हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता.
दरम्यान, आज तो आपल्या मित्रांसह सुमन मारसेट्टी याला भेटण्यासाठी सिरोंचापासून 8 किमी अंतरावरील चिंतलपल्ली येथे गेला. येथून हिमांशू तसेच सुमन यांच्यासह पाच जण गोदावरी नदीवरील नगरम घाटाकडे आंघोळीचा बेत करून निघाले.
. (Godavari sironcha Nagpur Maharashtra)
येथे गेल्यानंतर आंघोळीसाठी सर्वजण नदीपात्रात उतरले. पावसामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने सुमन मारसेट्टी व हिमांशू मून आणि अन्य एकजण खोल पाण्यात बुडू लागले.
अन्य एक व इतर दोघे असे तिघेजण कसेबसे पाण्याबाहेर निघाले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाने हिमांशू आणि सुमन दूर वाहत जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीमध्ये दुर्दैवी घटना घडली. शनिवारी इंद्रायणी नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेले दोन तरुण अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली. हे तरुण अद्याप सापडले नाही. त्यामुळे अग्निशमन दलाकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.
. (Godavari sironcha Nagpur Maharashtra)
शक्तिमान कुमार (२० वर्षे) आणि सोनू कुमार बैठा (२० वर्षे) असे या दोन तरुणांचे नाव आहे. दोन्ही तरुणांचा नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.