Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २२, २०२३

भारताच्या नकाशात श्रीलंका का दिसतो? त्या कच्छतीवूशी नेमकं काय संबंध! Sri Lanka India map




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे भाषण तुम्ही पाहिलं असेलच. १० ऑगस्टला विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर मोदींनी उत्तर दिले. पंतप्रधानांच्या सुमारे सव्वा दोन तासांच्या भाषणामधील ही १५ सेकंदाची क्लिप. यात मोदी वारंवार एक नाव घेत आहेत. ऐका. (रिव्हर्स इफेक्ट देऊन पुन्हा व्हिडिओ क्लिप लावावी.) मोदी म्हणताहेत कच्छतीवू क्या है? पण खरंच हे कच्छतीवू काय आहे आणि त्याचा काँग्रेसशी काय संबंध आहे. सोबतच भारताच्या नकाशात नेहमीच श्रीलंकेचा नकाशा का बरं असतो आणि त्याचा या कच्छतीवू शी काही संबंध आहे का?

#MappingMysteries
#SriLankaOnIndianMaps
#CartographicCuriosities
#MapMagic
#UnveilingBorders
#GeoTrivia
#MappingIndia
#SriLankaReveal
#MapMyths
#GeoDiscoveries

अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय, तो का जातो , आतापर्यंत असे किती प्रस्ताव संसदेत मांडण्यात आले आणि किती सरकार पडली. या विषयावर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आम्ही यापूर्वीच पोस्ट केला आहे. तर आता आपण याच प्रस्तावावर उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या कच्छतीवू विषयी जाणून घेऊया.   (भारताच्या नकाशात श्रीलंका का दिसतो? 'त्या' कच्छतीवूशी नेमकं काय संबंध! Why does Sri Lanka appear in India's map? What exactly is the relationship with 'that' Kachthivu!)

कच्छतीवू हे एक बेट आहे. जे श्रीलंका आणि तामिळनाडूतील रामेश्वरमच्या भूभागात आहे. या बेटावर पिण्याच्या पाण्याचे कुठलेही स्तोत्र नाही. श्रीलंकेचा उत्तर किनारा आणि भारताच्या आग्नेय किनार्‍यादरम्यान पाल्कची सामुद्रधुनी आहे.  १७५५ ते १७६३ पर्यंत मद्रास प्रांताचे गव्हर्नर असलेले रॉबर्ट पाल्क यांच्या नावावरून या सामुद्रधुनीला नाव देण्यात आलंय.पाल्क सामुद्रधुनीला समुद्र म्हणता येणार नाही. प्रवाळ खडक आणि वालुकामय खडकांमुळे या भागातून मोठी जहाजे जाऊ शकत नाहीत. या पाल्कच्या सामुद्रधुनीत कच्छतीवू बेट आहे. हे भारतातील रामेश्वरमपासून १२ मैल आणि श्रीलंकेतील जाफनामधील नेदुंडीपासून १०.५ मैलांवर आहे. 

#MappingMysteries
#SriLankaOnIndianMaps
#CartographicCuriosities
#MapMagic
#UnveilingBorders
#GeoTrivia
#MappingIndia
#SriLankaReveal
#MapMyths
#GeoDiscoveries

१९७४ साली भारत आणि श्रीलंका यांच्यात एक सागरी करार झाला. या करारामध्ये भारताने कच्छतीवू हे बेट श्रीलंकेला भेट दिलं. या संपूर्ण करारावर स्वाक्षरी केली ती त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. आणि त्यामुळेच मोदी यांनी परवा सभागृहात कच्छतीवू वरून काँग्रेसला  धारेवर धरलं. श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती सिरिमावो भंडारनायके यांच्यासोबत झालेल्या या कराराला तामिळनाडू सरकारने विरोध केला आणि कच्छतीवू भारतात परत आणण्याची मागणी केली. यासाठी [पुढे १९९१ मध्ये तामिळनाडू विधानसभेत ठराव देखील मंजूर करण्यात आला. आणि पुन्हा कच्छतीवूचा भारतात समावेश करण्याची मागणी करण्यात आली.

२००८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी कच्छतीवू प्रकरणात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात खेचलं होतं. त्यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे कच्छतीवूचा करार रद्द करण्याची मागणी केली.जयललिता यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे श्रीलंका आणि भारत यांच्यातील दोन करारांना असंवैधानिक घोषित करावं अशी मागणी केली होती. 

हे सर्व भांडण ज्या बेटासाठी आहे त्यात असं काय आहे, असं प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर कच्छतीवू हे एक छोटं बेट आहे. त्यांचं क्षेत्रफळ सुमारे २८५ एकर आणि रुंदी ३०० मीटर इतकी आहे. या निर्जन बेटावर एकमेव वस्तू आहे सेंट अँटोनी चर्च. येथे दरवर्षी तीन दिवसांचा चर्च महोत्सव असतो. ज्यात भारत आणि श्रीलंका दोन्ही देशातील लोकं उत्साहाने सहभागी होतात. भारतीय लोकांना कच्छतीवू ला जाण्यासाठी पासपोर्ट किंवा श्रीलंकेच्या व्हिसा ची देखील गरज नाही, भारत श्रीलंका कराराच्या वेळीच तशी अट घालण्यात आली होती. 

दुसरा विषय भारताच्या नकाशावर श्रीलंका का दाखवलं जाते. तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं अप्रुप. शेजारी देश म्हणून भारताच्या नकाशात श्रीलंका असतो. पण तुम्ही जर असा विचार करत असणार तर तुम्ही चुकताय. कारण तसं असतं तर पाकिस्तान आणि चीन हे देखील तर भारताचे शेजारी देश आहेत.पण ते भारताच्या नकाशात दाखविले जात नाही. याचे कारण आहे संयुक्त राष्ट्राचा महासागर कायदा. १९५६ साली संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात हा कायदा पारित झाला. या कायद्यानुसार, जर एखाद्या देशाची सीमा समुद्राला लागून असेल, तर सीमेपासून 200 नॉटिकल मैल म्हणजेच 370 किलोमीटरचे क्षेत्र त्या देशाचे सागरी क्षेत्र मानले जाते. आता श्रीलंका आणि भारत यांच्यातील अंतर फक्त 18 नॉटिकल मैल म्हणजे ५४ किलोमीटर एवढेच आहे. त्यामुळे भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवण्यात आलं आहे.

#MappingMysteries
#SriLankaOnIndianMaps
#CartographicCuriosities
#MapMagic
#UnveilingBorders
#GeoTrivia
#MappingIndia
#SriLankaReveal
#MapMyths
#GeoDiscoveries

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.