Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २३, २०२३

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डाबरने केले मार्गदर्शन Dabur



डाबर इंडियाचा उपक्रम

खेळाडूंच्या आरोग्य जनजागृतीबाबत व्हिजन अकॅडमी येथे पार पडले विशेष सत्र


नागपूर, दि. 23 (प्रतिनिधी) : खेळाडू वृत्तीच्या मुलांमध्ये मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी तसेच विविध आजारा बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डाबरने विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रतिकारशक्ती जागरूकता मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभुमीवर विद्यापीठ मैदान नागपूर येथील व्हिजन स्पोर्ट्स अकॅडमी येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रोगप्रतिकार सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाबर इंडियाचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआर प्रमुख व्यास आनंद, शहरातील प्रसिद्ध क्रिटिकल केअर फिजिशीयन डॉ. सुशांत मुळ्ये, नागपूर शहर (जिला) काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री दिपकभाऊ वानखेडे, व्हिजन अकॅडमीचे संचालक श्री जयेंद्र ढोले सर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना विशेष इम्युनिटी किट, डाबर विटा देखील प्रदान करण्यात आला.

नागपूर येथील व्हिजन स्पोर्ट्स अकॅडमी येथील २०० हून अधिक मुलांचा समावेश असलेल्या विशेष सत्रात या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुलांना मूलभूत स्वच्छता पद्धती आणि पौष्टिक आहाराद्वारे त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे मार्ग शिकवण्यात आले.

या प्रसंगी बोलताना, श्री व्यास आनंद, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स व सीएसआर प्रमुख, डाबर इंडिया लिमिटेड म्हणाले की, “शारीरिक वर्ग सुरू झाल्यापासून, मजबूत प्रतिकारशक्ती ही प्रत्येक मुलाची प्राथमिक गरज आहे कारण आपण अद्याप साथीच्या आजारातून बाहेर आलो नाही. साथीच्या आजारादरम्यान एखाद्याचे संपूर्ण आरोग्य मजबूत करण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्तीचे महत्त्व तसेच व्हायरसशी लढण्यासाठी त्याची महत्त्वपूर्ण भूमिका जागतिक स्तरावर प्रस्थापित आहे. हे लक्षात घेऊन, डाबर विटा ने गरजेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी भारतातील बारा शहरांमधील आघाडीच्या एनजीओ आणि शाळांसोबत हातमिळवणी केली आहे.

यावेळी प्रसिद्ध फिजिशियन व तज्ञ डॉ. आनंद मुळ्ये म्हणाले की, "दररोज, आपण संभाव्य हानिकारक जीवाणू आणि विषाणूंच्या संपर्कात असतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला या हानिकारक सूक्ष्मजंतूंपासून तसेच रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. सामान्य जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे हा एक प्रभावी मार्ग आहे. या उपक्रमाद्वारे, लहान मुलांना इम्युनिटी किट देण्याबरोबरच मजबूत प्रतिकारशक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा उद्देश आहे अशी माहिती मुळ्ये यांनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.