जुन्नर /आनंद कांबळे
पुणे -प्राथमिक शिक्षणातील शाळाबाह्य मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे त्यामुळे शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी शिक्षकांनी कायम अपडेट राहिले पाहिजे असा सल्ला माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील यानी शिक्षकांना दिला.
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या पुणे येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या नटसम्राट विजय तेंडुलकर सभागृहात आयोजित शिक्षण परिषद व आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे होते .
नगरसेवक व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विकास नाना दांगट -पाटील व नगरसेवक आबा बागुल , शिक्षणतज्ञ अनिल गुंजाळ आदि मान्यवर उपस्थित होते .
माजी मंत्री आमदार पाटील म्हणाले की, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 50% पेक्षाही कमी विद्यार्थी महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेण्यास पोहचतात ,हे प्रमाण प्रमाण वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासूनच शंभर टक्के पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत.
माजी मंत्री पाटील पुढे म्हणाले की आई-वडिलाप्रमाणेच अतिशय प्रिय असा गुरु असतो त्यांचे संस्कार देशाचे भावी नागरिक घडवण्यासाठी उपयोगी पडत असतात .सर्व शिक्षक हे समर्पित वृत्तीने काम करीत असतात अशा तील निवडक शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे त्यांचे मी अभिनंदन करतो व या संघटनेने ही शिक्षण परिषद भरवून शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले . त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो
.
अध्यक्षपदावरून बोलताना भरत रसाळे म्हणाले, शासनाने शिक्षकांच्या- विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शिक्षणा प्रतीची अनास्था कमी करावी. शिक्षकांच्या मागण्या शासनाने मान्य करून शिक्षकांना न्याय द्यावा.
या परिषदेमध्ये वीस पटाखालील शाळा बंद करू नयेत, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक भरती त्वरित करावी , प्रचलित दराने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वेतन द्यावे . अभ्यासक्रम किंवा शैक्षणिक धोरण ठरवताना संघटनांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, संस्थांचे घरफळा पाणी व वीज बिल घरगुती दराने आकारावे, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सरसकट वरिष्ठ व निवड श्रेणी द्यावी, शिक्षकांना कॅशलेस मेडिकल योजना मंजूर करावी, शिक्षकां अशैक्षणिक कामे लावू नयेत खाजगी शाळातील शिक्षकांचा, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी विचार करण्यात यावा.
नपा / मनपा शाळांतील खाजगी शिक्षकांना १०० टक्के मेडिकल बील राज्य शासनाने द्यावे, संयमान्यतेसाठी आधार कार्ड सक्ती रद्द करावी, अशैक्षणिक कामे देऊ नयेत, शिक्षकांना कॅशलेसमेडिकल योजना लागू करावी,अशा प्रकारचे 30 ठराव या परिषदेमध्ये संमत करण्यात आले .या परिषदेमध्ये शिक्षण तज्ञ अनिल गुंजाळ, जयवंत हक्के, अदिती केळकर ,सारंग पाटील .बादशहा जमादार, महादेव डावरे ,अर्जुन रसाळ ,छोटू मासाळ, प्रियांका बोरसे, कैलास शिंदे ,संगीता चौधरी यांनी विचार मांडले. प्रास्ताविक सारंग पाटील यांनी तर स्वागत संतोष शिळमकर यांनी केले .आभार शिवाजीराव माने यांनी मांडले. सूत्रसंचालन ननवरे यांनी केले.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी पुण्याचे पदाधिकारी जी.डी. मोराळे,धीरज गायकवाड,अर्चना मोरे, शिवाजीराव मा,ने विश्वास कोचळे, निलेश डोंग,रे श्रीकांत राहणे ,विजय राठोड, संतोष तनपुरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी अतिशय परिश्रम घेतले .
या परिषदेसाठी महासचिव अंजन पाटील (धुळे ) राज्य मुख्याध्यापक अध्यक्ष जयवंत हक्के ( सोलापूर )राज्य संघटक *बादशहा जमादार ( जयसिंगपूर ) मराठवाडा विभागप्रमुख संतोष पाटील डोणगावकर (औरंगाबाद ) राज्यसचिव शिवाजी भोसले पतसंस्थेचे चेअरमन महादेव डावरे (कोल्हापूर ) महिला आघाडी प्रमुख अतिथी केळकर,* *नंदिनी पाटील राज्य शिक्षकेतर प्रमुख महेश पवार ( नाशिक )विद्युतता बोकील (अहमदनगर ) शशिकांत माळी* *अशोक शिंदे (सांगली )कोकण विभाग प्रमुख महेंद्र कापडी (रत्नागिरी ) यांच्यासह सुमारे हजारभर शिक्षक उपस्थित होते*
......