Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १३, २०२३

चंद्रपूर जिल्ह्यात आढळला पिवळ्या रंगाचा पळस Chandrapur news


चंद्रपूर जिल्ह्यात आढळला पिवळ्या रंगाचा पळस   Chandrapur news
yellow palas plant | medicinal| properties-found-in-the-forest-of-chandrapur 

दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या पिवळ्या रंगाच्या फुलांच्या पळसाचे झाड चंद्रपूर जिल्हयात चिचपल्ली जवळ आढळले आहे. पळसाची दोन झाडे अतिशय जवळ जवळ लागलेली असून एक झाड केसरी रंगाचे आणि दुसरे झाड पिवळ्या रंगाची फुले असलेले आहे. सामान्यतः भारतीय उपखंडात केशरी किंवा लाल रंगाच्या पळसाची फुले पहावयास मिळतात. परंतु विदर्भातील काही भागात वर्धा, चंद्रपूर या परिसरात पिवळ्या रंगाची फुले असलेले पळसाचे झाड आढळले आहेत. पळसाला लाल, निळे, पांढरे आणि केसरी अशा चार रंगातून फुले लागत असले तरी केसरी रंगाची फुले असलेलेच पळस जास्त संख्येने दिसून येतात.

yellow palas plant | medicinal| properties-found-in-the-forest-of-chandrapur 

काही पर्यावरणीय तज्ञांच्या मते पळसाची पिवळ्या रंगाची फुले ही जुनुकीय बदल झाल्यामुळे पिवळी पहावयास मिळतात. पळस हा झाड प्रामुख्याने बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, इत्यादी भागात दिसून येतो. पळस जेव्हा बोलतो तेव्हा संपूर्ण जंगल लाल रंगात पहावयास मिळते, जंगलाला आग लागल्याचा भास निर्माण होतो म्हणून याला 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' असेही या भागात संबोधले जाते. जेवणाच्या पत्रावळी निर्माण करण्यासाठी, होळीतील फुलांचा नैसर्गिक रंग आणि कपड्यांची डाय निर्माण करण्यासाठी, झाडावरील लाख निर्माण, मुळांपासून दोर, फुलांची शरबत, इत्यादींच्या निर्मितीत पळसाच्या मोठ्या प्रमाणात वापर होतो. भर उन्हाळ्यात हिरवा गर्द असलेला पळस शेतकऱ्यांचाही मित्र आहे.

yellow palas plant | medicinal| properties-found-in-the-forest-of-chandrapur 

देवानंद साखरकर, डॉ. योगेश दुधपचारे, डॉ. संजय सिंग, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, पर्यावरणीय अभ्यासक प्रियांका पुनवतकर, प्रशांत मुळेवार यांनी नुकतीच या पिवळ्या रंगात बहरलेल्या पळसाच्या झाडाला भेट दिली आहे. या झाडाच्या शेंगांपासून यावर्षी नवीन रोपटे लावायचा प्रयत्न केला जाणार आहे.

yellow palas plant | medicinal| properties-found-in-the-forest-of-chandrapur 
A palsa tree with yellow flowers which is considered rare is found near Chichpally in Chandrapur district. Two palsa trees are very close together, one is saffron and the other is yellow. Commonly seen in the Indian subcontinent are orange or red colored flowers. But in some parts of Vidarbha, Palasa tree with yellow colored flowers has been found in Wardha, Chandrapur area.

चंद्रपुर जिले के चिचपल्ली के पास पीले फूलों वाला एक पलसा का पेड़ पाया जाता है जिसे दुर्लभ माना जाता है। दो पलसों के पेड़ आपस में सटे हुए हैं, एक केसरिया और दूसरा पीला। भारतीय उपमहाद्वीप में आमतौर पर नारंगी या लाल रंग के फूल देखे जाते हैं। लेकिन विदर्भ के कुछ हिस्सों में वर्धा, चंद्रपुर क्षेत्र में पीले रंग के फूलों वाला पलासा का पेड़ पाया गया है।

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.