सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात भव्य अधिकार बाईक रॅली धडकणार नागपूर विधानभवनावर....
200 युनिट विज मोफत देण्याची मागणी, पुर्व नियोजन आढावा बैठक संपन्न..
चंद्रपूर जिल्हातील नागरिकांना घरगुती वापरातील 200 युनिट वीज मोफत द्या या मागणीसाठी 26 डिसेंबरला सोमवारी यंग चांदा ब्रिगेडची बाईक रॅली आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर येथील विधान भवनावर धडकणार आहे. सकाळी 7 वाजता गांधी चौकातुन या रॅलीला सुरवात होणार आहे. या बाबतची पुर्व नियोजन आढावा बैठक जनसंपर्क कार्यालयात पार पडली असून यात चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे..
चंद्रपूर जिल्ह्याला विज उत्पादक जिल्ह्याचा विशेष दर्जा देत येथील नागरिकांना घुरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतीसाठी विज मोफत देण्यात यावी, उद्योग वाढीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. सदर मागणीच्या पुर्ततेसाठी त्यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावा सुरु आहे. विधानसभा निवडणुकी नंतर झालेल्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी हा विषय सभागृहात मांडला होता. त्यानंतर संबंधित मंत्र्यासोबतही त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.
याच मागणीसाठी आता आ. जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूर विधानभवनावर भव्य अधिकारी बाईक रॅली काढण्यात येत आहे. सोमवारी सकाळी सात वाजता गांधी चौकातुन सदर रॅलीला सुरवात होणार आहे. या रॅलीत चंद्रपूर सह जिल्ह्याभरातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. सदर रॅली नागपूर येथील विधान भवनावर पोहचल्या नंतर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असुन आपल्या मागणीचे निवेदन सादर करणार आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुर्व नियोजन आढावा बैठक सपंन्न झाली असुन या बैठकीत सदर रॅलीबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
The issue of 200 units of free electricity came again...