Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर २५, २०२२

जुन्नरच्या आदिवासी भागात मोफत एस.एस.सी. व्याख्यानमालेचे आयोजन |




जुन्नर /आनंद कांबळे
शांताश्री शिक्षण संस्था, नेरूळ व कनक प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुका शिक्षक पालक संघ यांच्या माध्यमातून कै.श्रीधर बाळकृष्ण चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ गत २० वर्षांपासून जुन्नरच्या पश्चिमेकडील माध्यमिक विद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.


दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भवानतर या वर्षी वडज येथील श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालय,श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे, श्री छत्रपती हायस्कूल येणेरे,संत तुकाराम विद्यालय निरगुडे,अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर , जुन्नर या पाच विद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन केल्याची माहिती शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष रामभाऊ सातपुते व नियोजक मनोज दातखिळे यांनी दिली.

या दोन दिवसीय व्याख्यानमालेत इंग्रजी, गणित, भूमिती, इतिहास, मराठी,सायन्स या विषयांचे मार्गदर्शन करणार आहेत.या विद्यालयात न्यू इंग्लिश स्कूल, धामणखेल, ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव,समर्थ मधुकरराव विद्यालय चिंचोली,आदिमाया शक्ती विद्यालय इंगलून ,भाऊसाहेब बोरा विद्यालय आपटाळे,न्यू इंग्लिश स्कूल आंबोली,आदि शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी शिक्षक पालक संघाचे सचिव एफ.बी.आतार , ब्रह्मनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक याकूब शेख ,छत्रपती हायस्कूल चे मुख्याध्यापक नवनाथ चौरे,भाऊसाहेब शिंदे, न्यू इंग्लिश स्कूल आंबोली चे मुख्यध्यापक संजय वाघ, इंगळून चे मुख्याध्यापक मारुती ढोबळे ,आवटे हायस्कूल चे पर्यवेक्षक अनिल शिंदे ,श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निमसे यांनी खूप सहकार्य केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.