*जुन्नरी कट्टाचा १०० वा शतक महोत्सवी कट्टा संपन्न*
*जेष्ठ इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी मांडला शिवरायांचा इतिहास.
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर व परिसरातील ऐतिहासिक माहिती होणेकरिता बघा जुन्नर..जगा जुन्नर या संकल्पनेवर आधारित कार्यरत असलेली व १६ जानेवारी २०२१ रोजी सुरू झालेली जुन्नरी कट्टा या संस्थेच्या प्रवासाचा १०० वा शतक महोत्सवी कट्टा समारंभ शनिवार (दि. १० डिसेंबर) रोजी महालक्ष्मी लॉन्स, जुन्नर येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास शिवरायांचे दुर्गकारण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी जेष्ठ इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर हे प्रमुख व्याख्याते लाभले होते.वनविभागाच्या माध्यमातून पात्र गाईड यांना त्यांनी इतिहासाचे मार्गदर्शन केले. यावेळी जुन्नरी कट्टाच्या लघुपुस्तिकेचे प्रकाशन प्र. के. घाणेकर यांचे हस्ते झाले. स्वराज्यातील गडकोट, किल्ले आदींची स्थापत्य, बांधकाम शैली त्याचे असणारे महत्व त्याचप्रमाणे शिवरायांनी दिलेली प्रेरणा यावर त्यांनी विस्तृतपणे असलेला इतिहास सर्वांसमोर मांडला.
या कार्यक्रमास जुन्नरी कट्टा, शिवाजी ट्रेल,स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था पदाधिकारी यामध्ये मिलिंद क्षिरसागर, मुकुंद उत्पात,विनायक खोत, विजय कोल्हे,राजेंद्र जुंदरे,किरण कबाडी, मारुती जाधव, प्रशांत केदारी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे व इतिहासप्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा केदारी यांनी केले व विनायक खोत यांनी आभार मानले.