चंद्रपूर जिल्ह्यातील तीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
चंद्रपुर जिल्ह्यातील तीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या गृह विभागाचे अपर सचिव स्वप्नील बोरसे यांनी बदल्या केल्या आहेत.यात जिल्ह्यातील सिंगम अधिकारी म्हणून ओळख असलेले गडचांदूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांची जळगाव शहरात बदली करण्यात आली आहे. तर राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांची उमरेड उपविभागात बदली करण्यात आली. तसेच ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांची शहापूर येथे बदली करण्यात आली आहे.
सुशीलकुमार नायक यांनी नुकतेच काँग्रेस नेते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास केला असून दोन आरोपीना अटक सुद्धा केली.त्यानंतर आज मंगळवारी त्यांची बदली करण्यात आली आहे.