Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १४, २०२३

शासकीय कार्यालयीन यंत्रणात ठप्प; संपूर्ण कर्मचारी बेमुदत संपावर

जुन्या पेन्शनच्या मागणी करीता संपूर्ण कर्मचारी बेमुदत संपावर

WhatsApp share | Share on WhatsApp

सर्व शासकीय कार्यालयातील व शाळेतील शिक्षक, कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणी करीता बेमुदत संपावर गेले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील यंत्रणा ठप्प पडली आहे.

कारंजा तालुक्यातील शासकीय कार्यालयीन यंत्रणात ठप्प

उमेश तिवारी/कारंजा (घा) 
कारंजा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील व शाळेतील शिक्षक, कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणी करीता बेमुदत संपावर गेले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील यंत्रणा ठप्प पडली आहे.

दिनांक ०१ नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील राज्यातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे.
पाच वर्ष आमदार, खासदार राहीलेल्या लोकप्रतिनिधींना मात्र  जुनी पेन्शन आहे, न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांना जुनी पेन्शन आहे, परंतु आयुष्याची 33 वर्ष त्याच व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र जुनी पेन्शन नाही.  ही विसंगती का ? असा प्रश्न आता सर्वत्र चर्चेचा बनला आहे. कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करून. ही नवीन  पेन्शन योजना सरकारने शेअर मार्केटच्या हवाली केली आहे. त्यामुळे या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही.
         पश्चिम बंगाल, राजस्थान ,छत्तीसगड ,झारखंड, पंजाब आणि आता हिमाचल प्रदेश  सरकार जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असताना पुरोगामी आणि विकसित समजल्या जाणाऱ्या  महाराष्ट्रातील राज्य सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. व कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारात लोटली आहे. ज्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र शासनावरील विश्वास उडत जाऊन शासनाविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे .  
        यापूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेकदा जुन्या पेन्शनच्या मागणी करता धरणे, मोर्चा ,आंदोलने केलेली आहे परंतु राज्य सरकारची सदर मागणी संबंधी निष्क्रियता लक्षात घेता. आता मात्र कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
            कारंजा घाडगे येथे सुद्धा तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या आस्थापनातील  प्रमुखांना संपाची नोटीस देऊन 14 मार्च रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती परिसरात एकत्र येऊन  तहसील कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढला व तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्यामार्फत शासनाला बेमुदत संपाच्या सहभागाचे निवेदन सादर केले. आणि तहसील कार्यालय परिसरात सर्व कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे.


जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

कामठी | समाजकार्य महाविद्यालय, कामठी येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. पेन्शनसाठी उभारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी न होऊ शकलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाज केले. "पेन्शन आमच्या हक्काची; नाही कुणाच्या बापाची","एकच मिशन जुनी पेन्शन" असे नारे देत कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनची मागणी लावून धरत  सरकार विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला.

जुन्नर तालुक्यातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर 


जुन्नर /आनंद कांबळे 
जुन्नर तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांनी जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 
        यावेळी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात सभा संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, परिचारक, महसूल, वन विभाग, पशुसंवर्धन, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद लिपिक संवर्ग या सर्व विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. 

     यावेळी खंडेराव ढोबळे, संतोष ढोबळे, सुभाष मोहरे, बाळासाहेब लांघी, संदीप दातीर, मिननाथ पानसरे, तबाजी वागदरे, रमाकांत कवडे, मोहन नाडेकर, कमल शिरोळे, सविता गाडेकर, सुरेश लांडे , खंडू सरजीने यांसह विविध संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

        यावेळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या वतीने वैभव सदाकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.