Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर ०८, २०२२

गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद




जुन्नर : आनंद कांबळे

जुन्नरच्या शहरातील भरवस्तीत गेल्या महिन्यात जमावाने गोरक्षकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जुन्नर शहरात गुरुवार (दि.०८) रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच वैद्यकीय सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगळता छोटे-मोठे व्यापारी, दैनंदिन भाजी विक्रेते यांनी आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवत आपला पाठींबा दर्शविला.
 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर येथे शहर व परिसरातील गोरक्षक, शिवभक्त मोठ्या संख्येने सामील होत सुरुवात झालेल्या निषेध मोर्चाची तहसील कार्यालयाच्या आवारात सांगता करण्यात आली.
     याप्रसंगी अखिल भारत कृषी गो सेवा संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद एकबोटे,मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, भाजपा नेत्या आशा बुचके,सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व दुर्ग संवर्धक शैलेश गोजमगुंडे, मधुकर काजळे, सुनिल काळे, शिवराज संगनाळे, मयुर दिवेकर आदी उपस्थित होते.
     दरम्यान, मोर्चात मनोगत व्यक्त करताना मिलिंद एकबोटे यांनी गोहत्या करून शिवजन्मभूमी जर कोणी अपवित्र करणार असेल त्याचप्रमाणे हिंदू स्त्रियांची जर छेडछाड केली गेली तर कठोरातील कठोर भूमिका घेऊन योग्य तो धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. तसेच हल्ल्यातील आरोपींविरुध्द प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावीत व अटक करावी अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असेही ते म्हणाले.
      जुन्नर शहरात संपूर्ण गोवंश बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी, लव्ह जिहाद निर्बंध कायदा लागू करावा,धर्मांतर बंदी,शेतकऱ्यांच्या गाई,बैल चोरी करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई, संवेदनशील शहर म्हणून अधिकची पोलीस चौकी उभारावी तसेच जुन्नर शहरातील सर्व सामान्य नागरिकांना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सहकार्याचा अभाव अशा मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, तहसिलदार यांना दिले.Strict shutdown in protest against attack on cow guards

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.