स्वामी विवेकानंद यांचे विचार आयुष्याला दिशा देणारे - विशाल निंबाळकर
जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर महानगर
भाजप युवा मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन
चंद्रपूर : आयुष्यात जोखीम घ्या जिंकलात तर नेतृत्व कराल हरलात तर मार्गदर्शन कराल असा विचार स्वामी विवेकानंद यांनी समाजाला दिला. त्यांचे हे विचार आयुष्याला नवी दिशा देणारे असून ते
आत्मसात करुन जिवन जगण्याचा प्रयत्न केल्यास समाजिक, राजकीय व इतरही क्षेत्रात नक्कीच यश संपादन करता येवू शकत असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांच्या जयंती निमीत्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने विविध ठिकाणी राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे महामंत्री प्रज्वलंत कडू, सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, तुकुम प्रभागाच्या नगर सेवक सोपान वायकर, नगर सेविका शितल गुरनूले, वनिता डूकरे, भाजप महामंत्री रवी गुरनुले, तुकुम महानगर उत्तर मंडळ अध्यक्ष विठ्ठलराव डुकरे, महामंत्री प्रमोद शास्त्रकार, भाजप जिल्हा सचिव चंदन पाल, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल पाल भाजपा युवा मोर्चा सचिव सतिश तायडे संजय पटले आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना विशाल निंबाळकर म्हणाले कि, भारत हा महापूषांचा देश आहे. त्यामूळे या देशात दिशा देणा-या विचारांचा भंडार आहे. हे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. तसेच या विचांराची आदान प्रदान करण्याच्या दिशेनेही आपले प्रयत्न असले पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने असे आयोजन नित्येनियमाने घेत समाज प्रबोधनाचे काम केल्या गेले पाहिजे असे यावेळी ते म्हणाले, माजी पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पक्षाचा विस्तार होत आहे. हा विस्तार होत असतांना यात भाजपा युवामोर्चाचेही मोठे योगदान असले पाहिजे. भाजपचे विचार व धोरण हे नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी काम करत शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा पर्यंत करावा. असे आव्हानही यावेळी बोलतांना भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले,
यावेळी सर्वप्रथम राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर कोरोना पासून बचाव करण्यासाठी एन.19 मास्कचे वाटप करण्यात आले या प्रसंगी युवा मोर्चाचे राहुल कनकुलवार, स्वप्निल कारेकर, प्रशांत खोबरागडे, जयंत शर्मा, तुषार कराडे, चंदन पुणेकर, आकाश पांडव, देवेंद्र बेले, शुभम दलाल, शुभम कायल, आकाश मारेकर, सोहम गेडाम, मनीष सुरतीकर, निखिल कराडे, सोहेल शेख, सचिन ठावरी यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
SHARE THIS