छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपप्रकरणी (Vijay Jawaharlal Darda is a politician from Indian National Congress party) काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. या प्रकरणी राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने बुधवारी विजय दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने त्याला आयपीसीच्या कलम १२०बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांतर्गत दोषी ठरवले. दुसरीकडे, इतर दोषींना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
(कोयला ब्लॉक आवंटन मामले में पूर्व राज्यसभा सांसद विजय दर्डा दोषी)
न्यायालयाने यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल आणि दोन अधिकारी केएस क्रोफा आणि केसी समरिया यांना प्रत्येकी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या विशेष न्यायालयाने यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोज कुमार जयस्वाल यांना चार वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. .
तर, माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी समरिया यांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.