संतोष सिंग रावत यांच्या गोळीबार प्रकरणी दोन तरुण ताब्यात
संतोष सिंग रावत गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करा
आमदार विजय वडेट्टीवार यांची मागणी
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. ही बाब अत्यंत अभिनंदनास्पद असून, या आरोपींचा मुख्य बोलविता धनी कोण आहे, या घटनेतील मुख्य सूत्रधारास अटक झाली पाहिजे, अशी मागणी ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत (district Bank cdcc bank Santosh Singh Rawat) यांच्यावर मुल येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी चंद्रपुरातून दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. कोणत्या रागातून गोळीबार झाला, याचा तपास पोलीस करीत आहे.
काँग्रेसचे नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत हे मुल येथील बँकेच्या शाखेमध्ये (cdcc Bank branch mul) काही कामानिमित्त बसले होते. सायंकाळच्या सुमारास काम आटोपून स्कुटीने परत जात असताना बँकेसमोरच दबा धरून बसलेल्या चारचाकी वाहनातील बुरखाधारी तरुणांनी त्यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला.
मात्र त्यांची ही गोळी हाताला चाटून गेली. त्यामुळे सुदैवाने मोठी दुखापत किंवा जीवितहानी झाली नव्हती. राजकीय वैमनश्यातून हा गोळीबार झाला असावा असा अंदाज घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता. ( Khabarbat breaking news) दरम्यान या प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा काही संचालकांची देखील चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज गोळीबार प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोन्ही तरुण चंद्रपूर शहरातील असून, त्याांनी नेमकं कशासााठी गोळीबार केला, त्या संदर्भातील अधिक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. ही कारवाई चंद्रपूर शहर पोलिसांनी (cdcc Bank Chandrapur police) आज केली आहे.
असू शकते कारण?
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी नोकर भरती निघाली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. काही कारणास्तव ही नोकर भरती पुढे जाऊ शकले नाही. त्याला स्थगिती मिळाली. त्यानंतर अनेक तरुणांची निराशा झाली. यामध्ये गोळीबार झालेल्या प्रकरणात देखील नोकर भरतीचा संबंध असू शकतो अशी शक्यता आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही तरुण हे सख्खे भाऊ असून, ते बाबुपेठ रहिवासी आहेत. त्यांचा राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची देखील चर्चा आहे.