Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २३, २०२३

माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात केले भरती | Former Chief Minister



महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली असून त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. काल रात्री अस्वस्थ वाटू लागण्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत.

थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह रुग्णालयात पोहोचले आहेत.

86 वर्षीय मनोहर जोशी यांनी शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तसेच त्यांनी 1976 ते 1977 या काळात मुंबईचे महापौरपदही भूषवलं होतं. यानंतर शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.