Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०५, २०२३

प्राणी पाळायचा असेल तर परवानगी घेणे बंधनकारक; अर्ज कसा कराल? pet permission - Domestic animals - paliv prani

प्राणी पाळायचा असेल तर परवानगी घेणे बंधनकारक; अर्ज कसा कराल? 

प्राणी पाळायचा असेल तर परवानगी घेणे बंधनकारक; अर्ज कसा कराल?
चंद्रपूर ५ मे -  महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम १४- २२ (अ) उपकलम ३८६नुसार शहरातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या राहत्या घरी कोणताही प्राणी पाळायचा (paliv prani) असेल, तर त्या प्राण्याची नोंदणी महानगरपालिकेकडे करणे बंधनकारक आहे. चंद्रपूर मनपा क्षेत्रात नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असुन लिंकद्वारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करता येते आहे.  ( pet permission )

    केंद्र सरकारने २०३० पर्यंत देश रेबीजमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याकरीता प्रत्येक शहरात पाळीव प्राण्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे. परवानगी असलेला कोणताही प्राणी पाळण्यासाठी हा परवाना असणे बंधनकारक आहे. परवान्यासाठी आवश्यक बाबींची पडताळणी झाल्यानंतर परवाना मंजूर करताना महापालिकेकडून नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. नोंदणी करतांना संबंधित प्राण्याच्या लसीकरणाचा पुरावाही सादर करावा लागतो.

     पाळीव प्राणी परवान्यांमागे पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण होत आहे का, हे पाहणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.पाळीव प्राण्याबत तक्रार आल्यास संबंधी पाळीव प्राण्यासाठी परवाना घेतलेला नसले तर महानगरपालिका कारवाई करू शकते त्यामुळे पाळीव प्राणी परवाना न घेतलेल्या प्राणीप्रेमींनी तातडीने ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  


अर्ज कसा कराल? -

       पाळीव प्राण्यासाठी परवाना हवा असेल, तर नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध आहे. नोंदणीसाठी https://animal.cmcchandrapur.com/ या लिंकवर भेट द्या अथवा चंद्रपूर महानगरपालिकेच्या cmcchandrapur.com या वेबसाईटवर pet permission या नावाने असलेल्या टॅबवर क्लिक करून माहीती अर्ज भरता येतो.

    अर्ज भरतांना अर्जदाराचा रहिवासी पुरावा, पाळीव प्राण्याचे पासपोर्ट आकाराचा फोटो, रेबीज व इतर लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र,,पाळीव प्राण्याचा वर्ग,प्रजात,प्राण्याचे नाव,ओळखीची खूण,त्याचा रंग,फोटो,पशु वैद्यकीय डॉक्टरांचे नाव व नोंदणी क्रमांक तसेच इतर आवश्यक बाबींची माहीती भरावयाची असते. कागदपत्रांची फाईल ही ३ एमबी पेक्षा कमी आकाराची असावी.अर्जासोबत ५० रुपयांचे शुल्क स्वीकारले जाते. मात्र, यानंतरही दर वर्षी नूतनीकरण करून घेणे बंधनकारक आहे.


pet permission  Domestic animals paliv prani



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.