राज्यात पावसाचा ५१ वर्षांतील सर्वात मोठा ब्रेक,
आता पुन्हा कधीपासून बरसणार
सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे.
सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे.
खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे.
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का?
#दुष्काळ_जाहीर_करावा
#IMD #Rain #Vidarbha #Weatherforecast
Monsoon Update 2023: यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली मात्र त्याचे रौद्र रूप पाहायला मिळाले. मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जूनमध्ये जरा उशीराच सुरू झालेल्या पावसाने जुलैमध्ये आपले तूफान रूप दाखवले. मात्र, मागील 2-3 दिवस पावसाने जरा उसंत घेतली आहे. राज्यात एकीकडे पावसाचा जोर कमी झाला आहे तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसला. ऑगस्ट महिन्यात बऱ्याच भागातून पावसाने उसंत घेतली. राज्यात आता काही ठिकाणी हलक्या सरी कोसळताहेत, पण जोरदार पावसाची अजूनही प्रतिक्षाच आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यामध्ये १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये विश्रांती घेत असलेला पाऊस पुन्हा पडायला सुरुवात होईल.
२५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पुन्हा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये कोकण आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात सरासरी इतका किंवा त्याहीपेक्षा कमी पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचे प्रमाण १३ ते १७ ऑगस्टदरम्यान अत्यल्प पाऊस राहील.
थांबलेला पाऊस कधी सुरू होणार? हवामान विभागाचा अंदाजानुसार या तारखेपासून पडणार पाऊस
यावर्षी मान्सूनची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर सुरुवातच निराशाजनक झालेली होती. जून महिना संपूर्ण कोरडा गेला होता व त्यानंतर जुलै महिन्याची सुरुवात चांगल्या पावसाने झाली व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग येऊन पेरण्या देखील पूर्ण झालेल्या आहेत.
परंतु सध्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी पिके कोमेजू लागली असून शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की आता पाऊस कधी सुरू होईल? परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
18 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता
त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की, थांबलेला पाऊस हा 18 ऑगस्ट नंतर सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभाग विभागाचे अधिकारी के एस होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 18 ऑगस्ट पासून पावसाची शक्यता असून 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे या कालावधीत विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोकणात पाऊस पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरी पाऊस होईल असं देखील हवामान विभागाने अंदाज व्यक्त केले आहे.
विदर्भात कशी राहील पावसाची स्थिती?
यावर्षी ८ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 11 जूनला रत्नागिरीत मान्सून पोहोचला. परंतु त्यानंतरच्या कालावधीत बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास रखडला होता. परंतु त्यानंतरच्या कालावधीत चंद्रपूरमधून मान्सूनने प्रगती केली होती. त्यानंतर आता पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस पडला. हवामान भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्य वर्धित अंदाजानुसार विदर्भातील जिल्हयामध्ये पुढील पाच दिवसात १५ ते १९ ऑगस्ट २०२३ रोजी आकाश ढगाळ राहून कमाल तापमान ३०.९ ते ३१.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.४ ते २४.८ अंश सेल्सिअस राहून दिनांक १५ ऑगस्ट रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.
Monsoon Update 2023:
दिनांक १६ ते १७ ऑगस्ट रोजी विरळ ठिकाणी खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक १८ ते १९ ऑगस्ट रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्व जिल्ह्यात दिनांक १६ ते १९ ऑगस्ट रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.
उष्ण हवामानानंतर पाऊस का पडतो?
उबदार हवा थंड हवेपेक्षा जास्त आर्द्रता ठेवू शकते. जेव्हा उबदार हवा थंड होते आणि आर्द्रता कमी होते, तेव्हा बहुतेकदा जास्त पाऊस पडतो . खाली दिलेला व्हिडिओ आणि मजकूर पाऊस कसा होतो आणि यूकेमध्ये पावसाचे विविध प्रकार स्पष्ट करतात.
2. Rainfall patterns
3. Weather fluctuations
4. Temperature variations
5. Rainwater harvesting
6. Meteorological phenomena
7. Climate changes
8. Hydrological cycle
9. Seasonal precipitation
10. Atmospheric moisture