नोंद

अक्षदा बाबेल व रतिलाल बाबेल उभयतांची
कवीता




जुन्नर /आनंद कांबळे
ग्रामोन्नती मंडळ, नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव येथे गेली 30 वर्षांपासुन विज्ञान व गणित अध्यापनाचे कार्य रतिलाल बाबेल करीत असून दैनंदिन जीवनातील उपयुक्त मूलद्रव्यांची माहिती "कविता मुलद्रव्याची" या काव्यसंग्रहातून त्यांनी कवितेच्या रूपाने मांडली असून या कवितासंग्रहाला, जॅकी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंटर नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, हावर्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन यांचे पुरस्कार प्राप्त झाले असून नुकतीच या कवितासंग्रहाची "गिनीज बुक "मध्ये नोंद झाल्याची माहिती भारतातील मॅनेजर भाव्या शर्मा यांनी दिली आहे. मूलद्रव्यांच्या कविता मराठीतून करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे डॉक्टर जे.के सोळंकी व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर निवास पाटील यांनी म्हटले आहे. रतिलाल बाबेल यांचा पुढील काही दिवसांत "कविता शास्त्रज्ञांची" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.
सौ अक्षदा रतिलाल बाबेल यांना रांगोळी काढण्याचा छंद असून भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चालू होता म्हणून "भारतीय तिरंग्याचा इतिहास" सन 1906 ते 1947 अशी नऊ बाय सात म्हणजे 63 स्क्वेअर फुटांची रांगोळी सलग 13 तास काढून गिनीज रेकॉर्ड केले आहे. या रांगोळीसाठी निळा, पांढरा,हिरवा, लाल, पिवळा, केशरी असे विविध 18 किलो रंग लागले आहेत.याची इनफ्लून्सर बुक ऑफ रेकॉर्ड व जीनियस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अगोदर नोंद झाली आहे.
बाबेल दाम्पत्याची गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याबद्दल संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, उपाध्यक्ष सुजितभाऊ खैरे, रवींद्रजी पारगावकर, डॉ. आनंद कुलकर्णी,स्वर्गीय रामचंदजी बाबेल ट्रस्ट चे अध्यक्ष जे.सी. कटारिया, ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. माया कटारिया,बाबेल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच जुन्नर तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक बंधू-भगिनींनी पुढील वाटचालीसाठी बाबेल दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Oh wow! Record of Poetry in Guinness Book

मंगळवार, ऑक्टोबर ११, २०२२

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी अपडेट रहावे -माजी मंत्री नामदार सतेज पाटील Former Minister Namdar Satej Patil

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी अपडेट रहावे -माजी मंत्री नामदार सतेज पाटील Former Minister Namdar Satej Patil




जुन्नर /आनंद कांबळे
पुणे -प्राथमिक शिक्षणातील शाळाबाह्य मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे त्यामुळे शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी शिक्षकांनी कायम अपडेट राहिले पाहिजे असा सल्ला माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील यानी शिक्षकांना दिला.

महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या पुणे येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या नटसम्राट विजय तेंडुलकर सभागृहात आयोजित शिक्षण परिषद व आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .

अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे होते .
नगरसेवक व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विकास नाना दांगट -पाटील व नगरसेवक आबा बागुल , शिक्षणतज्ञ अनिल गुंजाळ आदि मान्यवर उपस्थित होते .

माजी मंत्री आमदार पाटील म्हणाले की, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 50% पेक्षाही कमी विद्यार्थी महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेण्यास पोहचतात ,हे प्रमाण प्रमाण वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासूनच शंभर टक्के पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत.

माजी मंत्री पाटील पुढे म्हणाले की आई-वडिलाप्रमाणेच अतिशय प्रिय असा गुरु असतो त्यांचे संस्कार देशाचे भावी नागरिक घडवण्यासाठी उपयोगी पडत असतात .सर्व शिक्षक हे समर्पित वृत्तीने काम करीत असतात अशा तील निवडक शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे त्यांचे मी अभिनंदन करतो व या संघटनेने ही शिक्षण परिषद भरवून शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले . त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो

.
अध्यक्षपदावरून बोलताना भरत रसाळे म्हणाले, शासनाने शिक्षकांच्या- विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शिक्षणा प्रतीची अनास्था कमी करावी. शिक्षकांच्या मागण्या शासनाने मान्य करून शिक्षकांना न्याय द्यावा.
 या परिषदेमध्ये वीस पटाखालील शाळा बंद करू नयेत, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक भरती त्वरित करावी , प्रचलित दराने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वेतन द्यावे . अभ्यासक्रम किंवा शैक्षणिक धोरण ठरवताना संघटनांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, संस्थांचे घरफळा पाणी व वीज बिल घरगुती दराने आकारावे, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सरसकट वरिष्ठ व निवड श्रेणी द्यावी, शिक्षकांना कॅशलेस मेडिकल योजना मंजूर करावी, शिक्षकां अशैक्षणिक कामे लावू नयेत खाजगी शाळातील शिक्षकांचा, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी विचार करण्यात यावा. 

नपा / मनपा शाळांतील खाजगी शिक्षकांना १०० टक्के मेडिकल बील राज्य शासनाने द्यावे, संयमान्यतेसाठी आधार कार्ड सक्ती रद्द करावी, अशैक्षणिक कामे देऊ नयेत, शिक्षकांना कॅशलेसमेडिकल योजना लागू करावी,अशा प्रकारचे 30 ठराव या परिषदेमध्ये संमत करण्यात आले .या परिषदेमध्ये शिक्षण तज्ञ अनिल गुंजाळ, जयवंत हक्के, अदिती केळकर ,सारंग पाटील .बादशहा जमादार, महादेव डावरे ,अर्जुन रसाळ ,छोटू मासाळ, प्रियांका बोरसे, कैलास शिंदे ,संगीता चौधरी यांनी विचार मांडले. प्रास्ताविक सारंग पाटील यांनी तर स्वागत संतोष शिळमकर यांनी केले .आभार शिवाजीराव माने यांनी मांडले. सूत्रसंचालन ननवरे यांनी केले. 


ही परिषद यशस्वी करण्यासाठी पुण्याचे पदाधिकारी जी.डी. मोराळे,धीरज गायकवाड,अर्चना मोरे, शिवाजीराव मा,ने विश्वास कोचळे, निलेश डोंग,रे श्रीकांत राहणे ,विजय राठोड, संतोष तनपुरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी अतिशय परिश्रम घेतले .

या परिषदेसाठी महासचिव अंजन पाटील (धुळे ) राज्य मुख्याध्यापक अध्यक्ष जयवंत हक्के ( सोलापूर )राज्य संघटक *बादशहा जमादार ( जयसिंगपूर ) मराठवाडा विभागप्रमुख संतोष पाटील डोणगावकर (औरंगाबाद ) राज्यसचिव शिवाजी भोसले पतसंस्थेचे चेअरमन महादेव डावरे (कोल्हापूर ) महिला आघाडी प्रमुख अतिथी केळकर,* *नंदिनी पाटील राज्य शिक्षकेतर प्रमुख महेश पवार ( नाशिक )विद्युतता बोकील (अहमदनगर ) शशिकांत माळी* *अशोक शिंदे (सांगली )कोकण विभाग प्रमुख महेंद्र कापडी (रत्नागिरी ) यांच्यासह सुमारे हजारभर शिक्षक उपस्थित होते*
......

शुक्रवार, सप्टेंबर १६, २०२२

सेवाभावी गुणवंत शिक्षक सन्मानाने आतार यांचा गौरव Honorable meritorious teacher Atar

सेवाभावी गुणवंत शिक्षक सन्मानाने आतार यांचा गौरव Honorable meritorious teacher Atar



जुन्नर /आनंद कांबळे

 श्री क्षेत्र पारुंडे (ता.जुन्नर )येथील श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर चे माजी मुख्याध्यापक एफ.बी.आतार यांना लायन्स क्लब इंटरनेशनल,पुणेच्या वतीने ऑटोकलस्टर हॉल - चिंचवड येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीष प्रभुणे यांच्या हस्ते " सेवाभावी गुणवंत शिक्षक" या सन्मानाने गौरविण्यात आले.
      त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा , प्रेरणा मिळावी या उद्दशाने लायन्स क्लब ऑफ जुन्नर - शिवनेरीच्या वतीने जुन्नर तालुक्यातील एका सेवाभावी शिक्षकाची निवड करण्यात आली होती.
    आतार यांनी ग्रामीण , आदिवासी भागात जवळपास ३५ वर्ष ज्ञानदानाचे काम केले.सेवेत असताना राजाराम पाटील वृध्दाश्रम , मतिमंद - दिव्यांग मुलांचे नंदनवन जीवन केंद्र , वै.गुरुवर्य कोंडाजीबाबा वारकरी संस्था , सावित्रीबाई फुले वृध्दाश्रम , माजी विद्यार्थी सलग्न गुरुदक्षिणा सोशल फाउंडेशन तसेच किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविणारी डिसेंट फाउंडेशन अशा प्रकारच्या सामाजिक संस्थेत सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे.
     या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ला.राजेश कोठावदे , पद्मश्री गिरीष प्रभुणे, प्रमुख अतिथी कवी अनंत राऊत,उपप्रांतपाल ला.सुनिल चेकर,झोन चेअरमन मिलिंद झगडे ,लायन्स क्लब ऑफ जुन्नर - शिवनेरीचे अध्यक्ष संतोष रासने,ज्येष्ठ लायन गणेश देशमुख,मनोज भळगट आदि मान्यवर, पुणे जिल्ह्यातील लायन पदाधिकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवार, सप्टेंबर १२, २०२२

Weather Update |  चिंचोली येथे निसर्गाचे रौद्ररूप; ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस ... हाहाकार

Weather Update | चिंचोली येथे निसर्गाचे रौद्ररूप; ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस ... हाहाकार



वडज (ता. जुन्नर ) 
जुन्नर शहराच्या दक्षिणेस १० ते १२ कि.मी.अंतरावर डोंगर रांगाच्या परिसरात वसलेले गाव म्हणजे चिंचोली . सलग दोन - तीन दिवसांपासून निसर्गाच्या प्रकोपापुढे निःशब्द झाल्याची प्रचिती चिंचोलीच्या ग्रामस्थांना आली. सव्वा तास झालेल्या धुवाधार पावसाने काही क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकल.


अनेकांच्या घरात पाणी शिरले,घरे पडली,बांध - बंधारे अक्षशः फुटून मार्ग मिळेल तिकडे पाणी पसरू लागले. शेतातील सोयाबीन , टोमॅटो , ऊस , गाजर , बटाटे , भाजीपाला अशी सर्वच पिके पाण्यावर तरंगू लागली , कांदा चाळीत पाणी शिरल्याने खूप नुकसान झाले आहे.शेतकरी पूर्णपणे खचला आहे.वाजेवाडीतील प्राथमिक शाळेची ऑल कंपौंडची भिंत पडल्यामुळे वर्गखोल्यात पाणी शिरल्याने शालेय साहित्याचे देखील खूप नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीने हतबल झालेल्या शेतकऱ्याची शासन पातळीवर त्वरित दखल घेऊन मदत मिळावी तसेच चिंचोली परिसरातील फुटलेले बंधारे न फुटलेले बंधारे , धोकादायक बंधारे यांचे त्वरित सर्वेक्षण करणे, यांची मागणी *सरपंच खंडू काशिद समस्त   ग्रामस्थ - चिंचोली* यांच्या वतीने करण्यात आली आहे.




शेतीचे यांत्रिकीकरण,बदलले हवामान , प्रचंड वृक्षतोड , बांध कोरून शेती वाढविण्याच्या लोभापायी नैसर्गिक प्रवाह बंद होणे , ओढे नाले बुजऊन शेती क्षेत्रात वाढ करणे , त्यात निसर्गाचा लहरीपणा यामुळे  शेती क्षेत्राचे खूप नुकसान होत आहे, भविष्यात या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रगतिशील शेतकरी रामचंद्र पानसरे यांनी सांगितले .

Chincholi is a village located in the hill range at a distance of 10 to 12 km south of Junnar city Pune Dist.

बुधवार, सप्टेंबर ०७, २०२२

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण




शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे,दि.७( आनंद कांबळे ) शिक्षकांनी स्वीकारलेले काम प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून सेवभावनेने करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 
Distribution of Zilla Parishad Best Teacher and President Cup Award
जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण प्रसंगी मंत्री ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे,  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील  म्हणाले,ब्रिटीशांची शिक्षणपद्धती  त्यांच्या स्वार्थासाठी होती. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‍शिक्षणाचा मूळ गाभा पुन्हा एकदा देशातल्या नागरिकांमध्ये बिंबविण्याचा प्रयत्न आहे. लहान वयात झालेले संस्कार घेऊनच मुले पुढे जात असतात. पूर्वी गुरुकुल मध्ये अनेक विषय मुलांना शिकवले जात आणि त्यात पारंगत होऊनच ते बाहेर पडत. सध्या विद्यार्थी एकाच विषयात पुढे असल्याचे दिसून येते. 

नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणातील टप्पे बदलण्यात येणार आहेत. शासन शिक्षणावर बराच खर्च करते. शिक्षकांनी मुलांवर संस्कार करण्यासाठी परिश्रम घ्यावेत.  

वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी ठरावीक वेळेतच काम न करता व वेळेचा विचार न करता काम केले पाहिजे. शैक्षणिक विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्वच्या माध्यमातून  जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तो निधी शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह, क्रीडा विषयक सुविधा, ई-लर्निंग, शाळेसाठी कंपाऊंड बांधण्यासाठी वापरण्यात यावा, असे श्री.पाटील यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व केंद्रप्रमुख यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते. 

Distribution of Zilla Parishad Best Teacher and President Cup Award
00000

रविवार, ऑगस्ट २८, २०२२

Maharashtra CM Eknath Shinde; शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको

Maharashtra CM Eknath Shinde; शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको




*चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

पुणे दि.२८: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शहरातील रिंगरोडच्या नियोजनाविषयी माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,  अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

*नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल*
मुख्यमंत्री साताऱ्याकडे जात असताना नागरिकांनी चांदणी चौक परिसरातील वाहतुकीची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. श्री.शिंदे यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना या भागाला भेट देऊन आवश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले होते. 

आज मुंबईकडे परत जात असताना प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या परिसराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून  नियोजनाची माहिती घेतली. नागरिकांना होणार त्रास लवकर दूर करण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको' हे त्यांचे वाक्य आणि आज दिलेली भेट नक्कीच जनतेला दिलासा देणारी आहे.
 

शनिवार, ऑगस्ट २७, २०२२

*न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे येथे किशोरवयीन मुला-मुलींसाठी प्रशिक्षण शिबिर training camp

*न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे येथे किशोरवयीन मुला-मुलींसाठी प्रशिक्षण शिबिर training camp





जुन्नर /आनंद कांबळे
राष्ट्रीय स्थायी विकास संस्था (NISD) संगमनेर शाखा कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने
व मेट्रोपोलीस फाउंडेशन सपोर्ट सहित किशोरवयीन मुलींकरिता जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा, कोळवाडी , सितेवाडी, तळेरान, मढ, करंजाळे व खिरेश्वर या सात गावांमध्ये सदर प्रकल्प राबविण्यात येत आहे अशी माहिती संस्थेचे विजयकुमार शिंदे यांनी दिली.

दिनांक 25 आँगस्ट पासून मुलांकरिता लिंगभाव प्रशिक्षण व मुलींकरिता आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जात आहेत त्यासाठी मुलींना निरोगी राहण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन डॉक्टर प्राची करपे करीत आहेत. सदर प्रशिक्षणामुळे मुलींना आरोग्य विषयी समस्यांचे निराकरण होत आहे तसेच मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे याकरिता डॉ. कर्पे यांनी स्वसंरक्षणाचे धडे देखील दिले आहेत तसेच मुलांकरिता निलेश पर्बत सर यांनी मुलांना लिंगभाव व स्त्री पुरुष समानता याबद्दल योग्य असे मार्गदर्शन करुन प्रत्येक मुलगी व स्त्रियांना आपण स्वतः मान देण्याकरिता पुढे येऊन तसेच मुलींचे संरक्षण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा या मधून त्यांनी ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून खूप छान असे मार्गदर्शन केले .अशा प्रकारच्या प्रशिक्षणावेळी शाळेतून राष्ट्रीय स्थायी विकास संस्था यांचे स्वागत करण्यात आले. अशा प्रशिक्षणाची गरज शाळेला असल्याचे त्यांच्या बोलण्यातून येत आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस एन.आय.एस.डी संस्थेचे दारोळे सर यांनी आभार मानले. शाळेचे मुख्याध्यापक दाते सर व संस्थेचे विजयकुमार शिंदे सर ,प्रणाली तांबे, मॅडम ,प्रियांका पानमळकर मॅडम उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने आभार ज्ञानेश्वर सस्ते यांनी मानले .या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक  यशवंत दाते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्यासंदर्भातील महत्वाची अपडेट |

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्यासंदर्भातील महत्वाची अपडेट |



गेली अडीच महिने पुण्यात Dinanath Mangeshkar Hospital येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Atme) यांची तब्येत आता सुधारली आहे. 5 केमोथेरपी ने काम केले आहे. आज हाताचे प्लॅस्टर काढले. केमोथेरपी सुरू असतांनाच खोलीत अडखळून पडल्याने मनगट फ्रॅक्चर झाले होते. त्याला आज दीड महिना झाला म्हणून प्लॅस्टर काढले. आज दवाखान्यात डॉक्टरांनी फॉलोअप साठी बोलावले होते. समाधानकारक सुधारणा असल्याने येत्या शुक्रवारी डॉक्टरांनी नागपूरला जायची परवानगी दिली आहे. तो आनंद वेगळा आहे, अशी पोस्ट पुत्र अनिकेत यांनी फेसबुकवर लिहली आहे.


मधले काही दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्या साठी अतिशय खडतर गेले. 2 महिने सलग ताप आणि न्युमोनिया मुळे 9 किलो वजन कमी झाले आहे. असा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर सारखा भयंकर आजार कोणालाही होऊ नये अशी निसर्गाला प्रार्थना करतो.
DMH मधील डॉक्टरांचे अथक प्रयत्न, तेवढ्याच प्रेमाने नर्स आणि स्टाफ यांनी केलेली सेवा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा याच मुळे बाबा बरे होत आहेत. कुठल्याही इन्फेक्शनचा धोका होऊ नये म्हणून सध्या गर्दी टाळावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांनी डॉक्टरांच्या परवानगीने बाबा सर्वांना भेटू शकतील. आम्ही सर्व कुटुंबीय आपले खूप खूप आभारी आहोत.
पुण्यात 75 दिवस वास्तव्य असताना अनेकांनी विविध मार्गाने सहकार्य केले. लोभ असावा असाच कायम, असेही अनिकेत आमटे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 🙏🏻 Dinanath Mangeshkar Hospital Dr. Prakash Atme