Cyclone News
• बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्यापर्यंत पोहोचण्याची आणि पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. या प्रदेशांमध्ये वादळी वार्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
rain cyclone tamilnadu climate change IMD
• प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर येथून प्राप्त झालेल्या सध्यस्थितीतील (०८ डिसेंबर) हवामान अंदाजानुसार या वादळी प्रणालीच्या प्रभावाखाली दिनांक १० ते १२ डिसेंबर दरम्यान विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती आणि वाशीम जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणारं चक्रीवादळ सध्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व-पश्चिम साधारण 15 डिग्री अक्षवृत्त दरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळं त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता जाणवणार नाही. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. चक्रीवादळ वाऱ्याच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या स्थितीमुळं त्याच्या अतिबाहेरील परिघ-घेरातून महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या आर्द्रतेच्या वक्रकार पट्ट्यातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. वातावरणासहित उरध्व दिशेनं संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी अवकाळी बे-मोसमी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
rain cyclone tamilnadu climate change IMD