Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च १५, २०२३

1 एप्रिलपासून शहरातील बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल Bank 1

1एप्रिलपासून शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कामकाजाच्या वेळेत बदल



चंद्रपूर, दि. 14: चंद्रपूर शहरात बँक ऑफ इंडियाच्या दोन शाखा कार्यरत आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया जटपुरा गेट शाखा (जिल्हा परिषद जवळ), आणि मुख्य शाखा (लक्ष्मीनारायण मंदिराजवळ) आहेत. सदर बँक शाखा 11 ते 6 या वेळेत कार्यरत असतात. परंतु, नव्या वेळापत्रकानुसार दोन्ही बँक शाखेचे कामकाज दि. 1 एप्रिल 2023 पासून सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. यामध्ये 10 ते 4 वाजताच्या कालावधीत नागरीकांना बँकेचे आर्थिक व्यवहार करता येईल. तर बँकेचे अंतर्गत कामकाज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.

बँक शाखेच्या उक्त कार्य अवधीत बदल करण्याकरीता सक्षम अधिकाऱ्यांकडून (जिल्हाधिकारी) जिल्हास्तरीय सल्लागार समितीमध्ये प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तरी, दोन्ही शाखेच्या ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व बँकेला सहकार्य करावे, असे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांनी कळविले आहे.

 State Bank of India SBI Bank 🏧 IFSC code 
००००००

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.