Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून ०४, २०२३

चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 ठार; कार कापून मृतदेह काढले | accident in Chandrapur


चंद्रपूर (Chandrapur) : आज रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नागपूर वरून नागभीड च्या देशेने येणाऱ्या कारची समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स'ला समोरा-समोर धडक दिली. हि धडक ईतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या 6 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.. Road Car Accident नागभीड तालुक्यातील कांपा फाट्याजवळील घटना घडली. नागपुरातील चंदननगर येथील राऊत कुटुंबियातील हे सर्व सदस्य आहेत. मृतकामध्ये रोहन विजय राऊत (वय 30) नागपूर, ऋषिकेश विजय राऊत ( वय 28), गीता विजय राऊत (वय 50), सुनीता रुपेश फेंडर (40),नागपूर, प्रभा शेखर सोनवणे  (35) रा.लाखनी जि. भंडारा, यामिनि फेंडर (वय 9) रा नागपूर यांचा समावेश आहे. 


नागपूर वरून नागभीड कडे जाण्यासाठी एम एच 49 बी आर 2242 या क्रमांकाच्या रोहन विजय राऊत (30) नागपूर, ऋषिकेश विजय राऊत (28), गीता विजय राऊत (50), सुनीता रुपेश फेंडर (40),नागपूर, प्रभा शेखर सोनवणे  (35) लाखनी जी.भांडरा, यामिनि फेंडर (9) नागपूर हे निघाले होते. 
नागपुर नागभीड मार्गावर कानपा येथे नागभीडबकडे येणाऱ्या एम एच 33 टी 2677 या क्रमांकाच्या ए आर बी ट्रॅव्हल्स भिषण धडक दिली. धडक एवढी भिषण होती की यामध्ये एका 9 वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. 
 रोशन विजय राऊत हे वर्षभरापासून विभक्त राहत असलेली पत्नी व मुलाला भेटायला ब्रम्हापूरी तालुक्यातील किन्ही या गावी जात होत. सोबत भाऊ,आई व इतर नातेवाईक होते. ते नागपूर येथील शेजारी  रोशन तागडे यांच्या कारने जात होते. कानपा येथे सुमारे 3.30 ते 4.00 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला.. अपघाताची माहिती होताच  नागभीड पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. .
त्यानंतर कार मधील सहा जण जागीच ठार झाल्यानंतर फसले गेले त्यांना बाहेर काढण्याकरिता कानफा गावातील नागरिकांची मदत घेण्यात आली त्यांच्याकडे लोखंडी साहित्याने कारला तोडून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेली वर्षाची बालिका यामिनी रुपेश फेंडर हिचा नागपुरलानेत असताना वाटेच मृत्यू झाला. प्रभा सोनवाने हिचा नागभीड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. 
  दरम्यान नागभीड पोलिसांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली असुन ट्रॅव्हल्स व चालक  राजेंद्र लाकडू वैरकर रा.मेंडकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी भेट दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.