Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १४, २०२३

शेतकऱ्यांनो सावध व्हा! पूर्व विदर्भातील जिल्ह्यात या दिवशी येणार गारपीठ | Rain, Paus, hawaman, garpith

पूर्व विदर्भातील जिल्ह्यात या दिवशी येणार गारपीठ 

शेतकऱ्यांनो सावध व्हा! पूर्व विदर्भातील जिल्ह्यात या दिवशी येणार गारपीठ Rain, Paus, hawaman, garpith

भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार विदर्भात पाऊस (Rain, Paus)येण्याची शक्यता असून गारपीठ होईल.16 मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे.  

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात म्हणजेच 15 ते 19 मार्च दरम्यान आकाश अंशिक ढगाळ (hawaman) राहून 16 मार्च रोजी एक दोन ठिकाणी तर 17 मार्च रोजी विरळ ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे 18 आणि 19 मार्च रोजी बहुधा सर्वच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिनांक 16 मार्च रोजी तुरळक आणि दोन ठिकाणी विजांच्या गर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे.  17 आणि 18 मार्च रोजी गारपीठ होण्याची शक्यता आहे. (Avakari Pouse, Garpit )

भंडारा जिल्ह्यात आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 17 ते 19 मार्ग दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. शिवाय विदर्भामध्ये 19 ते 25 मार्चदरम्यान हवामान स्थिती सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

गोंदिया जिल्ह्यात 16 ते 17 मार्च रोजी एक-दोन ठिकाणी विजांच्या गडगडाट होऊन सर्व तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल. 18 ते 19 मार्च रोजी एक दोन ठिकाणी वादळ वारा आणि पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, 17 मार्च रोजी विरळ ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस ,तर 18 आणि 19 मार्च रोजी सर्व ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. 17 ते 18 मार्ग दरम्यान गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांनो पिकाची काळजी घ्या

महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता दाखवलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची काळजी घ्यावी शेतातील माले झाकून ठेवावे, पिके तोंडावर आलेली असून त्या पिकांची काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके काढून घ्यावी. त्याचप्रमाणे पिके झाकून ठेवावी.


Rain/thundershowers very likley to occur at isolated places over parts of Maharashtra during next 3-4 days.

येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/ भेट द्यI


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.