जागतिक महिला दिनानिमित्ताने जुन्नर मधील राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. International WomenDay
यामध्ये तेजस्विनी पुरस्कार वितरण ,विविध गुणदर्शन,फँन्सी ड्रेस स्पर्धा ,नृत्य स्पर्धा ,मराठी लावण्याचा कार्यक्रम यांचा समावेश होता.
मिसेस जुन्नर सौंदर्य स्पर्धेत पहिला क्रमांक सरिता खोत , पूजा फुलपगार , रत्ना खोत यांना जाहिर करण्यात आला.
सोलो डान्स स्पर्धेमध्ये किमया जोशी , सेजल दुबे , सानिका बोऱ्हाडे तर सोलो डान्स वयोगट 31 ते 80 यामध्ये श्वेता पवार , अर्चना धोत्रे , अलका वाकचौरे , ग्रुप डान्स स्पर्धेत किमया व हिमानी तितर तर ग्रुप डान्स वयोगट 31 ते 80 यामध्ये दाभाडे ग्रुप , श्वेता व स्वाती ग्रुप , शिवाई भजनी मंडळ या सर्वांना पहिले तीन क्रमांक जाहीर करण्यात आले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी 11 पैठण्यांचा लकी ड्रा काढण्यात आला.
या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सीमा शरद सोनवणे , राजश्री वल्लभ बेनके , सुमित्रा सोपान शेरकर , पूजा बुट्टे पाटील , राजश्री बोरकर , अभिनेत्री ऋतुजा जुन्नरकर आदींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाच्या अध्यक्षा अलकाताई फुलपगार , ज्योती चोरडिया , राखी शहा , वैशाली भालेकर , राजश्री कांबळे , श्वेता पवार ,स्वाती पवार,सुरेखा जढर,नेना राजगुरव,सुजाता लुंकड, सरिता डोके ,मंगल शिंदे ,गीतांजली डोके ,रत्ना घोडेकर ,संगीता बेळे,अनुराधा गरीबे, केतकी देठे,पूनम नरोटे , गीता खोत,रत्नमाला खोत भूमिषा खत्री आदींनी विशेष परिश्रम घेतले.