Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर ०७, २०२२

रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू |

चंद्रपूर (chandrapur) च्या चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनं पासून 4 किलोमीटर अंतरावर जुनोना जंगल परिसरात  बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.




हि घटना रात्रीच्या 2-3 वाजता च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले, कक्ष  क्रमांक-४८३ मध्ये, चंद्रपूर कडून गोंदिया कडे जाणाऱ्या मालगाडी च्या धडकेत  रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, या पूर्वी सुद्धा जून महिन्यात एका मोठ्या रान गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, आणि ह्या वेळेस सुद्धा त्याच ठिकाणी आज रान गव्याचा मृत्यू झाला, मालगाडी ही जुनोना  जंगल परिसरातून जात असतांना अचानक रानगवा मालगाडी समोर आला व हा अपघात घडला, अपघात एवढा भीषण होती कि, रानगव्याचे चारही पायाचे तुकडे अक्षरशः आजू बाजूला फेकल्या गेले होते, खालचा आणि वरचा जबडा पूर्णपणे तुटून रेल्वे रुळावर पडला होता ,नाकाच्या  भागाचा तुकडा, कान, शिंग, आतडे, रुळावरती पडलेले होते आणि जून महिन्यात अपघात झालेल्या रान गव्याचा शिंगाचा वरचा भाग सुद्धा  तिथेच पडला होता.
वाघ, बिबट , अस्वल, चितळ, सांबर, रानगवे, सरीसृप अश्या अनेक वन्यजीवांचा मृत्यू झाला.अनेक मालगाड्या , एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या ह्या मार्गाने धावतात, वन्यजीवांचे अपघात टाळण्यासाठी चंद्रपूर वनविभागातर्फे एक समिती नेमण्यात आली, रेल्वे प्रशासनाला सूचना सुचविण्यात आल्या पण अजूनही कुठलीही उपाय योजना वन्यजीवांसाठी केली नसल्याने अपघात संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, रेल्वे प्रशासनाला जंगल परिसरातून रेल्वेची गती संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत ५०-६० प्रति किलोमीटर ठेवण्याचे सुचविण्यात आले, फेब्रुवारीत महिन्यात सुद्धा मामला कक्ष क्रमांक ४१३ मध्ये रेल्वेच्या धडकेत रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. Unfortunate death of Rangawa in a train collision on the railway line
        बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्ग, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगतच आहे, आणि वाघांचा भ्रमण मार्ग सुद्धा आहे, नव्याने घोषित झालेल्या कन्हाळगाव अभयारण्य आहे, कावल अभयारण्य, उमरेड- कऱ्हांडला अभयारण्य च्या भ्रमण मार्गात हा रेल्वे मार्ग येतो, हाच रेल्वे मार्ग पुढे, बालाघाट- नैनपूर मध्य प्रदेश, मधून जातो, पण तिथल्या रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाय योजना म्हणून अंडर पासेस, ओव्हर पासेस बांधण्यात आलेले आहे, मग महाराष्ट्रात रेल्वे प्रशासन कडून वन्यजीवांसाठी उपाय योजना का करण्यात आलेल्या नाही, आणखी किती वन्यजीवांचे बळी गेल्यावर रेल्वे प्रशासनाला जग येणार आहे, आणि वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी सुद्धा हा प्रश्नावर फक्त आम्ही उपाय योजण्या सुचविल्या, एवढयावर थांबून चालणार नाही आहे, समितीवर बसून प्रश्न सोडवू शकत नसेल तर, वन्यजीवांच्या संवर्धनासाठी बसलेल्या समितीवर बसून काहीही एक अर्थ नाही, अंमलबजावणी होण्यासाठी सर्व वन्यजीव संस्थांनी एकत्र येऊन हा प्रश सोडविला पाहिजे.
.घटना स्थळी जुनोना वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री आत्राम साहेब, पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. पोडसेलवार, वनरक्षक कांबळे, हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे, प्रशांत खोब्रागडे, तुषार कराळे, जाजू पुणेकर व  वनविकास महामंडळाचे वनमजूर उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.