संक्रातीत महानिर्मिती कोराडी ची वेतनविषयक उदासीनता शैक्षणिक पाल्ल्यांना भोवणार
नागपूर :कोरोनामुळे शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद असल्याने महानिर्मिती कोराडी औष्णिक विद्युत स्कूल बसचे चाकही रूतले आहे. स्कूल बस वर उदरनिर्वाह करणाऱ्या चालक, क्लीनर मदतनीस व महिला सहायक आदींच्या हाताचे काम गेले आहे. स्कूल बस जागेवरच उभ्या असल्यामुळे बस चालक व मदतनीस यांच्या परिवाराचे कंबरडे मोडले असून परिवार कसा चाललायचा असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे.
महानिर्मिती ने सकारात्मक निर्णय घेऊन स्कूलबस चालकांना दिलासा द्यावा, अशी विनवणी रा.काँ. च्या भुषण चंद्रशेखर यांना केली आहे.
महानिर्मिती कोराडी येथे मागील १५ वर्षे पेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत स्कूलबस वाहन चालक संतोष शाहू यांची मुलगी कुमारी विशाखा संतोष शाहू हिने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्थापत्य विभागातून ८२.९५ टक्केवारी घेऊन शासकीय नोकरी ची स्वप्न मनात साकारलेली आहेत. या उच्च शिक्षित मुलीचा G.H.Raisoni Academy of Engineering & Technology, Nagpur या नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेश निश्चित झाला असतांना लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कोराडी च्या कंत्राटी स्कूलबस कामगारांने आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या शाळेची फी कशी भरायची याची चिंता लागली.
एप्रिल २०१९ पासून स्कूलबस कामगारांना वेतन देण्यात आले नाही. कोरोना संकट काळात एकमेव फक्त उपासमारीची समस्या स्कूलबस कामगारांवर आलेली आहे. या बाबत महानिर्मिती मुख्य अभियंता कार्यालय मूक भूमिका घेऊन उभी आहे. महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. त्या महाविद्यालयाची असलेली भरमसाठ फी कशी भरायची याची चिंता स्कूलबस वाहन चालक संतोष शाहू यांना लागली आहे. मुलीचं शैक्षणिक शुल्क कसं भरायचे याची चिंता बळकावत आहे.
आपल्या मुलांचा प्रवेश रद्द झाला तर कुठे प्रवेश घ्यायचा या चिंतेत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. आता जर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. आर्थिक अडचणी सांगणाऱ्या महानिर्मिती कोराडी ने पर्याय शोधावा. मुलीवर शैक्षणिक संकट असल्याचं दिसून येतंय. महानिर्मिती कोराडी येथील कर्मचाऱ्यांच्या मुलांचा व्यवस्थितरित्या सांभाळ करून त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी शिक्षणाकरिता पोहचवून देणे व पूर्ण सुरक्षित वातावरणात घरी सोडवून देने ही जबाबदारी वर्षानुवर्षे पासून पार पडली पण आज माझ्या मुलीचे शैक्षणिक जीवन आर्थिक पाठबळ अभावी पूर्ण न झाल्यास मोठं अपयश माझ्या पदरी पडणार आहे. या गंभीर समस्येवर उपाय योजना करावी, अशी भावनिक प्रतिक्रिया संतोष शाहू यांनी दिली.
कोराडी महानिर्मितीने स्कूलबस चालक व मदतनीस यांचा वेतनविषयक प्रश्न तात्काळ सोडवावा, असे रा.काँ.उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांना निवेदनाद्वारे महानिर्मिती कोराडीच्या पीडीत स्कूलबस कामगारांनी कळविले. याप्रसंगी संतोष शाहू, मनोज गाऊत्रे, रामेश्वर कोसरे, बजरंग हिवराळे,सनम बोरकर, शिवशंकर शाहू,रुपेश भैसरे, निलेश ठाकरे, राकेश मारबते, रिता भांबरकर, सविता जनबंधु, चित्ररेखा शाहू उपस्थितीत होते.

