शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, जुन्नर विविध गुणदर्शन कार्यक्रम जल्लोषात
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ अंतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. धनेश संचेती यांच्या शुभहस्ते नृत्य देवता नटराज मूर्तीचे पूजन व श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेश आहेर म्हणाले की संस्थेने यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयाला स्वतंत्र वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यास परवानगी दिली त्याबद्दल मी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच या वार्षिक स्नेहसंमेलनात माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला प्रत्येक विद्यार्थी हा यशाच्या नवीन क्षितिजावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करेल हे देखील प्राचार्य या नात्याने मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो.
या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती यांनी विद्यार्थी व पालकांचे संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत केले. संस्थेमध्ये एकूण नऊ विभाग कार्यरत असून या सर्व विभागांचे काम अतिशय उत्तमरीत्या चालू आहे. आज संस्थेमध्ये चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयास स्वतंत्र वार्षिक स्नेहसंमेलन घेण्याची परवानगी दिली आहे व यापुढे देखील कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन स्वतंत्र होईल असा शब्द दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर एखादा छंद देखील जोपासणे आवश्यक आहे कारण या छंदासोबत व्यक्ती आपले जीवन व्यतीत करत असतो म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आवडीचा छंद देखील जोपासावा.
या प्रसंगी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष धनेश संचेती, तसेच विद्यमान कार्यकारी मंडळ सदस्य राहुल जोशी, सुनील गुरव, आनंद सासवडे, प्राचार्य प्रा. गणेश आहेर, शिक्षक प्रतिनिधी प्रा. विद्या कर्पे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अर्चना सानप, परीक्षक तेजल गुजराथी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघमारे यांनी केले. तसेच प्रा. डॉ. राजू थोरवे यांनी आभार मानले.