Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २७, २०१२

शिकूही नये आणि विकूही नये....

काही दिवसांपूर्वी स्थानिक खुटाळा या गावी संतप्त विद्याथ्र्यांनी एस. टी. महामंडळाच्या स्कूल बसच्या काचा foडल्या. महामंडळाच्या अधिकाèयांनी पोलिसांत तक्रार करून गुन्हे दाखल करण्याची तयारी केली. काही वरिष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने मध्यस्थी झाली. प्रत्येक विद्याथ्र्याकडून ३०० रुपये घेऊन महामंडळाला पाच हजार रुपये देण्यात आल्यानंतर प्रकरण मिटले. दररोज ये-जा करणाèया विद्याथ्र्यांसाठी बस थांबत नाही, हे आमचे रडगाणे आहे. अनेक वर्षांपासून या समस्येवर शासन तोडगा काढत नाही, हे वास्तव आहे.
मसकाळङ्कने शहर बससेवेचा ठेवलेला प्रस्ताव अभिनंदनीय आहे. घुग्घुस, वणी, नकोडा, मुकुटबन या बसगाड्यांमध्ये यशवंतनगर, पडोली, खुटाळा, एमआयडीसी, qचचाळा येथील प्रवाशांचा सर्वाधिक भरणा असतो. इयत्ता पाचवीपासून ते अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे शेकडो विद्यार्थी तासन्तास बसची वाट पाहतात. सकाळी लवकर तयारी केली, तरी बस १२ ते एक वाजेपर्यंत मिळत नाही. घुग्घुसकडून येणारी बस थांबतच नाही. विद्यार्थी आणि नागरिकांनी काय करावे. याच प्रकाराला चिडून संतप्त विद्याथ्र्यांनी बसच्या काचा ङ्कोडल्या होत्या. यात विद्याथ्र्यांचा दोष काय? या भागात राहणाèया गरीबवर्गाला बसशिवाय दुसरा पर्याय नाही. सध्या सुरू असलेल्या घुग्घुस बसमध्ये पाय ठेवायला जागा राहात नाही. रात्री उशिरापर्यंत मुली, महिला चंद्रपूरच्या बसस्थानकावरती रेंगाळत राहतात. त्यांच्या सुरक्षेचे काय? बस थांबत नाही म्हणून या भागातील विद्यार्थी चंद्रपूरला खोली करून राहतात. ज्या विद्याथ्र्यांचे २०० रुपयांच्या पासमध्ये येणे- जाणे होते. त्या गरीब विद्याथ्र्यांना नाहक दीड ते दोन हजार रुपयांचा महिन्याचा खर्च सोसावा लागतो. ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांनी शिकायचे नाही काय?
घुग्घुस बसचा कंडक्टर ग्रामीण भागातील लोकांकडून तिकिटाचे पैसे घेतो. पण, तिकीट देत नाही. दररोज किती कंडक्टरसोबत भांडायचे. घुग्घुस बसमध्ये खूप गर्दी राहात असल्याने जवळच्या गावातील लोकांचे गाव येईपर्यंत तिकीट दिले जात नाही. अनेकदा प्रवासी उतरायच्या वेळेस कंडक्टर पैसे घेतो; पण तिकीट देत नाही.
ग्रामीण भागातील शेतातील भाज्या, शेंगा, दही विकणाèया महिलांना बघितले की, बसच थांबत नाही. या महिलांनी उदरनिर्वाह कसा करायचा? इतकी साधी, सरळ समस्या दूर करण्यास आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीला वेळ मिळाला नाही. एसटी महामंडळाला विद्यार्थी व नागरिकांनी शेकडो पत्रे लिहिली. मात्र, बस काही थांबत नाही. यावरचा एकमेव उपाय म्हणजे चंद्रपूर शहर बससेवा सुरू करणे, हा होय. यशवंतनगर, पडोली, खुटाळा, एमआयडीसी, लहूजीनगर, qचचाळा, दाताळा, कोसारा, मोरवा, या गावांपर्यंत शहर बससेवा सुरू झाल्यास निश्चितच महसूल वाढेल.

श्रीकांत घनश्याम साव
(विद्यार्थी, जनता शिक्षण महाविद्यालय)
भ्र. क्र. ९९२२७७५६९०


Shrikant Ghanshyam Sav
(Student, College of Public Education)
Bhr. No. 9922775690

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.